“कौन बनेगा नांदेड का एमपी” या स्पर्धेत दहा जणांची निवड – धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर NNL
नांदेड| अत्यंत चुरशीच्या लढतीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे ५९४४२ मतांनी विजयी झाल्यामुळे " कौन बनेगा नांदेड का एमपी " या स्पर्धेत त्यांच्या बाजूने ८९१ स्पर्धकांनी कोल दिला असला तरी नेमके मताधिक्याचा आकडा एकाही स्पर्धकाला अंदाज करता न आल्यामुळे ५९४४२ मतांच्या जवळपास असणाऱ्या दहा जणांची निवड करण्यात आली असून त्यांना रविवार दि.९ जून रोजी पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने या स्पर्धेचे मोफत आयोजन करण्यात आले होते. एसएमएस द्वारे २३२० तर पोस्टाद्वारे ०६ अशा एकूण २३२६ प्रवेशिका प्राप्त झालेल्या होत्या. त्यामध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी होतील असा विश्वास १४३२ मतदारांनी व्यक्त केला होता. काँग...
