हेलन केलर: अंधार आणि शांततेच्या पलीकडे – NNL
हेलन केलरचा जन्म 27 जून 1880 साली अमेरिकेच्या तुस्कुम्बिया, अलाबामा इथला. 19 महिन्यांच्या वयात छोट्या वयात तिला गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यात कर्णबधिर आणि दृष्टीहीन करून सोडले. तिच्या असहाय्यतेमुळे निराश झालेली हेलन चिडचिडी आणि रागीट बनली होती. केलरच्या वयाच्या सातव्या वर्षी तिला शिकवण्यासाठी ॲन मॅन्सफिल्ड सुलिव्हन ह्या 20 वर्षीय तरुणीला तिच्या पालकांनी शिक्षिका म्हणून कामावर ठेवले.
सुलिव्हन ही केलरच्या आयुष्यात आली तो क्षण तिच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरला. फिंगर-स्पेलिंग, स्पर्शिक सांकेतिक भाषा आणि कठोर शिक्षणाद्वारे, सुलिव्हनने केलरला शिकवायला सुरू केली. तिने हेलन केलर सोबत संवाद साधण्यासाठी प्रामुख्याने अमेरिकन सांकेतिक भाषा (एएसएल) वापरली.. एएसएल व्यतिरिक्त, तिने स्पर्शिक सांकेतिक भाषा देखील वापरली, जिथे चिन्हे दिसण्याऐवजी स्पर्शाने ओळखल्या जातात. हेलनच्या वयाच्या 10व्या वर्षी ॲनने...







