Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Marathwada shaken : लाचखोर आयुक्तांमुळे मराठवाडा हादरला 
नांदेड लेख October 22, 2025

Marathwada shaken : लाचखोर आयुक्तांमुळे मराठवाडा हादरला 

NNL TeamBy NNL TeamOctober 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link
मराठवाड्यातील जालना जिल्हा गेल्या वर्ष – दीड वर्षापासून सातत्याने चर्चेत आहे . मराठा – ओबीसी संघर्षाची सुरुवात देखील याच जालना जिल्ह्यातून झाली . त्यानंतर सबंध राज्यात या आंदोलनाची धग  पोहोचली. त्यामुळे जालना जिल्हा हा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा जिल्हा राहिला. आता जालन्यातील मनपा आयुक्तांना दहा लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याने मराठवाडाच राज्याच्या चर्चेत आला. जालनातील लाचखोर आयुक्तांमुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर या भ्रष्टाचाराची चर्चा रंगली. महापालिका आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना दहा लाख रुपयांची लाच घेताना पकडल्याचे हे मराठवाड्यातील पहिलेच प्रकरण आहे.
शासन मराठवाड्यात वेगवेगळ्या योजना राबवून विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनही हात मोकळे सोडून पैसा खर्च करत आहेत. पैसा म्हटले की, शासकीय यंत्रणा आलीच. परंतु शासकीय यंत्रणेला हलविण्यासाठी ‘गांधींजी शिवाय’ पर्याय राहिलेला नाही. मराठवाडा हा दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचा हिमनग म्हणून समोर येत आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात टेबलाखालून किंबहूना टेबलावर पैसे दिल्याशिवाय पानही हालत नाही. साधे तहसील कार्यालयात काम असले तरी पैसे मोजल्या शिवाय कुठलेही काम होत नाही. केवळ तहसील कार्यालयच नव्हे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, समाजकल्याण विभाग, पोलीस खाते, वाहतूक शाखा, महामार्ग पोलीस, पाटबंधारे विभाग आदी सर्वच ठिकाणी चपराशापासून उच्च पदस्थ अधिकार्‍यांपर्यंत एखादे काम करून घ्यायचे असेल तर पैसे मोजावे लागतात.
मराठवाड्यातील जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना देखील एका कंत्राट दराने कामाच्या मोबदल्यात 10 लाख रुपयांची लाच देऊ केली . संबंधित आयुक्तांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणामुळे मराठवाड्यात मोठी खळबळ उडाली. महापालिकेतील विविध विकास कामांच्या बिलांची रक्कम मंजूर करण्यासाठी मनपा आयुक्त खांडेकर यांनी लाच मागीतली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मराठवाड्यात लाचखोर अधिकारी खूप सापडतील. लाच घेतल्याशिवाय कुठलेही काम करायचे नाही, असा पवित्रा अनेक अधिकारी व कर्मचारी घेत असतात. सर्वसामान्य व गोरगरिबांची कामे वेळेच्या आत कधीच होत नाहीत. एकीकडे सर्व महत्त्वाची कागदपत्रे डिजीटल स्वरुपात मिळतील, असा गवगवा केला जातो. परंतु डिजीटलायझेशन करूनही शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची काम रोखून धरण्याची पद्धत व लाच खाण्याची सवय कमी होत नाही. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये विकासासाठी खर्च करतो, परंतु ती कामे पूर्ण करून घेण्यासाठी तसेच केलेल्या कामाचे बिल काढून घेण्यासाठी पैसे मोजावेच लागतात, असे जालना येथील प्रकरणावरून दिसून येते. लाच खाण्याची सवय जुनीच आहे.
काही लाचखोर अधिकार्‍यांना दररोज घरी पैसे नेल्याशिवाय जमतच नाही. असे अधिकारी कधी कायद्याच्या कचाट्यात सापडले तरीही अशा अधिकार्‍यांची पुढे जाऊन न्यायालयातूनही सुटका कशी होते, असा प्रश्न समाजाला पडलेला असतो. न्यायालय  अशा अधिकार्‍यांना कडक शिक्षा देऊ शकत नाही का? किंबहूना लाचखोरांना चांगली अद्दल न्यायालयाने घडवावी , अशी समाजाची अपेक्षा असते. परंतु न्यायालयाने लाचखोरांना कठोर शिक्षा दिल्याचे ऐकिवात नाही. पैसे खाणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करणारे लाचलुचपत विभागही कुठेना कुठे मळून असतो, अशीही समाजातून टिका होत असते. शेवटी सर्वजणच पैशाच्या मागे धावत आहेत. त्यामुळे पैसा खाल्ल्याशिवाय जमणारच नाही, या अविर्भावात अनेकजण जगत असतात. माणसाला शेवटी दोन वेळचे जेवण व सुखाची झोप आवश्यक असते. परंतु लाच खाण्याची सवय लागलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना पैसा खाल्ल्याशिवाय झोपच लागत नसावी. जालना महापालिका आयुक्तांना 10 लाखांची लाच घेताना पकडल्यानंतर लाचखोर अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाच खाणारे हे मराठवाड्यातील महापालिकेचे पहिलेच प्रकरण ठरावे.
ज्या कंत्राटदारांने 10 लाखांची लाच देऊ केली त्यांने नक्कीच सदरील कामात ऊन्नीस-बिस केलेलेच असणार. कुठेनाकुठे कामात हलगर्जीपणा करून त्याच कामातून 10 लाख रुपये बाजूला काढत मनपा आयुक्तांची तिजोरी भरण्याचा तो प्रयत्न होता, असा कयास लावला जात आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले. याचाच अर्थ मनपा आयुक्तांवर केलेली कारवाई कुठेनाकुठे यशस्वी झाली याचा आनंद तक्रारकर्त्याला झाला. फटाके फोडून आनंद व्यक्त करणे म्हणजे त्या यंत्रणेवर ठेवलेला विश्वास यशस्वी झाला, असेही त्यांना वाटत असावे. कारण आजकाल एखाद्या मोठ्या अधिकार्‍यांची तक्रार जरी केली तरी, त्याचे कुणीही वाकडे करू शकत नाही, अशी अनेकांची धारणा असते. शेवटी अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना सांभाळणारे केाणी ना कोणी राजकारणी असतात. राजकारणी पैशाचे भूकेले असतात, असा अनेक शासकीय अधिकार्‍यांचा आरोप असतो. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे राजकीय सूत्र सांगितले जाते. त्यामुळे काम करण्यासाठी व काम आणण्यासाठी शेवटी पैसा मोजावाच लागतो.
ही समाजाची रितच होऊन बसली आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी काही दिवस मोहिम राबवून चालणार नाही, तर त्यासाठी न्यायालयाने भ्रष्टाचार्‍यांना कडक शिक्षा करावी, अशी समाज मनाची अपेक्षा आहे. न्यायालयाला कठोर कायदा करून शिक्षा देण्यासाठी  संसदेची मान्यता असणे गरजेचे ठरते. शेवटी हा विषयही राजकारणी लोकांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे कुठलाही कायदा होण्यासाठी राजकीय पुढार्‍यांची संमतीही आवश्यकच ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तशी अपेक्षा करता येईल. परंतु शेवटी पैशाचा विषय असल्याने ते एकटे तरी काय करणार? जालना येथील मनपा आयुक्तांनी घेतलेल्या लाच प्रकरणामुळे मराठवाडा हा पुन्हा एकदा बदनाम झाला आहे. या ठिकाणी अधिकारी देखील मोठे निर्ढावलेले आहेत. अशा निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून तसे उदाहरण समाजासमोर आल्याशिवाय या अधिकाऱ्यांची लाचखोरवृत्ती बदलणार नाही ,एवढे मात्र निश्चित.
डॉ.अभयकुमार दांडगे, abhaydandage@gmail.com मराठवाडा वार्तापत्र
by corrupt commissioner Marathwada shaken
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDisappointment even in Diwali : दिवाळीतही निराशा — झेंडू फुलांना कवडीमोल दर; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता
Next Article The road : ढाणकी मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प — महिनाभरानंतरही दुरुस्तीचा मागमूस नाही
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The work of laying soil mixed mud started | हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर माती मिश्रित मुरूम अंथरण्याच्या कामाला सुरुवात; प्रशासकीय यंत्रना मूग गिळून गप्प – NNL

July 18, 2024

youth festival ; युवक महोत्सवातील कव्वाली कला प्रकारास प्रेक्षकांची दाद – NNL

October 20, 2024

Former MLA Subhash Sabane ; माजी आमदार सुभाष साबणे यांनी तिसऱ्या आघाडीत केला जाहीर प्रवेश – NNL

October 20, 2024

Organized free training camp | शालेय तायक्वॉदो स्पर्धेनिमित्त मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – NNL

July 31, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sakal Divyang : सकल दिव्यांग संघटनेचा सहाव्या टप्प्यातील अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद बोंढरकर यांच्या थेट कार्यालयावर

Corruption in Mahur Forest Inspection : माहूर वन परिक्षेञात झालेल्या कामांत भ्रष्टाचार – रवि राठोड

Cattle theft gang remanded : गोवंश चोरी करणाऱ्या टोळक्याला कुशावाडी येथील बैल चोरी प्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी

Pani ; “अभिनेता आदिनाथ कोठारे याचा “पाणी”चित्रपट आज प्रदर्शित : नागदरवाडी” च्या बाबुराव केंद्रे याची जीवन कहाणी -NNL

Vasantrao Naik College : वसंतराव नाईक महाविद्यालयात ‘वसंत दर्पण’ भित्तीपत्रकाचे प्रकाशन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?