Homeनांदेड"कौन बनेगा नांदेड का एमपी" या स्पर्धेत दहा जणांची निवड - धर्मभूषण...

“कौन बनेगा नांदेड का एमपी” या स्पर्धेत दहा जणांची निवड – धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर NNL

नांदेड| अत्यंत चुरशीच्या लढतीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे ५९४४२ मतांनी विजयी झाल्यामुळे ” कौन बनेगा नांदेड का एमपी ” या स्पर्धेत त्यांच्या बाजूने ८९१ स्पर्धकांनी कोल दिला असला तरी नेमके मताधिक्याचा आकडा एकाही स्पर्धकाला अंदाज करता न आल्यामुळे ५९४४२ मतांच्या जवळपास असणाऱ्या दहा जणांची निवड करण्यात आली असून त्यांना रविवार दि.९ जून रोजी पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने या स्पर्धेचे मोफत आयोजन करण्यात आले होते. एसएमएस द्वारे २३२० तर पोस्टाद्वारे ०६ अशा एकूण २३२६ प्रवेशिका प्राप्त झालेल्या होत्या. त्यामध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी होतील असा विश्वास १४३२ मतदारांनी व्यक्त केला होता. काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या बाजूने ८९१ स्पर्धकांनी कोल दिला होता.३ मतदारांनी वंचित बहुजन महासंघाचे अविनाश भोसीकर हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला होता.

बहुसंख्य स्पर्धकांनी दहा हजार ते पन्नास हजारा पर्यंत लीड राहील असा अंदाज व्यक्त केला होता.५९४४२ लीडच्या जवळपासची संख्या प्रवेशिकात नमूद करणाऱ्या खालील दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुराग देवणे नांदेड,रंगनाथ कांबळे जुना कौठा, संभाजी पुयड बारड,शेख इस्माईल शेख पाशा नांदेड, देवराव वराळे सोनखेड,, नेताजीराव भोसले थुगाव,ॲड.गौरव सरोदे अर्धापूर, शिवरत्न लोखंडे नांदेड,अनिल लोखंडे गवतवाडी ,अभयकुमार दांडगे नांदेड यांचा समावेश आहे.

यशस्वी ठरलेल्या या दहा मध्ये अभयकुमार दांडगे,शिवरत्न लोखंडे,ॲड.गौरव सरोदे या तीन पत्रकारांचा समावेश आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक नेताजीराव भोसले यांनी देखील स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे. रविवार दि.९ जून रोजी रात्री ७.३० वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे विश्वचषक क्रिकेट सामन्याचे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात येणार आहे त्यावेळी या सर्व स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments