Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हिंगोलीचे नवनिर्वाचित खा.नागेश पाटील आष्टीकरांना घ्यावी लागली दुसऱ्यांदा संसदेत शपथ – NNL

हिंगोलीचे नवनिर्वाचित खा.नागेश पाटील आष्टीकरांना घ्यावी लागली दुसऱ्यांदा संसदेत शपथ – NNL

नांदेड, हिंगोली
नवी दिल्ली| उद्धव ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचीत शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत शपथ घेताना यांचा शपथविधी ड़रहावर थांबविण्यात आला असून, अध्यक्षांच्या सूचनेवरून दुसऱ्यांदा लिहून दिलेल्या नुसार शपथ घ्यावी लागली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची झाली होती. या मतदार संघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना होता. यामध्ये ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांचा पराभव केला. त्यानंतर नवी दिल्ली येथील संसदेत सर्वच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान हिंगोली लोकसभेचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शपथविधी सुरु झाला. नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत मराठीत शपथ घेताना शपथेच्या सुरुवातीला म्हटलं की, मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्य...
बाबारमजान गल्लीत आठ आठ दिवस येत नाही नळाला पाणी, न.प.चे दुर्लक्ष; रहिवाशांनी दिला घागर मोर्चाचा इशारा -NNL

बाबारमजान गल्लीत आठ आठ दिवस येत नाही नळाला पाणी, न.प.चे दुर्लक्ष; रहिवाशांनी दिला घागर मोर्चाचा इशारा -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। शहरातील बाबारमजान गल्ली येथे नळांना पाणीच येत नसतांना न.प.च्या ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा केला जाणारे टेंकर पण या वार्डात येत नसून टँकर कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या संगणमताने केला जात असुन आठवड्यातून दोनदा टँकर येतो तर कधी कधी आठवड्यातून एकदाच येतो बाकी वार्डात दररोज टँकर चालू असुन बाबारमजान गल्लीतील जनतेचे म्हणणे आहे. अधिच नळाला पाणी येत नसतांना टँकरद्वारे नियोजीत पाणीपुरवठा करणारे न.पा. कर्मचारी यांना सांगल्यावरही ते टँकर पाठवत नाहीत नळ ही सोडत नाहीत. नवीन पाईपलाईन सुद्धा झालेली आहे ते पण पाणी आतापर्यंत चालू झाले नाही बाबा रमजान गल्ली येथील रहिवासी असलेले सय्यद अजहर यांनी इतर नागरिकांनी लेखी निवेदन न.प. चे मुख्याधीकरी यांना येथील रहिवाशांनी निवेदन देऊन तक्रार सुद्धा केलेली आहे. हर एक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा काम नगरपालिकेचे आहे. या सर्व बाबींची दखल ...
भारतीय स्टेट बँकेचा प्रगतीशील शेतकरी मेळावा नांदेड येथे संपन्न -NNL

भारतीय स्टेट बँकेचा प्रगतीशील शेतकरी मेळावा नांदेड येथे संपन्न -NNL

नांदेड
नांदेड। भारतीय स्टेट बँक क्षेत्रिय कार्यालय नांदेड यांचेवतीने प्रगतीशील शेतकरी मेळावा दि 21.06.2024 रोजी शहरातील नामांकित विसावा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यास शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन श्री भाऊसाहेब बारहाटे, जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांचे हस्ते करण्यात आले, ह्यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय स्टेट बॅंकेचे उपमहाप्रबंधक श्री. प्रियकुमार सरिगला , मुख्य अतिथी श्री दिलीप दमयावार , जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड यांचेसह भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक श्री पक्काला कालीदासु, डाॅ समीर बिलोलीकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. आपले उद्घाटनपर विचार मांडताना जिल्हा कृषी अधीक्षकांनी शेतकर्यांना विविध शासकीय योजनांची माहीती दिली. तर अध्यक्षीय भाषणात श्री सरीगला यांनी कृषी दिर्घमुदत कर्जविषयक मार्गदर्शन केले तसेच शेतक...
मनरेगाचा तांत्रिक अभियंता सोळा वर्षांपासून हिमायतनगर पंचायत समितीला तळ ठोकून कसा ? -NNL

मनरेगाचा तांत्रिक अभियंता सोळा वर्षांपासून हिमायतनगर पंचायत समितीला तळ ठोकून कसा ? -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर। येथील पंचायत समिती कार्यालयात मनरेगा विभागात तांत्रिक अभियंता गेल्या सोळा वर्षांपासून तळ ठोकून बसला असुन, माहूर येथे बदली झाल्यानंतर सहा महिन्यांत परत हिमायतनगर पं.स.ला तांत्रिक अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे. सदरील तांत्रिक अभियंता यांनी एकाच ठिकाणी राहण्यासाठी नरेगा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरले असून, हिमायतनगर पंचायत समितीत तळ ठोकून रहाण्याचे गुड काही वेगळेच असल्याची चर्चा रंगू लागली आहे आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मीनल करनवाल यांनी लक्ष देण्याची मागणी कामानिमित्त या कार्यालयात चकरा मारणाऱ्या लाभार्थी मधून केली जाते आहे.  प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना एका ठिकाणी तिन वर्षाचा कालावधी असतो. याचं पंचायत समिती कार्यालयातील अनेक गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे वास्तव आहे. परंतु हिमायतनगर येथील पंचायत समितीच्...
नांदेड-लातूर लोकसभेत “आळस ” भोवला; विधानसभेत गावागावात “लीड ‘देण्यासाठी सज्ज व्हा -प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड-लातूर लोकसभेत “आळस ” भोवला; विधानसभेत गावागावात “लीड ‘देण्यासाठी सज्ज व्हा -प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड
नांदेड| नांदेडमध्ये जो हलगर्जीपणा झाला तसा जर लोहा विधानसभा मतदारसंघात होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. आपण पराभवानंतर पुन्हा जोमाने उभे राहिलो. माझा पराभव झाला पण त्याचा मी कोणालाही दोष देणार नाही पण कोणी संपत्तीच्या जोरावर येथील निवडणूक जिकतो असे म्हणत असेल तर त्यांनी हा पैसा कसा मार्गाने मिळविला आणि तो आज पर्यंत सुरक्षित आहे याचे काळजी करा. आपण पैसा कमविला नाही पण आपल्या सारखी जीवापाड प्रेम करणारी माणसे कमावली. प्रत्येक गावात जर पंचाहत्तर टक्के मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असाल तरच आपल्या भावनांचा विचार करू असे आवाहन केले. लोहा-कंधार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विक्की गार्डन पारडी येथे "संवाद "बैठकीचे माजी सभापती आनंदराव पाटील व पदाधिकारी यांनी स्वतः याचे आयोजन केले होते. यावेळी ॲड.किशोर देशमुख, कल्याण सावकार सुर्यवंशी, सौ. प्रणिताताई देवरे-चिखलीकर, प्रवीण पाटील चिखली...
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे – सर्वजित बनसोडे – NNL

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे – सर्वजित बनसोडे – NNL

नांदेड
नांदेड| वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने जोमाला कामाला लागावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटन बांधणीचा त्याचबरोबर आगामी विधानसभेची तयारी निमित्ताने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हा दक्षिणच्यावतीने दक्षिण विभागाच्या संपर्क कार्यालयात आज आढावा बैठक संपन्न झाली. तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या यावेळी प्रतिक्रिया घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी सूचना व चर्चा करण्यात आली. यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांची प्रमुख ...
संतोष यादवराव मिसलवार यांचे निधन -NNL

संतोष यादवराव मिसलवार यांचे निधन -NNL

नांदेड
किनवट। येथील लोहार गल्लीतील  रहिवाशी तथा गट शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समितीमधील वरिष्ठ सहाय्यक  संतोष यादवराव मिसलवार ( वय 49 वर्षे )  यांचे रविवारी (ता.23) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले आहे. त्यांचे प्रश्चात पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता.24) सकाळी 11 वा. येथील कैलास मोक्षभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘वृक्षोत्सव पंधरवाडा’ निमित्त वृक्ष लागवड – NNL

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘वृक्षोत्सव पंधरवाडा’ निमित्त वृक्ष लागवड – NNL

नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना व उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० जून ते २४ जून या कालावधीमध्ये वृक्षोत्सव पंधरवाडा निमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात वड, कृष्णवड, पिंपळ पिंप्रन, उंबर, कडुलिंब, अर्जुन, नागकेशर, खैर, रुद्राक्ष, रिटा, हिरडा, बेहडा, आपटा, नारळ, आवळा, अंबा, जांभूळ, बोर, फणस, बकुळ, बेल, पळस, पारिजात इ. विविध वृक्षाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषद सदस्य इंजिनिअर नारायण चौधरी, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, ज्ञानस्त्रो...
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ – NNL

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अतिविलंब शुल्काने आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ – NNL

नांदेड
नांदेड| जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत 17 जून 2024 होती. आता आवेदन पत्र सादर करण्याची विलंब शुल्काची निर्धारित मुदत संपल्यानंतर अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारून आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखांना मुदतवाढ दिली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत रु. 50 प्रतिदिन प्रतिविद्यार्थी याप्रमाणे आहे. सोमवार 24 जून ते 1 जुलै 2024 असा आहे. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत प्रतिदिन 100 रुपये प्रतिविद्यार्थी असून मंगळवार 2 जुलै ते 8 जुलै 2024 पर्यत आहे. अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 200 रुपये प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी याप्रमाणे असून मंगळवार 9 जुलै त...
बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन – NNL

बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन – NNL

नांदेड
नांदेड| श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरी नांदेड यांच्या तर्फे बारावी उर्त्तीण विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) 2024 कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 26 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरी, नांदेड यांच्या मार्फत केले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे, श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नालॉजी विष्णुपूरीचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 12 वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना पुढील शिक्...
error: Content is protected !!