Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून श्री परमेश्वर मंदिरातील वारकरी सांप्रदाईक महिला भजनी मंडळाच्या वतीने काकडा आरतीला प्रारंभ करण्यात आला आहे. सकाळच्या रामप्रहरी सडा-सारवान, अभ्यंगस्नान करून काकडा आरतीसाठी महिला मंडळी येत असल्याने प्रत्येकाच्या घरात हरी नामचे स्वर ऐकू येत आहेत. यामुळे शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, हरिनामाच्या मंजुळ स्वराची पहाट सर्वांसाठी सुखदायक ठरत आहे. सकाळी ५ वाजता टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी देवी देवतांचे दर्शनासाठी गावात गेल्यानंतर श्री परमेश्वर मंदिरातील शिवपती मंदिर सभागृहात संतोषी माता आणि विठ्ठल रुख्माईच्या मूर्तीसमोर काकडा आरतीला सुरुवात होते. पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे काकडा आरती पूर्वी तासभर विविध धार्मिक गीते, भावगीते, गौळण सादर करून काकडा आरती म्हंटली जाते. कोजागिरी पौर्ण...
Minister Deepak Kesarkar  : मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले श्रीरेणुकामातेचे दर्शन -NNL

Minister Deepak Kesarkar : मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले श्रीरेणुकामातेचे दर्शन -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी काल दि.१८आॅक्टोबर रोजी श्रीरेणुकामातेचे दर्शन घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश येवो यासाठी साकडे घातले आहे.यावेळी त्यांच्या हस्ते श्रीरेणुकामातेला अभिषेक पुजन महावस्त्र ओटी अर्पण करून महाआरती करण्यात आली त्यानंतर संस्थांनतर्फे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी,संजय कान्नव यांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महायुती सरकारच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यात आली तसेच गोरगरीब जनतेसाठी अनेक जन उपयोगी योजना राबविण्यात आल्या तसेच मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अनेक विकासकामे झाली, विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनेमुळे राज्यातील महिला महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या ...
Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ – NNL

Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या समाप्तीनंतर शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार हिमायतनगर (वाढोणा) शहरातील महिला - पुरुष वारकरी सांप्रदाईक भजनी मंडळाने शुक्रवारपासून काकडा दिंडीला प्रारंभ केला आहे. यामुळे शहरात सकाळच्या रामप्रहरी हरी नामाचे स्वर निनादू लागल्याने दिवाळीच्या पर्वकाळात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. शेकडो वर्षाच्या परंपरेने चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे सकाळच्या प्रहरी टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी काढून सर्व देवी देवतांचे दर्शन घेणाऱ्यास मोक्ष मिळतो. असा ग्रामीण भागातील नागरिकांचा समाज आहे. तीच परंपरा जोपासत शहरातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर, महाकाली, कालीन्का देवी महिला व पुरुष भजनी मंडळाच्या वतीने काकडा दिंडी काढण्यात येते. त्या दिंडीला शुक्रवार दिनांक १८ पासून सुरूवात झाली असून, सदर दिंडी हि टाळ - मृदंग, आरती व भजन मंडळीच्या सानिध्यात काढली ...
Bhikkhu Sangha in Khurgaon : १९ रोजी खुरगावला भिक्खू संघाचा वर्षावास समापन कार्यक्रम -NNL

Bhikkhu Sangha in Khurgaon : १९ रोजी खुरगावला भिक्खू संघाचा वर्षावास समापन कार्यक्रम -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आश्विन पौर्णिमेनिमित्त १९ आॅक्टोबर रोजी पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमात भिक्खू संघाच्या वर्षावास समापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी दिली. पौर्णिमोत्सव कार्यक्रमांतर्गत सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना, भोजनदान, आर्थिक दान, दान पारमिता, भोजनदान आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. आश्विन पौर्णिमेला भिक्खूंचा वर्षावास कालावधी संपतो. या निमित्ताने भदंत पंयाबोधी थेरो यांचा १६ वा वर्षावास समापन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मान्यवरांचे मनोगत, धम्मदेसना, बुद्ध भीम गितांचा समाजजागृतीपर कार्य...
Grand nagarkirtan yatra ; मातासाहेब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमाचे समारोपात हजारों भाविक; मातासाहेब ते नांदेड भव्य नगरकीर्तन यात्रा -NNL

Grand nagarkirtan yatra ; मातासाहेब देवाजी जन्मोत्सव कार्यक्रमाचे समारोपात हजारों भाविक; मातासाहेब ते नांदेड भव्य नगरकीर्तन यात्रा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड। ऐतिहासिक गुरुद्वारा मातासाहेब मुगट येथे मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या मातासाहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता भव्य नगरकीर्तन कार्यक्रमाने झाली. बुधवार, दि. 16 रोजी सकाळी 9 वाजता कीर्तन दरबार व दिवान कार्यक्रमास सुरुवात झाली. समापन कार्यक्रमात तख्त सचखंड श्री हजुरसाहेबचे मित जत्थेदार संतबाबा ज्योतिंदर सिंघजी, हेड ग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, मित ग्रंथी भाई गुरमीत सिंघजी, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा तेजासिंघजी जत्थेदार मातासाहेब यांची प्रमुख उपस्थितीती होती. आज कीर्तन दरबार मध्ये भाई बलविंदरसिंघ रंगीला, भाई पिंदरसिंघजी रागी जत्था यांचे शबदगायन झाले. श्री आनंदसाहेबचे पाठ आणी श्री गुरु ग्रन्थसाहेब यांचा हुकुमनामा वाचण्यात आला. तसेच कार्यक्रम समापन अरदास करण्यात आली. यावेळी शिरोमणि अकाली बुड्ढा दल 96 करोडी...
Sadanand alias Langde Maharaj : प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांच्या मठावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुपुजन महाप्रसाद -NNL

Sadanand alias Langde Maharaj : प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांच्या मठावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुपुजन महाप्रसाद -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांचे मठावर कोजागिरी पोर्णिमा निमित्त बुधवार १६ ऑक्टोबर रोजी गुरु पुजन व महाप्रसादाचा उत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवाला सुमारे ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक कार्यक्रमाला व महाप्रसादाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहान मठाधीश प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांनी केले आहे. कोजागिरी पोर्णीमेनिमित्त होत असलेल्या प्रथम सञात सकाळी ९ वा गुरु पुजा,दुपारी १२ वा.पाद्य पुजा व आरती तर १ ते ३ वाजेपर्यत साधु संताचे पुजन, संध्याकाळी ४ वाजल्यापासून नैवद्य अर्पण करुण महाप्रसादला सुरुवात केली जाते, तर रात्री ९ वा.भजन गायणाला सुरुवात करुण ७० लीटर दुधाची बांसुदी करुण भाविकांना दिली जाते.मागील ४५ वर्षापासून अविरत पणे सुरु असलेल...
Shri Kedar Jagadguru ; 17 रोजी श्री केदार जगद्गुरु यांचा पट्टाभिषेक वर्धन्तोत्सव व सभागृह लोकार्पण सोहळा – NNL

Shri Kedar Jagadguru ; 17 रोजी श्री केदार जगद्गुरु यांचा पट्टाभिषेक वर्धन्तोत्सव व सभागृह लोकार्पण सोहळा – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| हिमालयातील केदारपीठाचे जगद्गुरु श्रीश्रीश्री 1008 भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा 24 वा पट्टाभिषेक वर्धन्तोत्सव व श्रीमती मंजुळाबाई खतगावकर सभागृहाचा लोकार्पण सोहळा दि.17 रोजी येथील आनंदनगर परिसरात संपन्न होणार आहे. आनंदनगर येथील श्री केदार जगद्गुरु यांच्या आश्रमात सकाळी 8 पासून सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी श्रीमती मंजुळाबाई खतगावकर सभागृहाचे निर्माते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह खा.डॉ.शिवाजी काळगे, खा.डॉ.अजित गोपछडे,आ.बालाजी कल्याणकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आ.अमरनाथ राजूरकर, रोहिदास चव्हाण, उद्योजक सुमीत मोरगे, युवानेते रविंद्र वसंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सकाळी 8 ते 12 यावेळेत श्...
Mata Saheb Devaji : माता साहेब देवाजी जन्मोत्सवाचे उद्घाटन; उद्या नेजाबाजीच्या कवायती -NNL

Mata Saheb Devaji : माता साहेब देवाजी जन्मोत्सवाचे उद्घाटन; उद्या नेजाबाजीच्या कवायती -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| मुगट परिसरातील गुरुद्वारा मातासाहेब येथे माता साहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सवाचे उद्घाटन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेबचे मित ग्रंथी भाई गुरमीतसिंघजी यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 11 वाजता पार पडले. यावेळी गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुखी संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवा वाले आणी मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, मातासाहेब गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी, बाबा दियालसिंघजी बूढा दल, बाबा गुरसेवकसिंघजी मुखतियारे आम, बाबा लखवीरसिंघजी मोहाली, बाबा मेलासिंघजी प्रचारक, बाबा मेहरसिंघजी नबीलाबाद यांची मुख्य उपस्थिती होती. माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवानिम्मित मोठ्या संख्येत भाविक उपस्थित झाले आहेत. सकाळी सुशोभित दिवान हाल मध्ये सर्व प्रथम श्री गुरु ग्रन्थसाहेब यांचे पाठ प्रारंभ करण्यात आले. तसेच कीर्तन आणी अरदास करण्यात आली. तख्त सचखंड येथील हजूरी रागी भा...
Navratri Festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून झरी खदान येथे विसर्जन – NNL

Navratri Festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून झरी खदान येथे विसर्जन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील व‌ सिडको हडको शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून गरबा दांडिया खेळात महिलांच्या मोठ्या सहभागाने रात्री उशिरा पर्यंत झरी खदान येथे विसर्जन करण्यात आले, यावेळी जागोजागी प्रसाद व‌ पाणी वाटप करण्यात आले तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिडको हडको असदवन,वाघाळा, वसरणी, जुना कौठा, नवीन कौठा या शहरी भागात परवाना‌ व विना‌ परवना‌४७ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी तर ग्रामीण भागातील धनेगाव,वाजेगाव,तुप्पा, विष्णुपुरी, कांकाडी, भायेगाव, यासह ग्रामीण भागात ५० विनापरवाना व‌परवाना सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी नोंदणी केली होती. सिडको ‌व हडको भागातील ‌ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी आकर्षक व‌सुबक मोठ्य...
Dhammachakra Pravartan Day ; लोह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा ; माजी खा.चिखलीकर यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासअभिवादन – NNL

Dhammachakra Pravartan Day ; लोह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा ; माजी खा.चिखलीकर यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासअभिवादन – NNL

धार्मिक, नांदेड
लोहा| धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.क्रांतिसूर्य बुद्ध विहार,ज्ञानदीप बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार , जायकवाडी कॅम्प येथे पंचशील व निळा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले खीरदान करण्यात आली . शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने क्रांतिसूर्य बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे ,तालुकाध्यक्ष बापूसाहेब कापुरे याच्या हस्ते पंचशील व निळया ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले पूजापाठ धोंडिबा एनभूरे यांनी केले. जुन्या शहरातील त्रिरत्न बुद्ध विहारात माजी नगरसेवक उत्तम महाबळे , मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली सिद्धार्थ महाबळे ,रवी महाबळे यांनी खीर दान...
error: Content is protected !!