HomeनांदेडLaxman Sangewar : नांदेड मर्चंट्स को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण संगेवार

Laxman Sangewar : नांदेड मर्चंट्स को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण संगेवार

नांदेड| दि नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे तत्कालीन अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज (दि. ८) जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कुमार बारकुल यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत बँकेचे ज्येष्ठ संचालक व विद्यमान उपाध्यक्ष लक्ष्मण बळीराम संगेवार यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

६३ वर्षांची गौरवशाली सेवा परंपरा लाभलेल्या या बँकेच्या संचालक मंडळाची बैठक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी कुमार बारकुल यांनी अध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा करून त्याची नोंद कार्यवाहीत केली. या प्रक्रियेत सहाय्यक अधिकारी स्वाती पटके व सय्यद शब्बीर यांनी सहकार्य केले.

यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, संचालक ज्ञानेश्वर महाजन, संचालिका वसुधा तगडपल्ले, उमे जालनेकर, रविकुमार कासलीवाल, ओमप्रकाश राखेवार, गणेश चिटमलवार, दीपक चन्नावार, सुनील मानधनी, अरुण चालिकवार, मनीष काला, हरिहर च. धुतमल, मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर व प्रशासन अधिकारी प्रतिभा देशमुख आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण संगेवार यांचे अभिनंदन व स्वागत केले.

दि नांदेड मर्चंट्स को-ऑप बँकेच्या राज्यभरात २१ शाखा कार्यरत असून, निकषांनुसार ती उत्तम श्रेणीतील बँक म्हणून ओळखली जाते. सध्या बँकेकडे ८१४ कोटी रुपयांच्या ठेवी असून ५०४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. मार्च २०२५ अखेर बँकेने ७ कोटी रुपयांचा नफा मिळवला असून, निव्वळ थकबाकी शून्य टक्के असल्याने वसुलीबाबत काटेकोर व विश्वासार्ह बँक अशी तिची ओळख आहे.

दोन नवीन शाखा व व्यवसायवाढीचे उद्दिष्ट – संगेवार – जिल्ह्यातील पहिली नागरी बँक असा लौकिक असलेल्या मर्चंट्स बँकेने यूपीआय, मोबाईल बँकिंगसारख्या आधुनिक सुविधा सर्वप्रथम उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच दोन नवीन शाखा सुरू करण्यात येणार असून, कर्मचारी व संचालकांच्या सहकार्याने बँकेचा व्यवसाय अधिक वाढवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण संगेवार यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments