Gitanjali Shelke ; ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळाचा अनावरण सोहळा – गीतांजली शेळके यांची माहिती – NNL
मुंबई | जीएस महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. अॅड. उदय शेळके यांच्या नावाने सुरू होणाऱ्या उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळ अनावरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती महानगर व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांनी दिली आहे.
याविषयी माहिती देताना शेळके म्हणाल्या की स्व. गुलाबराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एस. महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून काम करताना सहकार व सामाजिक क्षेत्रात स्व. अॅड. उदय शेळके यांचा नेहमीच पुढाकार होता. तो सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सुरुवात करणार आहोत. या फाउंडेशनच्या माध्यमातून ...









