Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

दिवंगत पत्रकार गौतम गळेगावकर यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या वतीने तीन लाखांची मदत -NNL

दिवंगत पत्रकार गौतम गळेगावकर यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाच्या वतीने तीन लाखांची मदत -NNL

नांदेड
नांदेड। येथील दिवंगत पत्रकार गौतम गळेगावकर यांच्या कुटुंबीयांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ , व्हाईस ऑफ मीडिया , डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि नांदेड पोलिसांच्या वतीने तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे . या मदतीतून दिवंगत पत्रकार गौतम कांबळे यांची पत्नी सुप्रिया कांबळे हिच्या नावे तीन लाख रुपयांचे किसान विकास पत्र तयार करण्यात आले असून हे किसान विकास पत्र पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते सुप्रियाला देण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोष्याध्यक्ष विजय जोशी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे , नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी , डिजिटल मीडिया संपादक पत्रकार मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे ,व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले,योगेश लाटकर , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवींद्र स...
शेतकऱ्याची बाजू न ऐकताच महसुलची धडक कार्यवाही; महसुलचा अजब कारभार माफियांना अभय शेतकऱ्यांना दिला जातोय त्रास -NNL

शेतकऱ्याची बाजू न ऐकताच महसुलची धडक कार्यवाही; महसुलचा अजब कारभार माफियांना अभय शेतकऱ्यांना दिला जातोय त्रास -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। बेंदीतांड्यातील अल्पभूधारक शेतकर्‍याने त्यांच्याच शेतातील विहिरीचा मुरुम त्याच शेती सुधारण्याच्या कामावर वापरत असतांना महसूलच्या पथकाने मुरुमासह दोन ट्रॅक्टर्स ७ जून रोजी पकडून किनवट तहसिल कार्यालयात लावले आहेत. मुरुमाचे अवैध उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक करणार्‍यांना अभय दिल्या जाते. तर शेतकर्‍यांच्या शेती सुधार कामावरच्या वैध मुरुमाचे ट्रॅक्टर्स धरले जातात. तहसिलदारांनी दिलेल्या उद्दीष्ठ्य पूर्ण करण्याच्या नादात शेतकर्‍याची बाजू ऐकून न घेता महसूल पथकाने कारवाई केली. मुरुमच अवैध होता तर या अवैध कारवाईचा महसुल प्रशासनाला जबाब तर द्यावाच लागणार असल्याचे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. तहसिलदार शारदा चौंडेकरांनी महसूल यंत्रणेला गौण, खनिज, रेती, मुरुमाच्या अवैध व्यवसायिकांकडून वार्षिक उद्दीष्ठ्य निश्चीत करुन दिल्याची सबब या कारवाई दरम्यान कर्मचार्‍यांनी बोलून...
इस्लापूर येथे नवचेतना संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

इस्लापूर येथे नवचेतना संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। मराठवाड्यात महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेस प्रारंभ झाला असुन या यात्रेच्या निमित्ताने इस्लापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सामाजिक सुरक्षा, शेतकरी के.सी.सी नुतनीकरण, बचतगट महीला मेळावा, डिजिटल व वित्तीय साक्षरता मेळावा, वृक्षारोपण यावर महत्व पटवून सांगितले. इस्लापुर येथे गुरूवारी सायंकाळी महाराष्ट्र ग्रामीण बॅक समोर पिक कर्ज नुतनीकरण केलेल्या शेतकरी विनायकराव देशमुख, दिंगाबर जाधव, नंदकुमार गादेवार, सुनिल आडे, गणेश जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र ग्रामीण बॅक चे छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक सर व्यवस्थापक संगमकर, सर व्यवस्थापक षण्मुख वानखेडे, विभागीय व्यवस्थापक संतोष प्रभावती याच्या हस्ते गौरविण्यात आले. तर नारी सक्ती, साईबाबा महीला, वैष्णवी महीला, भिमा माता, प्रगती महीला, लक्ष्मी स्वयसहायत्ता, दुर्गा माता...
हिमायतनगरसह हदगाव न.पं. चा १ कोटी ८० लाखाचा निधी हिंगोलीला वळविला…? -NNL

हिमायतनगरसह हदगाव न.पं. चा १ कोटी ८० लाखाचा निधी हिंगोलीला वळविला…? -NNL

नांदेड, हिंगोली
हिमायतनगर। लोकसभा निवडणूक होताच हिमायतनगर येथील स्मशानभूसाठी मंजूर करण्यात आलेला तब्बल 0.95 कोटी रुपये तर हदगाव नगरपरिषदेला 0.85 कोटी रुपये, किनवट नगरपरिषद 0.30 कोटी, माहूर नगरपंचायत 0.20 कोटी असा एकूण 2 कोटी 40 लाख रुपयाचा निधी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात हिंगोली नगरपरिषदेला 11 जून रोजी दिल्याचे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव श्रीकांत आडगे यांनी संबंधित नगरपंचायत, नगरपरीषदेला पत्र पाठवून कळविले आहे. हिंगोली लोकसभा महायुतीच्या पराभूत उमेदवारांना महायुतीच्या शासनाने तत्कालीन खा. हेमंत पाटील यांनी दिलेला निधी जैसे थे ठेवण्यात यश येईल का? याकडे हदगाव किनवट विधानसभा क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागून आहे. हिमायतनगरसह नांदेड जिल्ह्यातील उपरोक्त नगरपंचायत नगरपरिषदेला तत्कालीन खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत हिमायतनगर येथील स्मशानभूसाठ...
नांदेड ते नाळेश्वर सिमेंट रस्त्यावर दीड वर्षातच पडल्या भेगा -NNL

नांदेड ते नाळेश्वर सिमेंट रस्त्यावर दीड वर्षातच पडल्या भेगा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, आनंदा बोकारे| नांदेड ते नाळेश्वर हा रस्ता एक ते दीड वर्षापूर्वी तयार करण्यात आला असून निकृष्ट कामामुळे सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी भेगा पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. नांदेड ते नाळेश्वर या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे जिल्हाभर चांगलेच गाजले होते. एक ते दीड वर्षापूर्वी सी.सी.रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर मिल गेट ते मल्हार चौक, हसापूर व वाघी ते नाळेश्वर रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच मल्हार चौक ते वाघी आरटीओ पासिंग कार्यालयापासून नाळेश्वर पर्यंत मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर बर्‍याच प्रमाणात अपघात घडले आहे. नांदेड ते लिंबगाव रस्ता काम चालू असल्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक नांदेड ते जैतापूर रस्त्यावर पूर्णा या मार्गाकडे जात असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वर्दळ निर्माण झाली असून व अपघाताचे प्रमाणही वाढले...
हिवताप टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन -NNL

हिवताप टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड। पावसाळ्याचे आगमन होत असताना हिवताप डेंगू मेंदू जोरासारख्या कीटकजन्य आजाराची साथ वाढण्याचा धोका असतो. सर्व आजार डासांपासून होत असतात. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाडण्याच्या आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी जून महिन्यात हिवता प्रतिरोध महिना राबविण्यात येतो संपूर्ण पावसाळ्यात कीटकजन्य आजाराबाबत प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली जाते नागरिकांनी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास घरामध्ये जास्त ओलावा राहणार नाही त्यासाठी दर आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाडणे आवश्यक आहे यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते डासानची संख्या कमी झाल्यास हिवताप डेंगू मेंदू जर सारख्या कीटकजन्य आजारांची संख्या कमी होते त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आव...
महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा वाई येथे कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम -NNL

महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा वाई येथे कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यांतील वाई बाजार येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा संभाजीनगर येथून नांदेड जिल्ह्यातील वाई येथील सहारा फॅशन हॉल येथे दि १३ जून रोजी संवाद यात्रा कार्यक्रम पार पडला. यात्रेतील वरिष्ठ अधिकारी सहाय्यक सर व्यवस्थापक सुहास कुमार संगमकर, पणमुख वानखेडे, क्षत्रिय व्यवस्थापक नांदेड संतोष प्रभावती,माहूर तहसीलचे नायब तहसीलदार राजकुमार राठोड वाई बाजार चे माजी सरपंच उस्मान खान, काँ. शंकर सिडाम, पत्रकार साजिद खान, राजकुमार पडलवार, पंडित धुप्पे, कैलास बेहेरे , माहूर बँकेचे शाखाधिकारी दीपंकर पाटील, वाई शाखेचे रोशन पेंदोर, उमरी शाखेचे संदीप सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित शेतकरी महिला, बचत गट, व्यापारी,किसान केडीट कार्ड, बचतगट, अर्थिक वित्तीय साक्षरता व ड...
आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त खतांचासाठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश -NNL

आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त खतांचासाठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश -NNL

नांदेड
मुंबई| राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा केला जात असला तरी येणाऱ्या काळात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य शासनातर्फे खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यात येतो. पणन महासंघासह इतर संस्थांनी आवश्यकतेनुसार व प्राप्त उद्दिष्टानुसार आपल्या वाट्याच्या खतसाठ्याची संपूर्ण उचल करावी. त्यानंतरही आवश्यकता असल्यास कृषी विभागाने पणन महासंघास अतिरिक्त कोटा मंजूर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज पणन महासंघाच्या विविध मागण्यां संदर्भात बैठक घेतली. या बैठकीस कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित ...
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात शेतकऱ्यांनी केली कापूस लागवडीला सुरुवात -NNL

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात शेतकऱ्यांनी केली कापूस लागवडीला सुरुवात -NNL

नांदेड
सोनारी फाटा, शेख खय्युम। हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा व पोटा परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या मृग नक्षत्रातील पहिल्याच दमदार पावसाने बळीराजाची प्रतीक्षा संपली असून, या पावसानंतर शेतात रेघाटया ओढून कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची बी-बियाणे, खत विक्रीत होणारी लूट थोडी वेदनादायक ठरत आहे. हिमायतनगर तालुक्यातील काही भागात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सोनारी फाटा व पोटा परिसरात नाल्यांना व शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांनी १२ जून रोजी बुधवारी कापूस लागवड व पेरणीला प्रारंभ केला आहे. पावसासाठी वातावरण अनुकूल झाल्याचे भासत असल्याने मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतकरी कापूस लागवड कामासाठी सज्ज झाला असून, सोनारी फाटा व पोटा परिसरामध्ये कापूस लागवडीला प्रारंभ झाले असल्याचे चित्र दिसत आहे. ११ जून रोजी सायंकाळी झालेल्या दम...
साहिल : एका शाळाबाह्य मुलाचा ‘निष्पाप बळी’ NNL

साहिल : एका शाळाबाह्य मुलाचा ‘निष्पाप बळी’ NNL

लेख, नांदेड
नवे शैक्षणिक वर्ष सुरुच होते आहे. कोणत्याही शैक्षणिक वर्षात कुठेही एकही शाळाबाह्य विद्यार्थी असू नये, असा राज्य सरकारचा दंडक आहे. स्तंभलेखक व शिक्षक मारोती कदम यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शाळेत प्रवेश दिला. परंतु त्यापैकी एका मुलाचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांनी या वास्तव घटनेचे लेखस्वरुप चित्रण केले. वाशीम जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबातील एका मुलाच्या आकस्मिक निधनामुळे त्या कुटुंबावर आलेला काळाचा घाला म्हणजे मारोती कदम यांचा लेख म्हणजे 'निष्पाप बळी' होय. कदम हे अत्यंत संवेदनशील मनाचे लेखक आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या ज्या अशा घटना त्या कदमांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत त्या कागदावर शब्दबद्ध होणारच! ते जसे संवेदनशील लेखक आहेत तसे ते विद्यार्थ्यांच्या भावविश्वात रमणारे बालमूलक शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेत म्हणजे पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथील...
error: Content is protected !!