Saturday, July 11

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

श्रावण मासानिमित्त शिवजयंती उत्सव समिती मांडवी तर्फे दिनांक 17 ऑगस्ट रोजी मांडवी ते उनकेश्वर पदयात्रेचे आयोजन -NNL

श्रावण मासानिमित्त शिवजयंती उत्सव समिती मांडवी तर्फे दिनांक 17 ऑगस्ट रोजी मांडवी ते उनकेश्वर पदयात्रेचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
किनवट, परमेश्वर पेशवे। हिंदू धर्मामध्ये पवित्र मास म्हणून श्रावण महिन्याकडे बघितले जाते . या श्रावण मासामध्ये भगवान शिवशंकराची आराधना उपासना केली जाते. हजारो भाविक भक्त गण श्रावण सोमवारी वेगवेगळ्या शिवमंदिरामध्ये शिवालयामध्ये गर्दी करत असतात. तर काही शहरातून गावामधून पायी कावड यात्रा ही काढली जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्सव समिती मांडवी च्या वतीने मांडवी ते उनकेश्वर असे पायी कावड यात्रेचे भव्य दिव्य आयोजन दिनांक 17 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या पायी कवडयात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश शेंडे, सचिव हर्षल शेंडे, शिवभक्त दीपक जयस्वाल, गजानन शेंडे, सुनील राठोड सर, सुनील दादा श्रीमनवार चंदन मांडण, अमोल जयस्वाल, पिंटू जयस्वाल, आशिष जयस्वाल, नितीन ठाकूर, या सर्व शिवभक्तांनी या पायी कावड यात्रेमध्ये परिसरातील सर्व भ...
Trying to make the old pole new by painting it : महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड; जुन्या पोलला रंग लावून नवा करण्याचा प्रयत्न -NNL

Trying to make the old pole new by painting it : महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड; जुन्या पोलला रंग लावून नवा करण्याचा प्रयत्न -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील महावितरण कंपनीकडून होत असलेली विकास कामे ही बोगस व निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड सातत्याने होत आहे. अश्यातच हिमायतनगर ते पळसपूर रोड वरील विद्युत पोल उभारणीच्या कामात जुन्या पोलला रंगरंगोटी करून ते पोल उभारण्यात येत असल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. हिमायतनगर ते पळसपूर रस्त्यावर असलेल्या मो.सलीम मो.यासिन यांच्या शेताजवळ महावितरण कंपनीचे पोल उभारणीचे काम चालू आहे. त्यासाठी हिमायतनगर शहरानजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ नव्या पोलमध्ये काही जुने पोल ठेऊन त्याला रंगून ते उभे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी तथा समाजीक कार्यकर्ता शेख सलीम यांनी जायमोक्यावर जावून उपरोक्त कामाची माहिती घेण्यासाठी गेले असता, तिथे जिर्ण झालेले लोखंडी पोलाच रंग लावले जात होते. हे विचारल्यास पोल...
प्रशासकीय सेवेनंतर माजी सैनिक प्रकाश जाधव यांची सामाजिक कार्याकडे वाटचाल -NNL

प्रशासकीय सेवेनंतर माजी सैनिक प्रकाश जाधव यांची सामाजिक कार्याकडे वाटचाल -NNL

नांदेड, सोशल वर्क
शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील मौजे दयाळ धानोरा येथील प्रकाश जाधव यांनी अनेक वर्षे देशाच्या सीमेवर देश सेवा केल्यानंतर हिमायतनगर/ हदगाव तालुक्याच्या महसूल विभागात तलाठी म्हणून कार्य केले.तर नांदेड येथे नुकतेच संपन्न झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालया कडून आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त प्रकाश जाधव यांची जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी सहपत्नीक स्वागत सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. देश सेवा प्रशासकीय सेवेनंतर आता माजी सैनिक प्रकाश जाधव यांनी तलाठी पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर समाजसेवा करण्याचे ठरविले असून. याची सुरुवात दि.१० आगस्ट शनिवार रोजी मौजे गोंडजेवली तांड्याच्या शाळेवर स्वखर्चाने 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत पन्नास झाडांची लागवड करत आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली आहे.या वेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष राठोड,सरपंच सुधाकर जाधव,जयसिंग राठोड,...
Greetings from Guardian Minister Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश -NNL

Greetings from Guardian Minister Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश -NNL

महाराष्ट्र, नांदेड
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाला नांदेड जिल्हयातील सर्व मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्राममधील स्वातंत्र्य सैनिक, सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना मी अभिवादन करतो. आज आम्ही भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. लाखो लोकांच्या बलिदानानंतर हा दिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच साजरा झाला. आपली लोकशाही हळूहळू प्रौढ होत असून आम्ही आणखीन जाणीव, जबाबदारीने काम करावे, असे संकेत यातून दिले जात आहेत. स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊन आमची वाटचाल असली पाहिजे. घटनेच्या परिघात राहून स्वातंत्र्याचा समान उपभोग घेणे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. थोडक्यात स्वातंत्र्य ही जबाबदारीही आहे. देशातील समस्या, देशातील परिस्थिती यावर टीकाटिपणी करण्याचा आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र सोबतच आपण ...
Independence Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

Independence Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| येथील तहसील, पोलीस ठाणे, नगरपंचायतसह शहर व ग्रामीण भागातील सर्वच शासकीय- निमशासकीय कार्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तिरंगा ध्वज फडकवून जल्लोषपूर्ण वातावरणात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. हिमायतनगर शहरातील दिवाणी न्यायालयात न्यायाधीश श्री किरणकुमार खोंद्रे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. शहरातील पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक अमोल भगत यांच्या हस्ते सकाळी ७.०५ वाजता तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी शहरातील अनेक मान्यवर, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती जनार्धन ताडेवाड यांच्या हस्ते. ग्रामीण रुग्नालयात वैद्यकीय अध...
Dr. Rekhatai Chavan : श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मंदिरात आयोजित रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा लाभ घ्यावा – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

Dr. Rekhatai Chavan : श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मंदिरात आयोजित रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा लाभ घ्यावा – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात दि.१९ ऑगस्ट रोजी येणाऱ्या तिसऱ्या श्रावण सोमवारी भव्य महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. रेखाताई चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी जास्तीस्त जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासावी असे आवाहन डॉ. रेखाताई चव्हाण यांनी केले आहे. डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर प्रभारी महिला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्षा नांदेड यांच्यावतीने पवित्र श्रावण मासानिमित्ताने हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी असलेल्या जागृत देवस्थान महादेव मंदिरात अन्नदान व विविध सामाजिक उपक्रम राबवून श्रावण मास उत्सवाचा आनंद द्विगुणित केला ...
National Sports Day Organization of Sports Week : राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजन -NNL

National Sports Day Organization of Sports Week : राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजन -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगष्ट, 2024 रोजी साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून याकरीता जास्तीत खेळाडूंनी सहभाग घ्यावा. तसेच सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त खेळाडुनी आपल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत व नावे 25 ऑगस्ट 2024 पर्यत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे जमा करावी. अधिक माहितीकरीता श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी संपर्क, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने ऑलम्पिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच...
ISO Certification ; लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन – NNL

ISO Certification ; लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| लोहा पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. यापूर्वी नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. इतर पंचायत समितीने देखील प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र गटविकास अधिकारी यांना प्रदान करण्यात आले. लोहा पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी का...
Raju Gaikwad ; दिघीच्या रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी राजु गायकवाड यांनी केली थेट मंत्रालयात मागणी – NNL

Raju Gaikwad ; दिघीच्या रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी राजु गायकवाड यांनी केली थेट मंत्रालयात मागणी – NNL

Blog, नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे दिघी येथील गावकर्यांना दूषित पाण्याचा सामना करत जीवन यापन करावे लागत आहे. हि बाब हेरून गावातील तरुण युवक राजुभाऊ गायकवाड यांनी थेट मंत्रालय गाठून झालेल्या कामाबद्दल शंका व्यक्त केली आहे. तसेच तात्काळ गावकऱ्यांची होणारी दूषित पाण्याची परवड थांबवावी अशी मागणी निवेदन येऊन केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी या गावातील नागरिकांना पैनगंगा नदीचे अशुद्ध पाणी पिऊन जिवन जगव लागतं आहे. सन 2015/16/17 वर्षी पाणी पुरवठा विभाग अंतर्गत 52 लक्ष रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याचे कामं देखील करण्यात आले होते. परंतु गुत्तेदार व संबंधित अधिकारी यांनी थातुरमातुर बोगस काम करुन रहिवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले आहे. आज घडीला नदीचे दुशीत पाणी पिण्याची वेळ संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांच्यामुळे दिघी येथील नागरिकांवर आली आहे. सदरील ...
error: Content is protected !!