Wednesday, May 20

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mahurgad renuka temple ; उदे ग अंबे उदे च्या गजरात माहुर गडावर घटस्थापना -NNL

Mahurgad renuka temple ; उदे ग अंबे उदे च्या गजरात माहुर गडावर घटस्थापना -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपिठा पैकी एक पुर्ण व मुळपिठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता गडावर गुरुवार दिनाक ३ ऑक्टोबर. रोजी पंरपंरे नुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.अश्वीन शुद्ध प्रतिपदेला ‘ऊदे ग अंबे उदे’ च्या गजरात पहील्या माळीला (दिवसाला) सकाळी ७ वाजता पासून टि,व्हि, स्टार सनई वादक नितिन धुमाळ व संच (नासिक) यांच्या सनई च्या सूरात व पौराहीत्य वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी. अनिल काण्णव, यांचा संच व वेद शाळेचे शिष्यांनी प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महा पूजेने सुरवात झाली. गणेश पुजन,कलश (वरुन) पुजन,पुण्याहवाचन, मातृकापुजन, ॠग्वेद, पारायण शतशुक्ती पारायन, करण्यात आले,पूजारी भवानिदास भोपी, शुभम भोपी, विनायक फांदाडे,विश्वस्त बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक करण्यात सिंगार,...
Balaji temple at Hadko ; हडको येथील बालाजी मंदिरात वट्टमवार यांनी साडेतीन किलो चांदीचे अलंकार मुर्तीसाठी दिले भेट – NNL

Balaji temple at Hadko ; हडको येथील बालाजी मंदिरात वट्टमवार यांनी साडेतीन किलो चांदीचे अलंकार मुर्तीसाठी दिले भेट – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l हडको येथील श्री.बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्ताने भाविक सौ. प्रविणा लक्ष्मीकांत वट्टमवार यांनी बालाजी मुर्ती साठी जयपूर येथील कारागीर मार्फत साडे तीन किलो चांदीचे मुर्तीसाठी अलंकार भेट म्हणून दिले यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने सपत्नीक सत्कार केला. हडको येथील बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्ताने २२ व्या ब्रम्होत्सव निमित्ताने ३ ते १२ आक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी औधोगिक वसाहतीतील उद्योजक सौ. प्रविणा लक्ष्मीकांत वट्टमवार यांनी मंदिरातील मुर्ती साठी अलंकार अर्पण करावयाचे आहे यासाठी गेल्या अनेक दिवसापूर्वी चन्नावार ज्वेलर्स नांदेड यांच्या मार्फत जयपूर राजस्थान येथून कारागीर बोलवून मुर्ती साठी अलंकार म्हणून त्यांनी सविस्तर मोजमाप घेऊन आकर्षक सुबक व देखणे असे अलंकार तयार केले. नवरात्र महोत्सव निमित्ताने आयोजित ...
Navratri festival starts : नवसाला पावणाऱ्या कालिंका मंदिरात घटस्थापना व अलंकार सोहळ्याने नवरात्रोत्सव प्रारंभ -NNL

Navratri festival starts : नवसाला पावणाऱ्या कालिंका मंदिरात घटस्थापना व अलंकार सोहळ्याने नवरात्रोत्सव प्रारंभ -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार| प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा नगरीची कुलस्वामिनी नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता पूजेचे मानकरी यांच्या हस्ते व पुरोहित कांता गुरु वाळके व साईगुरु बडवे यांच्या मधुर वाणीत अभिषेक व अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी महाआरती करून प्रसादाचे वितरण झाले, आगामीं नऊ दिवस मंदिरात नवरात्रोत्सवाचे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. नवरात्रोत्सवात नित्यनेमाने दररोज सकाळी आणि रात्री महाआरती केली जाणार आहे. दि.०३ गुरुवार ते दि.०९ बुधवार पर्यंत दररोज दुपारी ०१ ते ७ या वेळेत संगीतमय देवी भागवत कथा हभप एड नारायण महाराज सोनखेडकर यांच्या मधुर वाणीत होणार आहे. दररोज आरतीनंतर सायंकाळी कालिंका देवी नवरात्रोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. देवी भागवत कथेचा समारोप शेवटच्या दिवश...
Darshan of Kalinka Mata : नवसाला पावणाऱ्या वाढोण्याच्या कालिंका माता दर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व -NNL

Darshan of Kalinka Mata : नवसाला पावणाऱ्या वाढोण्याच्या कालिंका माता दर्शनाला नवरात्रोत्सवात विशेष महत्व -NNL

नांदेड, धार्मिक, लेख
हिमायतनगर (अनिल मादसवार) वाढोणा शहराच्या उत्तरेच्या बाजूस असलेल्या कालिंकामाता मंदिराला कल्याणीच्या चालुक्य कालखंडाचा इतिहास आहे. याचे पुरावे मंदिर स्थापत्याचे हेमाडपंथी शिळांच्या अवशेषावरून दिसून येतात. या मंदिराची स्थापना १६७९ साली झाली असून, आज ३५५ वर्ष पूर्ण होत आहेत. हिमायतनगर वाढोण्याची कुलदैवत कालिंका माता हि नवसाला पावणारी असून, मनोकामना करणाऱ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात कालिंका मातेच्या दर्शनाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कोल्हापूरची अंबाबाई, माहुरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तसृंगी, अश्या साढेतीन शक्तिपीठे असलेल्या देवीचे सामर्थ्य आणि कर्तत्व सर्वांनाच माहित आहे. आदिशक्ती, आदिमाया, अंबाबाई, जगदंबा, महाकाली, भद्रकाली, कृपालिनी, चामुंडा, दुर्गादेवी, चंडिका, अश्या विविध नावाने ओळखल्या जाते. हिमायतनगर येथील क...
Venkatesh Balaji Temple : हिमायतनगर वाढोणाच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्राम्होत्सवाची अभिषेक घटस्थापनेच्या झाली सुरुवात – NNL

Venkatesh Balaji Temple : हिमायतनगर वाढोणाच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्राम्होत्सवाची अभिषेक घटस्थापनेच्या झाली सुरुवात – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा शहरातील पुरातन कालीन भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवारी तारीख ०३ रोजी सकाळी ४ वाजता अभिषेक महापूजेनंतर घटस्थापनेणे ब्रम्होत्सवाला सुरुवात झाली असून, दहा दिवसाच्या पर्वकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पुरोहित कांतागुरु आणि गजुगुरु वाळके यांनी दिली असून, भाविक भक्तांनी ब्रम्होत्सव काळात व्यंकटेश बालाजीचे नित्यनेमाने दर्शन घेऊन पुण्य पदरी पाडून घ्यावे असे आवाहन त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. या तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सव आणि ब्रम्होत्सवाची सुरुवात झाली आहे. हिमायतनगर वाढोणा येथील व्यंकटेश बालाजी मंदिरात अनादिकाला पासून चालत आलेल्या परंपरेनुसार पहिल्या दिवशी घटस्थापना गुरुवार दिनांक ०३...
Shri Renukadevi : श्री रेणूकादेवी साठी दहा पैठणी महावस्त्र नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात दहारंगी महावस्त्र -NNL

Shri Renukadevi : श्री रेणूकादेवी साठी दहा पैठणी महावस्त्र नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात दहारंगी महावस्त्र -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरिल श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास गुरवार दि,३ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे. श्री रेणूकामातेला दहा दिवस वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी महावस्त्र नेसविण्यात येणार आहे. अशी माहिती श्री रेणूकादेवी संस्थानचे विश्वस्थ चंद्रकांत भोपी ,संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी,यांनी दिली आहे. श्री रेणूकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांसाठी पर्वनीच असतो. दहा दिवस सह्याद्रीच्या डोंगररांगात आई भवाणी श्री रेणूकादेवीचा गजर ऐकावयास मिळतो. जिकडे- तिकडे भक्तीमय वातावरण पहावयास मिळते. नवरात्र उत्सवाची श्री रेणूकादेवी संस्थान विश्वस्थ समितीने जय्यत तयारी केली आहे. भाविकांना केंद्रबिंदु मानुन सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याची माहीती दिली आहे ? सुलभ दर्शनासह आलेल्या प्रत्येक भाविकासाठी महाप्रसाद व फरा...
Shiradhon : शिराढोण येथे श्री. भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा -NNL

Shiradhon : शिराढोण येथे श्री. भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा -NNL

Blog, धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी भीमाशंकर मठ संस्थान मध्ये हिमवंत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी ( शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र.प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर ) यांच्या सान्निध्यात दि.३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज शिवपाठ दुर्गा सप्तसती पारायण , रेणुकविजय पुराण अखंड भगवन्नाम सप्ताह , रात्री ८ ते ११ किर्तन व नंतर भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवारी आश्विन शु. ९ या दिवशी संध्याकाळी ७ ते १० महाप्रसाद , रात्री १० ते १ गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषीक वितरण समारंभ सोहळा व लागलीच धर्मसभा त्यानंतर रात्रौ. ३ वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी सोहळा अग्नीकुंडातून प्रवे...
Ajit Kumhar : यंदा डी. जे. विना मिरवणूक साजरी करुन सण उत्सव शांततेत पार पाडा – पो. नि.अजित कुंभार -NNL

Ajit Kumhar : यंदा डी. जे. विना मिरवणूक साजरी करुन सण उत्सव शांततेत पार पाडा – पो. नि.अजित कुंभार -NNL

धार्मिक, नांदेड
भोकर,गंगाधर पडवळे। समाजातील सर्व लोकांनी आगामी काळात येणाऱ्या श्री दुर्गा उत्सव, दसरा आदी सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन उपस्थित शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांना भोकर चे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी बैठकीत केले. भोकर मध्ये शांतता पूर्ण वातावरण असून सर्व धर्मीय एक जुटीने, एक दिलाने एकत्र येऊन सर्व धर्माचे सण उत्सव साजरे करतात तेच परंपरा जोपासत याही वर्षी आगामी काळातील दुर्गा उत्सव शांततेत पार पडावा असे यावेळी विनंती करण्यात आली. भोकर शहरांसाह तालुक्यात एकूण 100 गावे असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तारेवरची कसरत करत आहे तर गेल्या वर्षी जवळपास 123 श्री दुर्गा देवी मंडळाची स्थापना झाली होती व याही वर्षी त्याच संखेच्या आसपास होईल अशी अपेक्षित आहे.त्या करिता 6 अधिकारी, 55 कर्मचारी यांच्यावर बिस्त आहे.तेंव्हा सर्व समाजातील समाजसुधारक, पुढारी,पत्रकार, ...
Gautam Buddha Murth : भोपाळवाडी येथे तथागत गौतम बुद्ध मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन -NNL

Gautam Buddha Murth : भोपाळवाडी येथे तथागत गौतम बुद्ध मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
उस्माननगर। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीच्या पंधराव्या वर्धापन दिन उस्माननगर येथून जवळच असलेल्या शांतीदूत बुद्ध विहार सिध्दार्थ नगर भोपाळवाडी , कलंबर बु. लोहा येथे दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवारी मंगलमय वातावरणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ : ३५ वा .पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण रावसाहेब पाटील भोपाळे ( मा. सरपंच ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे उध्दघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार तथा लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर , यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मा.पांचाळ मॅडम ( ग्रामसेविका ) , मा. नरेंद्र गायकवाड ( उपसभापती पं.स.लोहा ) , बाबुराव गोरे ( म. गां. तं. मु. अध्यक्ष कलंबर ) , महेश करंडे ( पो.पा. भोपाळवाडी ) , प्रमुख पाहुणे म्हणून शिवाभाऊ नरंगले ( वंचित बहुजन आ. जिल्हाध्यक्ष नांदेड ) , बालाजी परदेशी...
Navratri mohatsav ; नवरात्र महोत्सव शांततेत साजरा करा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचे आवाहन NNL

Navratri mohatsav ; नवरात्र महोत्सव शांततेत साजरा करा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचे आवाहन NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड। नवरात्र महोत्सव सार्वजनिक जयंती मंडळाने शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित बैठकीत केले. आगामी काळात साजरा होणारा नवरात्र महोत्सव सणाच्या निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 30 सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, नायब तहसिलदार,एस.डब्लु. डिंगलवाड,प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील सहाय्यक परिवहन अधिकारी सौ.मंजुषा भोसले, मनपा सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, औधोगिक वसाहत अग्नीशामक दलाचे विमोचक प्रमोद भोयर,यांच्या सह पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार उपस्थिती होती. सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळानी सण उत्सव शांततेत साजरा करावे असे सांगुन ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या प्रायव्हेट दांडिया महोत्सव आयोजित करण्याया संबंधित आयोजकांनी रितस...
error: Content is protected !!