HomeनांदेडBhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji's | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20...

Bhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji’s | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20 पासून – NNL

नांदेड| उत्तराखंडमधील ओखीमठ येथील जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा 52 वा गुरुपोर्णिमा कार्यक्रम नवीन नांदेड, गोपाळचावडीमधील भीमाशंकरनगर येथील श्री गुरु दशमुख आश्रम येथे दि. 20 व 21 जुलै असे दोन दिवस होणार आहेत. यामध्ये संगीतयुक्त इष्टलिंग महापूजा, धर्मसभा आणि महाप्रसाद होणार आहे.

श्री गुरु दशमुख आश्रम सद्भक्त मंडळी आणि भीमाशंकर गृहनिर्माण संस्था यांनी एका पत्रकात ही माहिती दिली. शनिवार, दि. 20 जुलै रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत होमहवन व दीक्षा कार्यक्रम होणार आहे. रविवारी, दि. 21 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत संगीतयुक्त इष्टलिंगपूजा, दुपारी बारा वाजता श्री संगमेश्‍वर गुरुकुलचे उद्घाटन, त्यानंतर धर्मसभा आणि देशातील गणमान्य मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.

तर दुपारी दोन ते सहा या वेळेत महाप्रसाद व दर्शन हे कार्यक्रम होणार आहेत. तरी, भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments