HomeनांदेडMahurgad renuka temple ; उदे ग अंबे उदे च्या गजरात माहुर गडावर...

Mahurgad renuka temple ; उदे ग अंबे उदे च्या गजरात माहुर गडावर घटस्थापना -NNL

श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपिठा पैकी एक पुर्ण व मुळपिठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता गडावर गुरुवार दिनाक ३ ऑक्टोबर. रोजी पंरपंरे नुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.अश्वीन शुद्ध प्रतिपदेला ‘ऊदे ग अंबे उदे’ च्या गजरात पहील्या माळीला (दिवसाला) सकाळी ७ वाजता पासून टि,व्हि, स्टार सनई वादक नितिन धुमाळ व संच (नासिक) यांच्या सनई च्या सूरात व पौराहीत्य वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी. अनिल काण्णव, यांचा संच व वेद शाळेचे शिष्यांनी प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महा पूजेने सुरवात झाली.

गणेश पुजन,कलश (वरुन) पुजन,पुण्याहवाचन, मातृकापुजन, ॠग्वेद, पारायण शतशुक्ती पारायन, करण्यात आले,पूजारी भवानिदास भोपी, शुभम भोपी, विनायक फांदाडे,विश्वस्त बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक करण्यात सिंगार,अलंकार करून पिवळा रंगाचे पैठनी महावस्त्र परीधान करण्यात आले. श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभा-यातिल व परीसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदीर,श्री महालक्ष्मी मंदिरात एका पाषानाच्या कुंडा मध्ये मातृका भरुन त्यात संप्त धान्य टाकुन, कुंडावर मातीची कलश,त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, साभोताल पाच उसाचे धांडे उभारुन आणी त्या अधारे कलशावर (पुष्पहार) पहिली माळ चढवून सकाळी १० वा, संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमवार,सहा, जिल्हाधिकारी तथा सचिव मेघना कावली विश्वस्थ चंन्द्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, दुर्गादास भोपी, यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

पायस नैवेद्य गायीचे तुप व दु, ११,३० वा, श्री मातेस महानैवेद्य ठेउन महाआरती करण्यात आली, अध्यक्ष सुरेखा कोसमवार, सचिव मेघना कावली यांच्या हस्ते कुमारीका पुजन, आरती करण्यात आली,नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती पूजन करण्यात आले. अखंड नंदादिप पूजन ,सुवर्ण अलंकार पूजन करण्यात आले,श्री दुर्गासप्तशती शतचंडी पाठाची सुरवात, संकल्प, चतुर्वेद वेद पारायण सुरवात करण्यात आली,पायस नैवेद्य,गायीचे तुप,छबीना परिवार देवता पूजन झाल्या नंतर भाविकांन साठी परशुराम मंदिर परीसरात महाप्रसाद सूरु करण्यात आला.

प्रतिपदे पासुन दशमी पर्यंत मंदीरात अखंड देवी समोर नंदादिप तेवत ठेउन दरोरोज पायास म्हणजे दही भात, पुरणपोळीचा नवैद्य,आरती नंतर छबिना,कढला जाउन,रेणुका ज्या गडावर प्रकटली त्या गडाला प्रदक्षीना घालुन छबिना परत रेणुका मंदिरात येत असतो. यावर्षी मुंबई येथील उघोगपती नरेंद्र हेटे यांनी नवरात्र निमित्त सोन्याने गाठवलेले ५ फुट मंगळसुत्र व डायमंड बिंदी अर्पंन केली आहे ह्यामुळे भाविकांना या वर्षी रेणुका मातेचे नविन रूप पाहावयास मिळत आहे.

गडावर जाणार्या रत्यावरील टि, पॉइंट व मेन रोडवर पोलीसांनी बॅरीकेट लाउन खाजगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी केली आहे.ऐसटी महामडळा कडून १०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपंचायत कडून पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे, आज पहिल्याच माळिला महाराष्ट्, तेलंगाना राज्यातील भाविकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करीता अप्पर पो,अधिक्षक खंडेराव धरने उपविभागिय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने,सपोनी शिवप्रकाश मुळे हे आपल्या कर्मचारी सह चोख बंदोबस्त ठेवत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments