Thursday, May 14

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Let the dead body be left behind | मरावे परी शरीर मागे उरावे…आज अवयवदान दिवस -NNL

Let the dead body be left behind | मरावे परी शरीर मागे उरावे…आज अवयवदान दिवस -NNL

नांदेड, लेख
शरीर मर्त्य आहे आत्मा अमर आहे... अशी मान्यता आहे. मात्र आता शरीरही अमर होऊ शकते. आपल्या अमूल्य अशा दायित्वाच्या भावनातून शरीराचे अनेक अंग आपण दान करू शकतो. अनेकांना दृष्टी देऊन हजारोंना सृष्टी बघायला कारणीभूत ठरू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराची राख करायची की जातानाही दातृत्वाचा परमोच्च आनंद घ्यायचा याचा निर्णय घेणे म्हणजे अवयवदान करणे आहे. जेंव्हा एखादा व्यक्ती किंवा मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या जवळचा नातेवाईक अवयवदान करून गरजू व्यक्तीला ज्याला जगण्यासाठी अवयवांची गरज असते त्याला वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून अवयवाची मदत करतात त्याला अवयवदान म्हणतात. 18 वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या स्वेच्छेने शासनाला सांगून अवयव दान करू शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वत:निर्णय घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घे...
Saint Janabai is the epitome of Dasyabhava : दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई -NNL

Saint Janabai is the epitome of Dasyabhava : दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई -NNL

लेख
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे त्या पंढरपुरात संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे आल्या. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली. त्यांच्यासाठी प्रत्येक कर्मच ब्रह्मरूप झाले होते. त्या विठ्ठलभक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की, विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत साहाय्य करत असे. एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोवर्‍यांवरून कडाक्याचे भांडण झाले; कारण दोघींनी जवळजवळच गोवर्‍या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले. त्यांनी ‘तुमच्या गोवर्‍या कशा ओळखायच्या ?’, असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगि...
Lokmanya Tilak who sacrificed his life for the nation | राष्ट्राकरिता जीवन समर्पण करणारे लोकमान्य टिळक – NNL

Lokmanya Tilak who sacrificed his life for the nation | राष्ट्राकरिता जीवन समर्पण करणारे लोकमान्य टिळक – NNL

लेख
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करणार्‍या या ‘भारताच्या नरसिंहाने’ आपले ऐन तारुण्य स्वार्थत्यागपूर्वक राष्ट्राकरिता वाहून देशात नवजागृती निर्माण केली. ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तीमत्त्वाची 1 ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यानिमित्त कणखर आणि जाज्ज्वल नेतृत्वाचा थोडक्यात परिचय करून घेऊ. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत राहील. 1. वृत्तपत्रांची आवश्यकता जाणून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू करणे - शाळांमधून केवळ विद्यार्थ्यांनाच शिक्षण देता येत असे; परंतु आता प्रत्येक भारतीयास त्याच्...
Chief Minister Baliraja Free Power Scheme | शेतकऱ्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना -NNL

Chief Minister Baliraja Free Power Scheme | शेतकऱ्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना -NNL

नांदेड, लेख
भारतातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे परिणाम मात्र शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. वातावरणाच्या अनियमिततेमुळे प्रत्यक्ष पिक हंगामावर त्यांचा प्रत्यक्ष परिणाम होवून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्यातील 7.5 एच.पी पर्यतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत व दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्य शासनाने 25 जुलै 2024 रोजी अंमलात आणली आहे. महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या व...
A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

A stream of tourists; Spectacular Gowalkonda | पर्यटकांचा ओढा; हैद्राबादचा प्रेक्षणीय गोवळकोंडा… NNL

नांदेड, तेलंगणा, लेख
आंधप्रदेशातील तथा विद्यमान तेलंगना राज्यात येणारा गोवळकोंडा किल्ला हैद्राबादच्या पूर्वेला दिमाखदारपणे अजूनही उभा आहे. हैद्राबाद शहरात सालारजंग म्युझियम, नेहरु तारांगण, चारमिनार, रामोजी फिल्मसिटी, हुसेन सागर, डॉ. आंबेडकर स्टॅच्यू हे पर्यटकांची खास आवडीची क्षेत्रे आहेत. हैद्राबाद शहर ऐतिहासिक शहर आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे निझामाचे संस्थान होते. निजामाने काही अनोख्या बाबी उपलब्ध करुन दिलेल्या आजही जशाच्या तशार आहेत. निजामापूर्वी कुतुबशाहीचे वर्चस्व तेलंगणाच्या भूमीवर अस्तित्वात होते. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्यात नेहमी शीतयुद्ध अधुन- मधून होत असत. त्यामुळे हैद्राबादच्या जडणघडणीत राजे- महाराजे यांच्याबरोबर कुतुबशहांचेही बस्तान चांगल्याच प्रकारचे होते. म्हणून हैद्राबादचा परिसर अनेक ऐतिहासिक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. कोंण्डा म्हणजे डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला...! सदर किल्ला ह...
Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL

Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL

लेख, नांदेड
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मिलिंद व्यवहारे यांचा लेख. नांदेड जिल्‍हा परिषद ही समग्र ग्रामीण विकासाचा केंद्रबिुंदू आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आखून दिलेल्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने काम करतात आणि कामकाजाला गती मिळते. जिल्हाभर होणा-या दौऱ्यामुळे तळागाळातील प्रशासन सजग राहते. तसेच जनतेच्या समस्या कळतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी असे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला नवा आयाम दिला आहे. मिनल करनवाल ह्या 2018 साली आयएएस झाल्‍या. त्‍यांनी देशात 35 वा रँक मिळविला. देहरादून उत्‍तराखंडमध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांनी प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ अकादमीमधून पूर्ण केले. दिल्‍ली येथील ...
With artificial intelligence | महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ -NNL

With artificial intelligence | महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ -NNL

लेख
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे. मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्ध...
Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, लेख
लेखमालेला वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला वाचून वाचकांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया पैकी जागेअभावी निवडक प्रतिक्रिया या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे. - संपादक माणिक गुमटे समयसूचकता, वेळेवर योग्य तो निर्णय घेणे, लीडरशिप, प्रसंगावधान, आणि सगळयांना बरोबर घेऊन चालणे हे सगळे गुणधर्म एकाच व्यक्ती ठिकाणी येणे तसे पाहिले तर क्वचितच पाहायला मिळते. भाऊ, ईश्वराने, विधात्याने हि वरील गुणवत्ता तुम्हाला प्रदान केली आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक गुण जसे सामाजिक कार्य, गरीबां बद्दल असलेली दया, ममता, प्रेम आणि विविध प्रकारची कामे यशस्वी रीत्या पुर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. त्या मुळे काश्मीर, श्री अमरनाथ यात्रा, वैष्णव देवी यात्रा, सोबत दिल्ली, आम्रूतसर, हे सगळे शंभर यात्रेकरू ना सोबत घेऊन यशस्वीपणे पूर्ण करणे हे केवळ तुम्हालाच जमते. अनेक...
Salutations to all great Gurus on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व महान गुरुना वंदन….NNL

Salutations to all great Gurus on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व महान गुरुना वंदन….NNL

Blog, नांदेड, लेख
सर्व प्रथम मी माझ्या आईला वंदन, प्रणाम करते आपल्या सर्वांचा प्रथम गुरु आपली आई मी माझ्या कावेरी मातेला प्रणाम करते जिले मला हात धरूण अ' 'आ' 'ई' लिहायला शिकवले 'शुभं करोती कल्याणम' हि प्रार्थना तिनेच आम्हा भावंडाना शिकवले. अशा माझ्या जीवनातल्य प्रथम गुरुस बारंबार प्रणाम 'आ' म्हणजे आत्मा 'ई' म्हणजे ईश्वर अशी ही आई..... 'गु' या शब्दाचा अर्थ अंधकार 'र' या शब्दाचा अर्थ प्रकाश, तेज अंधकाराकडुन प्रकाशाकडे जे घेवून जातात. ते गुरु संत कबीरदास गुरु बददल म्हणतात.... "सारी धरती को में कागज बनाऊ" " सात समुद्र की में शाहि बनाऊ" मन को में लेखनी बनाऊ" फिर भी में इतनी महिमा न लिख सकु असे असतात गुरु,,,, साधारण माणसाचे जीवन तेजोमय जीवन फक्त आपले गुरुच बनवू शकतात. गुरु म्हणजेच माऊली, माता, आई. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु.. ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे गुरु अशा गुरुना आपण बारंबार प्रणाम करूयात चिखलातुन ...
‘Saturday’ is my favourite…! | ‘शनिवार’ माझ्या आवडीचा…! -NNL

‘Saturday’ is my favourite…! | ‘शनिवार’ माझ्या आवडीचा…! -NNL

नांदेड, लेख
नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविणे बाबतचे शासन परिपत्रक मार्चमध्ये येऊन धडकले आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले. त्याला कारणही तसेच मजेशीर व गंमतीदार आहे असेच म्हणावे लागेल. या परिपत्रकानुसार दर शनिवारी राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये प्रचलित वर्गांऐवजी दप्तराविना शाळा भरणार व विद्यार्थ्यांचा शनिवार हा वेगळ्या कार्यपद्धतीद्वारे आनंददायी व मनोरंजक स्वरूपाचा होणार आहे. सध्याच्या काळात मुलांच्या हसण्या- खेळण्याच्या- बागडण्याच्या वयात विद्यार्थ्यांना ताण, तणाव, उदासीनता व नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे; यावर उपाय म्हणून शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवत होती आणि 14 मार्च 2024 रोजी निघालेल्या शासन परिपत्रकामुळे याची जणू परिपूर्तीच झाली. या ...
error: Content is protected !!