लोहा शहरा “बेशिस्त” बॅनरवर पोलिसांची कार्यवाही; शहराने सोडला मोकळा श्वास -NNL
लोहा। लोहा शहरात वाट्टेल तेथे व वाटेल तेवढे दिवस बॅनर कमानी लावण्याची पद्धती रूढ झाली कथित एका घटनेत विधीमंडळात प्रश्न गेला तरीही नगर पालिका प्रशासनाने कोणताही बोध घेतला नाही. उलट पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनीच शहराच्या विद्रुपीकरणाच्या कृतीवर कायदाचा बडगा उगारला .पुन्हा शहरातील बेशिस्त बॅनर पोलिसांनी काढले .शहरातील व्यापाऱ्यांसह जागरूक नागरिकांनी याचे स्वागत केले रस्त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि शहर मोकळे झाले.
नगर पालिकेचा सत्ताधारी काळात जो मनमानी कारभार होता त्यामुळे शहरात वाट्टेल तेथे आणि वाट्टेल तेवढे दिवस रस्त्यावर ...दुकाना समोर बॅनर राहत होते. नगर पालिकेने कधीच बॅनर साठी जागा नेमून दिली नाही आणि कधीही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही .केवळ कागदोपत्री न्यायालयाच्या आदेशाचे अहवाल देऊन पालन केले जाते असे कळते.
शहरात बसस्थानक मुख्य चौक, भाजी मंडई या भागात...
