Homeनांदेडअखेर आनंद नगर चौका लगतच्या सीसी रोडच्या कामाला दोन वर्षानंतर मुहूर्त मिळाला

अखेर आनंद नगर चौका लगतच्या सीसी रोडच्या कामाला दोन वर्षानंतर मुहूर्त मिळाला

नांदेड| दोन वर्षांपूर्वी पासून अर्धवट ठेवलेले सीसी रोडचे काम उशिराने का होईना सुरू करण्यास दिनांक 24 ऑगस्ट रोजी प्रशासनाला मुहूर्त मिळालेला आहे. ही बाब प्रभाग क्रमांक चारच्या नागरिकांसाठी आनंदाची मानली जात आहे.

आनंद नगर चौक ते शोभा नगर रोड वर एकदा डांबरीकरणाचे आणि दुसऱ्यांदा काँक्रीट चा रोड बनविण्याचे काम झालेले आहे. परंतु चौकालगतचा काही भाग नगरसेवकांच्या व प्रशासनाच्या तांत्रिक व मानसिक अडचणीमुळे प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परिसरातील लोकांना फार त्रास सहन करावा लागला.

अनेकांना या खड्ड्यांमध्ये अपघातग्रस्त व्हावे लागले. पण मागील टर्ममधील नगरसेवकांच्या व या टर्म मधील नगरसेवकांच्या आणि प्रशासनाच्या आशीर्वादामुळे हाडांच्या डॉक्टरांचं मात्र चांगभलं झालं. अनेकदा वर्तमान पत्रांमध्ये नागरिकांचे म्हणणे व त्रास प्रतिबिंबित झाला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागील दहा महिन्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लवकरच या रोडचे काम होईल असे आश्वासन दिले होते.परंतु संबंधितांना तत्परतेने दखल घेण्याची गरज वाटली नसावी, म्हणूनच हा विलंब झाला, असेही म्हणता येईल. तरीपण ,

“देर आये ,दुरुस्त आये !”
हा मूर्त काढण्यासाठी प्रभाग क्रमांक चार चे नगरसेवक प्रशांत अण्णा तिडके, महानगरपालिकेचे प्रशासन यांचे शेवटच्या काळातील योगदान यशस्वी ठरले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments