Youth Congress : युवक काँग्रेसचे बालाजी गाढे यांच्या नेतृत्त्वात भाऊराव चव्हाण साखर कारखान्यावर धडकला मोर्चा -NNL
नांदेड| अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याकडून होत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत "विराट रूमने मोर्चा" काढण्यात आला.
या मोर्च्यात प्रमूख उपस्थिती जिल्हा म बँकेचे संचालक मा. बाबुरावजी कोंडेकर, काँग्रेसजिल्हा कार्याध्यक्ष मा. बाळासाहेब रावणगावकर, तालुकाध्यक्ष आर्धापुर सुनील वानखेडे, मुदखेड प्रताप देशमुख, नांदेड निरंजन पावडे, लक्ष्मण देवदे, शहराध्यक्ष कैलाश गोडसे संदीप गौड, मुजीब पठाण,परसराम जाधव, मारोती तिडके यांनी प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आम्ही ऊस उत्पादक शेतकरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी गाढे पाटील यांच्या नेतृत्वात प्रयत्न ...
