लोहा। लोहा शहरात वाट्टेल तेथे व वाटेल तेवढे दिवस बॅनर कमानी लावण्याची पद्धती रूढ झाली कथित एका घटनेत विधीमंडळात प्रश्न गेला तरीही नगर पालिका प्रशासनाने कोणताही बोध घेतला नाही. उलट पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनीच शहराच्या विद्रुपीकरणाच्या कृतीवर कायदाचा बडगा उगारला .पुन्हा शहरातील बेशिस्त बॅनर पोलिसांनी काढले .शहरातील व्यापाऱ्यांसह जागरूक नागरिकांनी याचे स्वागत केले रस्त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि शहर मोकळे झाले.


नगर पालिकेचा सत्ताधारी काळात जो मनमानी कारभार होता त्यामुळे शहरात वाट्टेल तेथे आणि वाट्टेल तेवढे दिवस रस्त्यावर …दुकाना समोर बॅनर राहत होते. नगर पालिकेने कधीच बॅनर साठी जागा नेमून दिली नाही आणि कधीही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही .केवळ कागदोपत्री न्यायालयाच्या आदेशाचे अहवाल देऊन पालन केले जाते असे कळते.


शहरात बसस्थानक मुख्य चौक, भाजी मंडई या भागात नेहमीच बॅनर अस्ताव्यस्त लावलेले असतात तसेच धार्मिक उत्सव , जयंती निमित्ताने लावलेल्या कमानी यांच्यासाठी कोणतीच काल -वेळ मर्याद नसते. ज्यांना जेवढे दिवस ठेवावे वाटते तेवढे दिवस ते कमानी बॅनर ठेवतात.कोणता अनुचित प्रकार घडला की बॅनर ठेकेदाराला जबाबदार धरतात.पण ठेकेदारही नियमाचे पालन करत नाही त्याच्या मनमानी कारभारामुळे शहरात विद्रुपीकरण होत असते.

बॅनर -कमानी बाबत नियंत्रण नगर पालिका प्रशासनाने ठेवायला पाहिजे पण तसे होत नाही.ठेकेदार ज्या मुदतीसाठी परवानगी देतात त्याची नोंद वा माहिती नगर पालिकेने घेणे क्रमप्राप्त असते.पण खाजगी आडत दुकाना सारखा कारभार या नगर पालिकेचा सुरू आहे. त्यामुळे स्वतः पोलिसांना शहरातील बेशिस्त बॅनर हटविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. पोलीस निरीक्षक चिंचोळकर रुजू झाल्या पासून बेशिस्त बॅनरवर कार्यवाही होते आहे पूर्वी कधीच झाली नाही निद्रिस्त नगर पालिका आजही गांधारी भूमिकेत आहे.

शुक्रवारी दुपार नंतर स्वतः पोलीस निरीक्षक चिंचोळकर व टीमने रस्त्यावरील बेकायदेशीर बॅनर हटविले. कायद्यांचा बडगा उगारला तेव्हा लावणाऱ्याचे डोळे उघडले. लाखो रुपये किराया देणाऱ्या दुकाना समोर पाच -पाच -सहा- सहा दिवस बॅनर लावून दुकान झाकले जाते .त्यामुळे त्याच्या धंद्यांवर परिणाम होतो.यात ना ठेकेदाराने काही जाते नाही बॅनर लावणाऱ्याचे पण .त्रास नाहक दुकानदारांना ..वाहतूकदारांना सोसाव लागतो.
१० ते १२ जणांवर गुन्हे दाखल
पोलिसांनी महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विदृपीकरण अधिनियम 1995 कलम 3, भारतीय दंड विधान कलम 336,283 प्रमाणे १० ते १२ जणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्यांचे बॅनर आहे ज्यांच्यासाठी बॅनर लावले गेले. तसेच ज्यांनी बॅनर लावले ज्यांनी बॅनर छापले या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या संबंधाने तात्काळ शहरांमध्ये पाहणी करून अवैधपणे लागलेले बॅनर काढून घेऊन जप्त केले. कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर फौजदार रोडे पोलीस अमलदार केंद्रे लाडेकर किरपणे साखरे जामकर भाडेकर डफडे गिरे मेकलावाड ईजूळकुंठे शेळके यांनी केली.
ठेकेदारांना त्रास; नगर पालिका गप्पनगर पालिका प्रशासन बॅनर लावण्याचा ठेका पाच वर्षांसाठी सोडला .आणि दोन दिवसात घसघशीत मोठी रक्कम भरून घेतली.पण ठेकेदारांना जागा ठरवून दिली नाही .त्याना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शिवाय काही अनुचित प्रकार घडला ते त्याना पोलीस कार्यवाहीस सामोरे जावे लागत आहे .नगर पालिकेच्या गलथान कारभारमुळे ठेकेदारना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. पैसे घेतले आता स्वरक्षण देणे नगर पालिकेचे कर्तव्य आहे पण तसे होत नाही.तहसीलदार परळीकर यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे व नगर पालिकेच्या ठेकेदारांना सहकार्य करावे ही मागणी ठेकेदारांनी केली आहे.