Sunday, July 5

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nanded News : जवळगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेचा शुभारंभ

Nanded News : जवळगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेचा शुभारंभ

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रशासन अधिक लोकाभिमुख करून शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथे उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मोहिमेच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले-प्रमाणपत्रे, जमीन विषयक अभिलेखे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक सुलभ व सोप्या पद्धतीने पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांना शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत प्रशासन व जनता यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा उद्देश या शिबिरामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नागरिकांना आवाह...
Mayor Kavita mule : गुरू नंतर ग्रंथ मार्ग दाखवतात – महापौर कविता मुळे

Mayor Kavita mule : गुरू नंतर ग्रंथ मार्ग दाखवतात – महापौर कविता मुळे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, गोविंद गोडसेलवार | वाचाल तर वाचाल अशी आपली वाचन संस्कृती आहे, आपण गुरूंना मानाच स्थान देतोत, मग ते आई -वडील, शिक्षक असतील, गुरू जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात परंतु गुरू ज्या ठिकाणी मार्ग दाखवत नाहीत, तिथे ग्रंथ मार्ग दाखवतात, म्हणुन ग्रंथ हेच गुरू अस म्हटल जात. असे विचार नांदेड मनपाच्या महापौर कविता मुळे यांनी मांडले त्या नांदेड ग्रंथोत्सव २०२५ च्या उद्घाटना नंतर उद्घाटनपर भाषणात विचार पिठावरून मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. विचार पिठावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, स. ग्रंथालय संचालक अनिल बाविस्कर, राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सुर्यवंशी, प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी, माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, साहित्यिक नारायण शिंदे यांची उपस्थिती होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाल...
Golden rays : मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे ; नांदेडच्या विसावा ऊद्यानात टीपलेले छायाचित्र

Golden rays : मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे ; नांदेडच्या विसावा ऊद्यानात टीपलेले छायाचित्र

नांदेड, फोटो गॅलरी
मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे कोरड्या फांद्यांच्या जाळीतून अलगद झिरपत होती… निसर्ग जणू शांतपणे सांगत होता —अंधार कितीही दाटला तरी प्रकाशाचा मार्ग थांबत नाही. नांदेडच्या माता गुजरीजी विसावा ऊद्यानात टीपलेले छायाचित्र ..... क्षणसाक्षी : छायाचित्रकार विजय होकर्णे 
Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

Maas Marriage Ceremony : सर्व धर्मीय विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-डॉ.संजय पवार

नांदेड, सोशल वर्क
कंधार ( सचिन मोरे) ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. शिवरामजी पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शिवराम पवार मंगल कार्यालय कंधार येथे करण्यात आले असून या विवाह सोहळ्यामध्ये नऊ नवदांपत्य विवाहबद्ध होणार आहेत. या विवाह सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे बहुजन नेते ,ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार यांनी केले आहे. कंधार तालुक्यात शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. शिवरामजी पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व कै.शिवरामजी पवार मंगल कार्यालय कंधारच्या नूतन भव्य इमारतीचे उद्घाटन व सर्व जातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन *१४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कै. शिवरामजी पवार मं...
Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

धार्मिक, नांदेड
नांदेड| राम नवमीच्या पावन पार्श्वभूमीवर नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डी येथे २५ मार्च रोजी भव्य साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी,श्री संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ उमरी (गोरठे),साईं मानव सेवा ट्रस्ट, साईं धाम ट्रस्ट यांच्या सहकार्याने हे भव्य संमेलन पार पडणार आहे. हे संमेलन सर्व साई भक्तांसाठी खुले असून देशभरातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी केले आहे. या संमेलनासाठी मुंबई, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या ...
MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

नांदेड, उमरखेड, राजकीय, हिंगोली
नांदेड/हिंगोली| उमरखेड बायपास हायवेवर काही ट्राफिक पोलिस कर्मचारी वाहनधारकांना विनाकारण अडवून त्रास देत असल्याच्या तक्रारींनी वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण (Police's arbitrary action on bypass? MP Ashtikar's response to traffic..! ) निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अचानक त्या ठिकाणी धडक देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळी पोहोचताच चार-पाच वाहनधारकांना अडवून ठेवलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच खासदारांनी संबंधित ट्राफिक कर्मचाऱ्यांना रोखठोक शब्दांत जाब विचारत चांगलेच खडसावले. शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असताना ती सोडवण्याऐवजी बायपासवर वाहनधारकांना अडवून त्रास देणे कोणत्या नियमात बसते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “जनतेला विनाकारण अडवणे, धाक दाखवणे किंवा त्रास देणे अजिबात सहन केले जाणार नाही,” असा कडक ...
Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नाली बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या नाली बांधकामाला भगदाड पडल्याने ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. हा प्रकार चर्चेत येऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराने तातडीने भगदाडावर मटेरियल टाकून थातूरमातूर दुरुस्ती करत बोगस कामावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परिसरातील व्यापारी व नागरिकांनी केला आहे. हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नालीचे काम गेल्या महिण्यापासून सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नाली बांधल्यानंतर मजबुतीसाठी नियमित पाणी टाकण्याची प्रक्रिया होत नसल्याने आतापर्यंत तीन ते चार ठिकाणी नालीला भगदाड पडले असून, अनेक ठिकाणी तडेही गेले आहेत....
Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

कृषी, नांदेड
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी १३ मार्च २०२६ रोजी सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ व १७ मार्च २०२६ या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. १६ व १७ मार्च २०२६ हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील व...
Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

कृषी, नांदेड
मुंबई | राज्यात १७ ते २० मार्चदरम्यान काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने दुपारनंतर आभाळ दाटून येत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून, ठिकठिकाणी गारपीटही होऊ शकते. विशेषतः १८ ते २० मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटी...
hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहरातील विविध वीज समस्यांबाबत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाने शुक्रवारी लेखी स्वरूपात ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मीराशे यांनी आपले आमरण उपोषण दिनांक 13 शुक्रवारी मागे घेतले. हिमायतनगर येथील महावितरण उपविभागीय कार्यालयासमोर ९ मार्च २०२६ पासून विविध मागण्यांसाठी वामनराव पाटील मीराशे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत १२ मार्च रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता व स्थानिक अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आंदोलकांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हिमायतनगर शहरात आरडीएसएस (RDSS) यो...
error: Content is protected !!