Sunday, June 28

Tag: of Nanded Merchants Co-op Bank

Laxman Sangewar : नांदेड मर्चंट्स को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण संगेवार

Laxman Sangewar : नांदेड मर्चंट्स को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण संगेवार

नांदेड
नांदेड| दि नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे तत्कालीन अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज (दि. ८) जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कुमार बारकुल यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत बँकेचे ज्येष्ठ संचालक व विद्यमान उपाध्यक्ष लक्ष्मण बळीराम संगेवार यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ६३ वर्षांची गौरवशाली सेवा परंपरा लाभलेल्या या बँकेच्या संचालक मंडळाची बैठक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी कुमार बारकुल यांनी अध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा करून त्याची नोंद कार्यवाहीत केली. या प्रक्रियेत सहाय्यक अधिकारी स्वाती पटके व सय्यद शब्बीर यांनी सहकार्य केले. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, संचालक ज्ञानेश्वर महाजन, संचालिका वसुधा तगडपल्ले, उमे जालने...
error: Content is protected !!