Thursday, May 14

Nanded police action: नांदेड जिल्हयातील 06 पथकाकडुन अवैध धंदयावर एकुण 25 केसेस दाखल -NNL

नांदेड। पोलीस उप महानिरीक्षक, शहाजी उमाप यांनी नांदेड परीक्षेत्रातील चारही जिल्हयातील पोलीस अधिक्षक यांना दिनांक 14/08/2024 रोजी त्यांचे जिल्हयात अवैध धंद्दयावर कार्यवाही करुन अवैध धंदे करणायाचे समुळ उच्याटन करण्याकरीता आरोपी विरुध्द कार्यवाही करण्यासाठी पथक नेमण्याचे आदेश दिलेले होते.

त्यावरुन मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड जिल्हा यांनी नांदेड जिल्हयात अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी एकुण 06 पथक तयार करुन त्यांना नांदेड जिल्हयात चालनारे अवैध्द धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. सदर पथकातील अधिकारी व अमलदार यांनी दिनांक 18/08/2024 ते 22/08/2024 रोजी दरम्यान नांदेड जिल्हयात अवैध दारु विक्रीचे 11 केसेस करुन 14 आरोपी कडुन 3,01,350/- रुपयाचो मुद्देमाज जप्त, अवैध रेती वाहतुक करणारे एकुण 4 केसेस करुन 5 आरोपी कडुन 40,86,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध तंबाखु बाळगणारे दोन इसमाविरुध्द एक केसेस करुन त्यांचे कडुन 30,431/- रुपयाचा मुद्देमाल, जुगाराचे एकुण 5 केसेस करुन 14 आरोपी कडुन 2,13,637/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, अवैध गुटखा बाळगणारे दोन केसेस करुन 4 आरोपी कडुन 45,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, काळया बाजारात जाणारा गहु/ तांदुळ एक कसेस करुन एका आरोपी कडुन 26,250/- रुपयाचा मुद्देमाल जप्त व अवैध गॅस वापरणारे दोन व्यक्तीवर एक कसे दाखल करुन त्याचे कडुन 1,95,560/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे असे नांदेड जिल्हयात एकुण 25 केसेस करुन 42 आरोपीचे ताब्यातुन एकुण 48,98,228/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!