Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

कौठा ता. कंधार येथील गुन्हयातील आंतर राज्यीय दरोडयाचे टोळीतील 06 आरोपीतांना 34,88,461/- रुपयाचे मुद्देमालासह अटक -NNL

कौठा ता. कंधार येथील गुन्हयातील आंतर राज्यीय दरोडयाचे टोळीतील 06 आरोपीतांना 34,88,461/- रुपयाचे मुद्देमालासह अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे मौजे कौठा येथे पाच ते सहा आरोपीतांनी गजानन श्रीहरी येरावा यांचे राहते घरी शस्त्राचा धाक दाखवुन दरोडा टाकुन सोन्याचे चांदीचे दागीने व नगदी रक्कम असा एकुण 41,35,000/- रुपये जबरीने चोरुन नेले होते. या घटनेनंतर नांदेड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अखेर कौठा ता. कंधार येथील गुन्हयातील आंतर राज्यीय दरोडयाचे टोळीतील 06 आरोपीतांना 34,88,461/- रुपयाचे मुद्देमालासह अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. याबाबत सवसितर वृत्त असे कि, दिनांक 15/06/2024 रोजी 03.00 वाजताचे सुमारास मौजे कौठा येथे पाच ते सहा आरोपीतांनी फिर्यादी नामे गजानन श्रीहरी येरावार, रा. कौठा ता. कंधार जि. नांदेड यांचे राहते घरी शस्त्राचा धाक दाखवुन दरोडा टाकुन सोन्याचे चांदीचे दागीने व नगदी रक्कम असा एकुण 41,35,000/- रुपये जबरीने चोरुन नेले...
कोठारी ते पार्डी जाणाऱ्या रोडवरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला -NNL

कोठारी ते पार्डी जाणाऱ्या रोडवरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला -NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे। रस्ते विकासावर भर दिला खरा मात्र केलेल्या कामाच्या दर्जाची कंत्राटदाराने वाट लावल्यामुळे कोठारी ते पार्डी-बोधडी जाणार्‍या मार्गावरील शनिवारपेठ जवळील नव्याने बांधलेला पूल कोसळला. नेमकाच रहदारीला पूल खुला करुन दिला होता. पूल दिवसा कोसळल्यामुळे वाहनांचा अपघात टळला. रात्री कोसळला असता तर कित्येक वाहनांचे अपघात झाले असते हे सांगणे कठीण होते. कोठारी ते पार्डी-बोधडीकडे जाणार्‍या मुख्य मार्गाचे कांही ठिकाणी डांबरीकरण आणि लहान पुलांचे बांधकाम करण्यात आले. डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा लपून राहिलेला नाही. किनवट ते मांडवा जाणार्‍या मार्गावर कमी जाडीचा डांबराचा थर देऊन गुत्तेदार कामाची गुंडाळपट्टी करीत असतांना वंजारवाडीतील कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क कामच थांबवल्याने प्रशासनातील संबंधित अभियंत्यांनी तात्काळ दखल घेतल्याने दुसर्‍याच दिवस्यी पुन्हा आवश्यकतेनुसार डांबरीकरण क...
स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व गोळया औषधी वाटप -NNL

स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व गोळया औषधी वाटप -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। गोकुंदा हददीतील शिवशंकरनगर येथे आज स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ ग्रामस्थांकरीता मोफत सर्वांग आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. सर्व प्रथम स्वर्गीय अनुसयाबाई महाजन मरडे यांच्या प्रतिमेचे पुजन त्यांचे पती महाजन मरडे, चिरंजीव आनंदा, संजय, गुरुनाथ मरडे, सूना सुलोचना, अर्चना, सुरेखा मरडे, त्यांचे नातू संदिप, गणेश मरडे यांनी केले. यानंतर कार्यक्रमात मरडे कुटुंबिय व भारत जोडो युवा अकादमी साने गुरुजी रुग्णालय, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ समाज सेवक डॉ. अशोक बेलेखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी, गरोदर माता, बालके, वयोवृद पुरुष व महिला, किशोर वयीन मुली असे एकूण 51 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधी, गोळया वाटप करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मार्तंड कुलकर्णी, भारत जोडो युवा...
किनवट/माहुर तालुक्यातील बनावट दारूचा महापूर, राज्य उत्पादन शुल्काचे दुर्लक्ष -NNL

किनवट/माहुर तालुक्यातील बनावट दारूचा महापूर, राज्य उत्पादन शुल्काचे दुर्लक्ष -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट/माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसाढवळ्या टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर अनधिकृतपणे विदेशी दारू तर गावठी दारुची विक्री होत आहे. काही गावात थेट गावठी दारू काढण्याचे कारखाने पेव फुटल्याचे बोलले जात आहे. हे सर्व घडत असताना यावर नियंत्रण ठेवणारे किनवटचे राज्य उत्पादन शुल्क विभाग रसद गोळा करण्यात मश्गुल असल्याचा आरोप होत आहे. नांदेड जिल्ह्याचा अंदमान निकोबार संबोधल्या जाणाऱ्या किनवट/माहूर हे तालुके जिल्हा मुख्यालयापासून दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. अशात जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून तालुका स्तरावरील अधिकारी यांचा अर्थपूर्ण संबंधातून दारू व्यवसाय जोमात सुरू आहे. मग ते राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष करून अवैध व्यवसायात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास येत आहे. किनवट/माहूर तालुक्यातील आज घडील...
चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर -NNL

चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त घेण्यात आलेली २३ वी चालण्याची भव्य स्पर्धा रिमझिम पावसात देखील २८९ स्पर्धकांनी सहभाग घेतल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण संयोजनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून ११ विजेत्यांना मोबाईल तर ३३ स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह व सर्वांना टी-शर्ट मोफत देण्यात आले. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम सेतू गोवर्धन घाट नांदेड येथे रविवारी सकाळी सहा वाजता भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते भाजपाचा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विविज्ञ ॲड.प्रवीण आयाचित, मुकेश पटेल, सुधीर आंबेकर, राजू बच्चेवार, साईनाथ पदमवार, सुभाष वळबे, सुरेश इंदुरकर, गणेश गुरुपवार, सूर्यकांत सुवर्णकार यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रमुख अतिथीं...
माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील स्वगृही परतणार ; मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार -NNL

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील स्वगृही परतणार ; मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार -NNL

नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता ताई पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भविष्यात कोणत्या राजकीय पक्षात जातील...? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती, ती खरी होणार असुन, मंगळवारी सकाळी 11 वाजता खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. गेल्या 10 वर्षापासून भाजपात काम करताना शासणाच्या चुकलेल्या निर्णयाच्या विरोधात माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी खडे बोल सुनावत ते निर्णय मागे घ्यायला भाग पडले होते. त्या नेहमी सत्याच्या बाजूने राहून ठोस भूमिका बजावतात हि त्यांची ओळख आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष...
मुसलमान वाडीपाटी पासून सोळा गावांना जोडणारा रस्त्याची दयनीय अवस्था, तात्काळ दुरूस्ती मागणी -NNL

मुसलमान वाडीपाटी पासून सोळा गावांना जोडणारा रस्त्याची दयनीय अवस्था, तात्काळ दुरूस्ती मागणी -NNL

नांदेड
नांदेड। नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मुसलमान वाडीपाटी पासून सोळा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या संदर्भात आ. मोहनराव हंबर्डे व बांधकाम विभाग अधिकारी व संबंधित गुतेदाराची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करण्याचे आश्वासन संबधित गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांना देण्यात आले,मात्र या रस्त्याचा दयनीय अवस्थे मुळे वाहन धारकांना व नागरिक यांना त्रास सहन करावा लागला आहे. नांदेड लातूर महामार्ग वरील मुसलमान वाडीपाटी पासून हा रस्ता जवळपास सोळा गावांना जोडला गेला असून खुपरसवाडी, मारकंड, पिंपळगाव,बामणी, भणगी,बेट सांगवी, वाहेगाव,गंगा बेट यासह अनेक गावाचा प्रमुख रस्ता असुन या रस्त्यावर शैक्षणिक संस्था व मंदिरात जाणारे येणारे भाविक भक्तांची व अनेक गावातील ग्रामस्थ व शाळांना जाणाऱ्या येणाऱ्या विधार्थी व दुध वाले यांच्यी मोठया प्रमाणात येज...
गोदावरी हातमाग सोसायटी मलनिसारण लाईन तुबंल्याने दुर्गंधी युक्त पाणी साचले -NNL

गोदावरी हातमाग सोसायटी मलनिसारण लाईन तुबंल्याने दुर्गंधी युक्त पाणी साचले -NNL

नांदेड
नवीन नांदेड। मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको मोढा प्रकल्प गोदावरी हातमाग सोसायटी मधील मलनिसारण लाईन तूबलेली, दुर्गंधी युक्त पाण्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले असून साचलेल्या पाण्यामुळे किटक, विषारी किडे, साप परिसरात आढळत असून तात्काळ मलनिसारण लाईन साफसफाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या गोदावरी हातमाग सोसायटी सर्वे न 50 मधील भूखंड नंबर 37 ते 43 डबल मलनि :सारण लाईन गेल्या अनेक दिवसांपासून भरली असल्याने दुरंगधी युक्त पाणी परिसरात पसरल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी उघडे ड्रेनेज झाकण उघडेच असल्याने छाकणे टाकावे, व मलनिसारण लाईन त्वरीत जेट मशिन व्दारे साफसफाई करावी, बाबत तक्रारी करूनही संबंधित विभाग दुलक्ष केले आहे. पावसाळ्यात पावसाचे व दुरंगधी युक्त पाण्याने परिसराला वेडा घातला असून ...
हदगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड हबीब मदनी तर उपाध्यक्ष अँड डी एस पाईकराव -NNL

हदगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड हबीब मदनी तर उपाध्यक्ष अँड डी एस पाईकराव -NNL

नांदेड
हदगाव| हदगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड हबीब मदनी उपाध्यक्ष म्हणून डी एस पाईकराव तर सचिव म्हणून अँड दिगांबर सुर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. हदगाव येथील न्यायलयातील सर्व कनिष्ठ जेष्ठ विधीज्ञाच्या दि 20 जून बैठकीत सन 2024 ते 2026 करिता सुर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये पुढील पदाधिका-याची बिनविरोध निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे सहसचिव अँड एम डी बनसोडे. कोषाध्यक्ष अँड आर.एस. डवरे कार्यकारणी सदस्य अँड व्हि.डी.शिदे.अँड वारकड अँड एस यु टिकोरे. अँड डिएस माने अँड एयु. नरवाडे अँड पाईकराव यावेळी जेष्ठ अँड उतमराव टिकोरे अँड डी आर पवार अँड एन एम वाकोडे अँड एमएम गोरे अँड शिवकरण भारती अँड राजकुमार देशमुख अँड साईनाथ नरवाडे जेष्ठ सदस्यानी नुतन पदाधिका-याच निवडीच स्वागत केले....
error: Content is protected !!