Navratri mohatsav ; नवरात्र महोत्सव शांततेत साजरा करा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचे आवाहन NNL
नवीन नांदेड। नवरात्र महोत्सव सार्वजनिक जयंती मंडळाने शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आयोजित बैठकीत केले.
आगामी काळात साजरा होणारा नवरात्र महोत्सव सणाच्या निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 30 सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, नायब तहसिलदार,एस.डब्लु. डिंगलवाड,प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील सहाय्यक परिवहन अधिकारी सौ.मंजुषा भोसले, मनपा सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, औधोगिक वसाहत अग्नीशामक दलाचे विमोचक प्रमोद भोयर,यांच्या सह पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार उपस्थिती होती.
सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळानी सण उत्सव शांततेत साजरा करावे असे सांगुन ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या प्रायव्हेट दांडिया महोत्सव आयोजित करण्याया संबंधित आयोजकांनी रितस...
