नांदेड| अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याकडून होत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत “विराट रूमने मोर्चा” काढण्यात आला.
या मोर्च्यात प्रमूख उपस्थिती जिल्हा म बँकेचे संचालक मा. बाबुरावजी कोंडेकर, काँग्रेसजिल्हा कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब रावणगावकर, तालुकाध्यक्ष आर्धापुर सुनील वानखेडे, मुदखेड प्रताप देशमुख, नांदेड निरंजन पावडे, लक्ष्मण देवदे, शहराध्यक्ष कैलाश गोडसे संदीप गौड, मुजीब पठाण,परसराम जाधव, मारोती तिडके यांनी प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आम्ही ऊस उत्पादक शेतकरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांच्या नेतृत्वात प्रयत्न करत होतो. मात्र कारखाना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षात सदर कारखान्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. उसाला योग्य भाव न देण्यापासून ते अनेक कारणांनी या कारखान्याच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरू आहे. मोर्चात प्रचंड दबाव देऊनही शेतकचा लक्षणीय सहभाग होता. यावरून मागण्यांची तीव्रता लक्षात येते. यावेळी कारखाना प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात आम्ही पुढील मागण्या केल्या असून त्या विनाविलंब लागू करण्याच्या सूचना दिल्या आहे. उसाला किमान ३२००/- ₹ प्रती टन इतका भाव द्यावा, ऊस लागवड केल्यापासून १४ महिन्यांच्या आत ऊसतोड करावी. ऊसतोड केल्यापासून १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे. उसबिलाच्या थकीत हप्त्यांचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. कारखान्यावर ०२ वर्षांपेक्षा अधिक काळ कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम (पर्मनंट) सेवेत घ्यावे.
उसाचे वजन शेतकऱ्यांना कारखान्याबाहेरील काट्यावर करण्याची मुभा देण्यात यावी. ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी व शेअर होल्डर यांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता बारावी पर्यंत मोफत शाळा सुरू कराव्या. या मागण्या घेऊन बालाजी गाढे पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या भव्य रुमणे मोर्चाने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले.
जिल्ह्यातील मोठ्या पुढाऱ्याच्या राजकीय वरदहस्तामुळे या कारखान्याविषयी आणि मागण्यांविषयी इच्छा असूनही कोणीही काहीही बोलत नव्हते; त्या नेत्याच्या एकाधिकारशाहीला आणि मुजोरीला सुरुंग लावण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शेतकऱ्यांच्या आक्रोशाला व्यासपीठ मिळाले. आम्ही निवेदनात नमूद केलेल्या मागण्या विनाविलंब लागू न झाल्यास गाओगावी लोकशाही मार्गाने आम्ही भावा बद्धल प्रश्न विचारू आणि याहीपेक्षा मोठे जन आंदोलन उभे करू असा इशारा कारखाना प्रशासनाला शेतकऱ्यांच्या वतीने दिला आहे.
या मोर्चा यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर मगरे, संतोष कपाटे,प्रशांत मुंगल,रवींद्र डाधाळे, संग्राम देशमुख, विलास कल्याने, हनुमान लखे, माधव गाढे, संभाजी दरेगावकर, शिवम मगरे,शरद पवार , शूभम मगरे ,नीळकंठ पुप्पलवाड, बापूजी गाढे, नंदकिशोर पवार, महेश पवार यांच्या सह आदी कार्यकर्त्याने परिश्रम घेतले. बालाजी गाडे पाटील, अध्यक्ष, नांदेड जिल्हा युवक काँग्रेस