Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला सहा दिवसापासून कुलुप; शिक्षणविभागाच्या अनास्थेबाबत पालकवर्ग नाराज – NNL

कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला सहा दिवसापासून कुलुप; शिक्षणविभागाच्या अनास्थेबाबत पालकवर्ग नाराज – NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी दि.१८ रोजी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणा व भोंगळ कारभाराचा निषेध केला. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी भेट दिली मात्र जोपर्यंत किमान दोन शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही. असा पवित्र पालकांनी घेऊन शिक्षक देता येत नसतील तर आमच्या पाल्यांच्या टि.सी. आम्हास परत द्या अशी कडक भूमिका घेतली आहे. दरम्यान कुलूप लावून सहा दिवस लोटले परंतु शिक्षक देण्यास शिक्षणविभागाची अनास्था दिसून येत असल्याबाबत पालकवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. हिमायतनगर तालुका शिक्षण व्यवस्था ढासळली आहे, त्यामुळे बहुतांश पालक वर्गांचा कल खाजगी शिक्षणाकडे वळत आहे. मात्र ग्रामीण भागात हि सुविधा नसल्याने बहुतां...
दहा वर्षा पासून वृटपौर्णिनेला वृक्ष वाटप करण्याचा प्राणिताताई देवरे यांचा उपक्रम – NNL

दहा वर्षा पासून वृटपौर्णिनेला वृक्ष वाटप करण्याचा प्राणिताताई देवरे यांचा उपक्रम – NNL

नांदेड
लोहा| सामाजिक उपक्रम राबविताना निवडणूकीतील जय - पराजय यांचा कोणताही परिणाम होऊ न देता स्वतःहुन स्वीकारलेली सामाजिक बांधीलकी जोपासत प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी वटपौर्णिमे निमित्ताने लोह्यात वट वृक्ष व पुष्पफुलांचे रोपटे वाटप केले. गेल्या दहा वर्षां पासून हा उपक्रम त्या राबवित असतात. देऊळगल्ली येथे वटपौर्णिमा निमित्ताने आयोजित वटवृक्ष व फुलांचे रोपटे वाटप प्रतिभाताई पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करम्यात आले यावेळी प्राणिताताई देवरे चिखलीकर माजी नगरसेविका कल्पनाताई मुकदम -चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्या वाले नगरसेविका शोभाताई बगडे, डॉ सौ घंटे यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी प्राणिताताई यांनी मार्गदर्शन केले व दहा वर्षा पासून राबविण्यात येत असलेल्या वृक्षांची झाडे भेट देण्याचा उपक्रम पर्यावरण पूरक आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षा पासून ...
राजकारणातला हिरा माणूस स्व.लक्ष्मणराव शक्करगे अनंतात विलीन – NNL

राजकारणातला हिरा माणूस स्व.लक्ष्मणराव शक्करगे अनंतात विलीन – NNL

नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील जेष्ठ नागरिक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे जेष्ठ संचालक लक्ष्मणराव गिरजप्पा शक्करगे यांचे वयाच्या ८५ व्या वृद्धापकाळाने दि. २२ सायंकाळी ३.३० वाजता निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर दि. २३ रविवारी दुपारी १ . ३० वाजता बोरी - उमरखेड रस्त्यावर त्यांचे शेतात हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत वीरशैव धर्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. जेष्ठ संचालक लक्ष्मणराव गिरजप्पा शक्करगे यांचा निधन झाल्याची वार्ता समजताच दि. २३ रविवारी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून लक्ष्मणराव शक्करगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हिमायतनगर बंद हा सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाळून बाजारपेठ बंद यशस्वी केला. शक्करगे यांनी आपल्या ५४ वर्षीच्या राजकीय, सामाजिक जिवनात जिल्हा परिषद सदस्य पद दोन वेळा, कृषी उत्...
बाबुराव कदम कोहळीकर विधानसभेच्या दुसऱ्या ईनिंग करिता तयार; सहानुभूतीची लाट यावेळी तारणार..? -NNL

बाबुराव कदम कोहळीकर विधानसभेच्या दुसऱ्या ईनिंग करिता तयार; सहानुभूतीची लाट यावेळी तारणार..? -NNL

नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा। कोणतेही पद नसताना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या विकासा बरोबर सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी, पैनगंगा नदीकाठावरील जनेतच्या पाणी समस्यासाठी बाबुराव कदम कोहळीकर यांनी जीवाचे रान केले आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांना लोकनेते तथा शेतकरी नेते म्हणून समबोधले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हदगाव हिमायतनगर मतदार संघात कोट्यवधींचा निधीतुन पैनगंगा नदीवर पूल कमं बंधारे मंजूर करून आणत, विविध रस्ते, समाज भवन यासह अनेक गरजू वंचितांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी मोलाचा वाट उचलला आहे. त्यांच्या याचं कार्याची पावती म्हणून लोकसभा निवडणुकीत जनतेने भरघोस मतदान दिले, मात्र यात त्यांचा प्रभाव झाला. असे असले तरी पुन्हा नव्या जोमाने त्यांनी मतदार सांघट आपली पकड मजबूत करण्याला सुरुवात केली असून, त्यांनी हदगाव...
खा. चंद्रकांत हंडोरे 24 जून रोजी नांदेड दौऱ्यावर -NNL

खा. चंद्रकांत हंडोरे 24 जून रोजी नांदेड दौऱ्यावर -NNL

नांदेड
नांदेड। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे हे आज दिनांक 24 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. खा. चंद्रकांत हंडोरे यांना भेटण्यासाठी भीमशक्तीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा भिमशक्ती च्या वतीने करण्यात आले आहे . खा. चंद्रकांत हंडोरे यांचे सोमवार दिनांक 24 जून रोजी हैदराबाद येथून दुपारी एक वाजता नांदेड विमानतळावर खाजगी विमानाने आगमन होईल. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृह येथे भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांशी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हितगुज करतील. त्यानंतर एका खाजगी कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भीमशक्तीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रगृह येथे उपस्थित राहावे असे अहवान नांदेड जिल्हा भिमाशक्तीच्या वतीने करण्यात आले आह...
गरोदर मातांनी सुदृढ व निरोगी राहण्यासाठी पालेभाज्याचा वापर करावा –  किशन गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी -NNL

गरोदर मातांनी सुदृढ व निरोगी राहण्यासाठी पालेभाज्याचा वापर करावा –  किशन गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। अतिदुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातून मानव विकास अभियाना अंतर्गत कुपोषण मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करणवाल यांनी पाऊले उचलली असून प्रथमता अविकसित व दुर्गम भाग असलेल्या तालुक्यातील रुग्णांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे मानव विकास योजने अंतर्गत कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये सर्व गरोदर माता व स्तनंदा मातांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के. पी. गायकवाड यांनी गरोदर मातांना पौष्टिक आहारात पालेभाज्याचा वापर करावा प्रोटीन्सचा आहारात समावेश असावा त्यामुळे बालकाची सुदृढ वाढ होण्यास मदत होते त्याचबरोबर गरोदर मातांना स्तनपान विषयी माहिती व प्रात्यक्षिक करून...
जल जीवन मिशन योजनेच्या कामा मुळे दाहा फुटाच्या रस्त्यांची झाली पाऊलवाट -NNL

जल जीवन मिशन योजनेच्या कामा मुळे दाहा फुटाच्या रस्त्यांची झाली पाऊलवाट -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेचा राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर कामांचा शुभारंभ केला, त्या अंतर्गत गुंडवळ येथे हि काम करण्यात आले. दलीत वस्ती मध्ये असलेला दहा फुटाचा सीमेंट रस्ता फोडून पाईप टाकण्यात आले. परंतु संबंधित ठेकेदाराने फोडलेला रस्ता सपाट न करता मोठ- मोठे दगड ठेवल्याने हा रस्ता केवळ पायवाट झाला असून साधी बैलगाडी हि जात नसल्याने गावक-याना अडचनीचा सामना करावा लागत आहे. ह्या कडे संबंधित टक्केवारी मुळे दुर्लक्ष करीत असल्याचा गावकरीचा आरोप आहे. तालुक्यात अनेक गावात जलजिवन मिशनअंतर्गत पाण्याची टाकी व पाईप लाईनचे काम करण्यात आले. पाईप लाईनचे काम करतांना लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सिमेंटचे रस्ते संबधित कंत्राटदाराने फोडले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना त्या फुटलेल्या...
संतगुरु कबीरदास यांची जयंती; संत रोहिदास नगरात मोठ्या उत्साहात साजरी – NNL

संतगुरु कबीरदास यांची जयंती; संत रोहिदास नगरात मोठ्या उत्साहात साजरी – NNL

नांदेड
नविन नांदेड| संतगुरु रोहीदास तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड परिसरातील कै. बापूराव पाटील खतगांवकर सांस्कृतिक सभागृहात संतगुरु कबीरदास यांच्या जयंतीचे आयोजन तिर्थक्षेत्राचे संस्थापक वामनराव मे. विष्णुपूरीकर यांच्याकडून करण्यात आले होते. सर्वप्रथम सरपंच प्रतिनिधी तथा मा. सरपंच इंद्रजित पांचाळ यांच्या शुभहस्ते व मुख्याध्यापिका एस.पी. चंद्रावार, मा. उपसरपंच संभाजी जाधव पाटील, मा. सरपंच नागोराव आंबटवार व ग्रामपंचायत सदस्य किशनराव गव्हाणे, अशोक तु. लाठकर, अ‍ॅड. प्रमोद कामठेकर, चंद्रकांत कटकमोड, गुंडप्पा बारोळे, चंद्रकांत सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सतगुरु कबीरदास यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रघुनाथ वाघमारे, शंकर अन्नपूर्णे, साईनाथ अन्नपूर्णे, आकाश आडपवार, ग्रा.पं. लिपीक प्रतिक सुर्यवंशी, काशीनाथ पारधे, वेदांत पांचाळ, गणेश अन्नपूर्णे, ...
लोहा शहरा “बेशिस्त” बॅनरवर पोलिसांची कार्यवाही; शहराने सोडला मोकळा श्वास -NNL

लोहा शहरा “बेशिस्त” बॅनरवर पोलिसांची कार्यवाही; शहराने सोडला मोकळा श्वास -NNL

नांदेड, क्राईम
लोहा। लोहा शहरात वाट्टेल तेथे  व वाटेल  तेवढे दिवस बॅनर  कमानी लावण्याची पद्धती रूढ झाली कथित एका घटनेत विधीमंडळात प्रश्न गेला तरीही नगर पालिका प्रशासनाने कोणताही बोध घेतला नाही. उलट पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनीच शहराच्या विद्रुपीकरणाच्या कृतीवर कायदाचा बडगा उगारला .पुन्हा शहरातील बेशिस्त बॅनर पोलिसांनी काढले  .शहरातील व्यापाऱ्यांसह जागरूक नागरिकांनी  याचे स्वागत केले  रस्त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि शहर मोकळे झाले. नगर पालिकेचा सत्ताधारी काळात जो मनमानी कारभार होता त्यामुळे शहरात वाट्टेल तेथे आणि वाट्टेल तेवढे दिवस रस्त्यावर ...दुकाना समोर बॅनर राहत होते. नगर पालिकेने कधीच बॅनर साठी जागा नेमून दिली नाही आणि कधीही  उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही .केवळ कागदोपत्री न्यायालयाच्या आदेशाचे अहवाल देऊन पालन केले जाते असे कळते. शहरात बसस्थानक मुख्य चौक, भाजी मंडई या भागात...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव मोरे तर सचिव पदी जमील अहेमद-NNL

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव मोरे तर सचिव पदी जमील अहेमद-NNL

नांदेड
नांदेड। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंद बाबाराव मोरे यांची उपाध्यक्षपदी अशोकराव रावणगांवकर तर मानद सचिव पदी जमील अहेमद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कर्मचारी पत संस्थेच्या सन 2024-2029 या पंचवार्षिक कालावधीसाठी दिनांक 3 मार्च 2024 रोजी निवडणुक झाली होती व त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी ही पार पडली. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत संस्थेचे माजी अध्यक्ष सुनिल सोळके पुरस्कृत बैंक कर्मचारी विकास पॅनलचे सर्वच 13 उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडुन आले. दरम्यानचे कालावधीत 15 मार्च पासून लोकसभेच्या निवडणुकीची आचार संहित चालू झाल्याने कर्मचारी पत संस्थेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. परंतु सहकार निवडणुक प्राधिकरण यांच्या ओदशाप्रमाणे 10 जून पासून आचार संहिता शिथील झालेली असल्या...
error: Content is protected !!