Homeनांदेडमहा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा वाई येथे कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा...

महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा वाई येथे कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यांतील वाई बाजार येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा संभाजीनगर येथून नांदेड जिल्ह्यातील वाई येथील सहारा फॅशन हॉल येथे दि १३ जून रोजी संवाद यात्रा कार्यक्रम पार पडला.

यात्रेतील वरिष्ठ अधिकारी सहाय्यक सर व्यवस्थापक सुहास कुमार संगमकर, पणमुख वानखेडे, क्षत्रिय व्यवस्थापक नांदेड संतोष प्रभावती,माहूर तहसीलचे नायब तहसीलदार राजकुमार राठोड वाई बाजार चे माजी सरपंच उस्मान खान, काँ. शंकर सिडाम, पत्रकार साजिद खान, राजकुमार पडलवार, पंडित धुप्पे, कैलास बेहेरे , माहूर बँकेचे शाखाधिकारी दीपंकर पाटील, वाई शाखेचे रोशन पेंदोर, उमरी शाखेचे संदीप सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित शेतकरी महिला, बचत गट, व्यापारी,किसान केडीट कार्ड, बचतगट, अर्थिक वित्तीय साक्षरता व डिजीटल बँकींग या विषयी शेतकरी व ग्रामीण भागातील व्यवसायीक यांच्याशी बँकेचे वरिष्ठ अधिकारी व संचालक मंडळ यांचा थेट संवाद साधला. जनतेच्या विविध अडचणी समस्यावर त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे.

‘साथ विश्वासाची वाट विकासाची’ या ब्रिद्रवाक्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ‘पीक कर्ज वरदान वेळेवर करा त्याचे भुक्तान’ या उक्तीप्रमाणे वरिष्ठांनी मार्गदर्शन केले यावेळी नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, महिला बचत गटा चे अध्यक्ष सचिव, व्यापारी यांचा वृक्ष, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबास दोन लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आले तसेच एक अंकी नाटक सादर करण्यात आले.

IMG 20240613 WA0037 महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा वाई येथे कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम -NNL

यावेळी जयकांत मोरे, माहूर बँकेचे अधिकारी विपिन सर, मनीष सर,वाई बाजार बँकेचे साहिल सपाटे बालाजी असेवार, दत्ता पेंदोर तर उमरी शाखेचे शुभम रामटेके, निकिता कुंभारे, दीक्षा पाटील यांची ही उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे बीसी पंडित धुप्पे ,स्वप्निल जाधव, भास्कर आढागळे ,श्री, पतंगे, कैलास कांबळे, समीर शेख, राहुल जाधव,नयन दीक्षित, राजू भोयर,गणेश एंटलवार, छगन जाधव, अरविंद टनमने, राऊत, संजय पोटपेलिवर, जगजीवन कोवे, अखिल राठोड, अक्षय कोतपेलीवार यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments