Mahurgad renuka temple ; उदे ग अंबे उदे च्या गजरात माहुर गडावर घटस्थापना -NNL
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपिठा पैकी एक पुर्ण व मुळपिठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता गडावर गुरुवार दिनाक ३ ऑक्टोबर. रोजी पंरपंरे नुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.अश्वीन शुद्ध प्रतिपदेला ‘ऊदे ग अंबे उदे’ च्या गजरात पहील्या माळीला (दिवसाला) सकाळी ७ वाजता पासून टि,व्हि, स्टार सनई वादक नितिन धुमाळ व संच (नासिक) यांच्या सनई च्या सूरात व पौराहीत्य वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी. अनिल काण्णव, यांचा संच व वेद शाळेचे शिष्यांनी प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महा पूजेने सुरवात झाली.
गणेश पुजन,कलश (वरुन) पुजन,पुण्याहवाचन, मातृकापुजन, ॠग्वेद, पारायण शतशुक्ती पारायन, करण्यात आले,पूजारी भवानिदास भोपी, शुभम भोपी, विनायक फांदाडे,विश्वस्त बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक करण्यात सिंगार,...
