भोकर। ओबीसी व भटक्या विमुक्त जातीच्या वंचित समूहाचे नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भोकर तालुका ओबीसी समन्वय समितीच्या वतीने निषेध करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन १ ऑक्टोबर रोजी तहसीलदार भोकर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले.


३० सप्टेंबर रोजी पुणे येथे काही समाजकंटकाकडून प्रा. लक्ष्मण हाके यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल चुकीचे पोस्ट टाकून बदनामी करण्यात आली.असे कृत्य करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


या निवेदनावर ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड,नागोरावजी शेंडगे,बी.आर.पांचाळ, एडो.शेखर कुंटे,माधव अमृतवाड,नंदकुमार कोसबतवार,सतीश देशमुख,दिनेश लोणे,सुरेश गुजेवाड,संजय देवकते, किशन सोळंके,रामा भालेराव,संजय शेंडगे,संदीप कानकाटे, संजय शेंडगे आदीसह अनेक ओबीसी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
