नवीन नांदेड। नवरात्र महोत्सव सार्वजनिक जयंती मंडळाने शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित बैठकीत केले.


आगामी काळात साजरा होणारा नवरात्र महोत्सव सणाच्या निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 30 सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, नायब तहसिलदार,एस.डब्लु. डिंगलवाड,प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील सहाय्यक परिवहन अधिकारी सौ.मंजुषा भोसले, मनपा सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, औधोगिक वसाहत अग्नीशामक दलाचे विमोचक प्रमोद भोयर,यांच्या सह पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार उपस्थिती होती.


सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळानी सण उत्सव शांततेत साजरा करावे असे सांगुन ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या प्रायव्हेट दांडिया महोत्सव आयोजित करण्याया संबंधित आयोजकांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगून नवरात्र उत्सव शांततेत साजरा करावा असे सांगितले तर सहाय्यक आयुक्त कास्टेवाड यांनी पोलीस परवानगी आवश्यक असल्याचे सांगून नवरात्र महोत्सव काळात साफसफाई व स्वच्छता करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी महिला पोलीस पाटील सौ. सुमनबाई खोसडे,अरूणा ठोके, सौ. अल्का बोकारे, सुनिता गाढे,महानंदा यलगंदवार,प्रविण हंबरडे ,लवकुश अवनुरे,गोविंद तेलंगे, गौरव दरबस्तवार,बाळु वाघमारे, इंद्रजित मंदावाड,कृष्णा पगडे, बाबुराव गचे,आंनद पवार, पांडुरंग गिरडे, पोलीस पाटील प्रतिनिधी विजय कुमार खटके,संजय इंगळे,विजया काचावार,यांच्या सह नवरात्र महोत्सव पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी सार्वजनिक जयंती नवरात्र महोत्सव मंडळ यांना नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले,गोपनिय शाखेचे बालाजी दंतापले, टरके यांनी विशेष सहकार्य केले.