Homeनांदेडगावातील स्वयंसेवकाच्या व मुलांच्या सहकार्याने भिंती झाल्या बोलक्या -NNL

गावातील स्वयंसेवकाच्या व मुलांच्या सहकार्याने भिंती झाल्या बोलक्या -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील निराला तांडा या गावात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये व गावामध्ये सुरू असलेले आमचे गाव उपक्रम राबविला जात आहे. गावातील सर्व मुलांना वाचन व गणिताच्या मूलभूत क्षमता प्राप्त झाल्या पाहिजे. गावातील सर्व घटक एका व्यासपीठावर येऊन गावामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी प्रथम संस्था गावातील सर्व मुलांसोबत हे उद्दिष्टे घेऊन काम करत आहे.

यासाठी गावातील सरपंच आकाश राठोड व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश राठोड आणि मुख्याध्यापक शिरगुरवार सर व सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक आणि माता पालकांचे याकडे लक्ष आहे. तसेच प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक सुद्धा गावात सुरू असलेल्या आमचे गाव उपक्रमाला सहकार्य करत आहे. त्या अनुषंगाने निराला तांडा गावामध्ये सरपंचांच्या पुढाकाराने व स्वयंसेवकाच्या सहकाऱ्यांनी गावामध्ये अक्षर भिंती करण्यात आल्या.

अक्षर भिंती केल्यानंतर गावातील सर्व मुले व केंद्रप्रमुख रमेश पवार आणि मुख्याध्यापक व शिक्षक हे मुलांसोबत भिंतीवर काय लिहले आहे .त्यातून तुम्हाला काय समजले. तसेच तुम्ही रोज जाऊन? गणिते सोडवायचे. व माईंड मॅप करायचा. आणखी गावाविषयी माहिती, वारा विषयी माहिती व ऋतू विषयक माहिती असे बरेच काही उदाहरणे त्या अक्षर भिंतीवरून मुलांना देण्यात आले. यासाठी प्रथम संस्थेचे प्रतिनिधी हनमंत बोमवाड आपल्या गावामध्ये काम करत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments