भोकर,गंगाधर पडवळे। समाजातील सर्व लोकांनी आगामी काळात येणाऱ्या श्री दुर्गा उत्सव, दसरा आदी सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन उपस्थित शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांना भोकर चे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी बैठकीत केले. भोकर मध्ये शांतता पूर्ण वातावरण असून सर्व धर्मीय एक जुटीने, एक दिलाने एकत्र येऊन सर्व धर्माचे सण उत्सव साजरे करतात तेच परंपरा जोपासत याही वर्षी आगामी काळातील दुर्गा उत्सव शांततेत पार पडावा असे यावेळी विनंती करण्यात आली.


भोकर शहरांसाह तालुक्यात एकूण 100 गावे असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तारेवरची कसरत करत आहे तर गेल्या वर्षी जवळपास 123 श्री दुर्गा देवी मंडळाची स्थापना झाली होती व याही वर्षी त्याच संखेच्या आसपास होईल अशी अपेक्षित आहे.त्या करिता 6 अधिकारी, 55 कर्मचारी यांच्यावर बिस्त आहे.तेंव्हा सर्व समाजातील समाजसुधारक, पुढारी,पत्रकार, राजकीय नेते यांनी सर्व धर्म समभाव जोपासून सलोख्याची भूमिका घेत हिंदू धर्माच्या पवित्र श्री दुर्गा उत्सवाचा लाभ घ्यावा. एकमेकांना त्रास होणार नाही किंवा जाती जाती, धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण होणार नाही यांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे त्याचं बरोबर या उत्सवात महिलांचा जास्तीतजास्त सहभाग असतो त्यामुळे दुर्गा मंडळ जिथे जिथे असतात तेथे सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त पुरवीला जावा जेणेकरून काही अनुचित प्रकार घडणार नाही.याकडे ही जातीने लक्ष देण्याची विनंती महिला मंडळीने यावेळी केली.तर शहरातील वाहतूक, मिरवणूक मार्गातील खड्डे, वीज वितरणाच्या तारा,नाली सफाई,रस्त्यावरील अतिक्रमण आदी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना यां गोष्टी उत्सवा पूर्वी व्यवस्थित, दुरुस्तीच्या करण्यासाठी सांगण्याचे यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले.

भोकर शहर तसे शांत असून हिंदू, मुस्लिम, बौध्द बांधव आपापल्या सण, उत्सव यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलावून मानसन्मान करून एकमेकांना शुभेच्छा देत त्यात सामील होऊन आनंद द्विगुणित करत असतात त्याच प्रमाणे याही वर्षी श्री दुर्गा उत्सव सर्वांनी मिळून अगदी आनंदी व हर्षल्लोसात साजरा करा त्याचं बरोबर मा. वरिष्ठ न्यायालयाने डी. जे. ला मिरवणूकित वाजवण्यासाठी परवानगी नाकारली आहे त्यामुळे आपणही डी. जे. विना मिरवणूकी काढव्यात डी. जे. ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा जेणेकरून वातावरणात ध्वनी प्रदूषण होणार नाही त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही यांची दक्षता घ्यावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील.2019 ला एक गुन्हा, 2021,ला एक, 2022 ला एक तर 2023 ला दोन डी. जे. वाजवील्याच्या कारणावरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.असे ही यावेळी पी. आय. कुंभार यांनी आपल्या मतात विचार मांडले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश औटे,डी. एस. बी. चे, गाडेकर जेष्ठ नागरिक शिवाजी पाटील किन्हाळकर, सांपादक उत्तम बाबळे,पत्रकार,मनोज चौव्हाण, मनोज गिमेकर, राजेश वाघमारे, बी. आर.पांचाळ,विजय चिंतवार, यांच्यासह,सारंग मुंदडा, जावाजोद्दीन बरबडेकर, दिलीप राव,मन्सूर खान पठाण, मिलिंद गायकवाड, साहेबराव भोंबे,आनंदीबाई चुगुरवाड,यशोदा शेळके,अहिल्याबाई जाधव, चंद्रकला गायकवाड, सुलोचना ढोले,सुलोचना बेळतकर, कमल नर्तावार,अनिता वाघमारे,रमेश महागावकर, आदी सह महिला दक्षता कमिटी च्या महिला, शांतता कमिटीचे सदस्य तालुक्यातील सरपंच,श्री दुर्गा मंडळाचे पदाधिकारी,मोठया संख्येने उपस्थित होते.
