Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Usmannagar ; उस्माननगर येथे अखंड दत्त नाम सप्ताह व दत्त प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन – NNL

Usmannagar ; उस्माननगर येथे अखंड दत्त नाम सप्ताह व दत्त प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन – NNL

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उस्माननगर (मोठी लाठी) ता. कंधार येथील दत्त मंदिरात श्री दत्तनाम सप्ताह श्री. १०८ कैवल्यवाशी श्री गंभीरबन महंत महाराज कोलंबी यांच्या कृपा आशीवादाने आयोजित केला आहे. व तपोनिधी श्री संत गुरुवर्य शंकरबन महाराज गुरु अमृतबन महाराज मठ संस्थान इसाद (उस्माननगर, मोठी लाठी) यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अखंड दत्तनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ७ ते ८ बाळक्रिंडा ग्रंथांचे पारायण, सकाळी १० ते १२ महापुजा, दुपारी २ ते ४ पोथी, सायंकाळी ६. ते ९ महापुजा, रात्रीला नामवंत, विनोदाचार्य किर्तनकारांचे किर्तन होईल. याप्रसंगी दि.८ डिसेंबर रोज रविवारी रात्री किर्तनकार आनंदबन महाराज तुपा, दि. ९ डिसेंबर रोज सोमवारी चंद्रकांत महाराज लाठकर, दि १० डिसेंबर रोज मंगळवारी वेदांताचार्य दिगंबर महाराज वसमतकर...
Santshrestha Dnyaneshwar Maharaj Sanjivan Samadhi ; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने गावात पालखी सोहळा व महाप्रसाद भंडारा – NNL

Santshrestha Dnyaneshwar Maharaj Sanjivan Samadhi ; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने गावात पालखी सोहळा व महाप्रसाद भंडारा – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमीत्त विष्णुपुरी येथे ग्रंथाची पालखी सोहळा निमित्ताने गावातुन मिरवणूक काढण्यात आली तर सकाळी हभप मधुसूदन महाराज कापसीकर यांच्या काल्याचा किर्तन व महाप्रसाद भंडारा आयोजन करण्यात आले होते,या सप्ताहाची सांगता हभप नंदकिशोर महाराज आदरसोडेकर परभणी यांच्या काल्याचा किर्तनाने होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने लक्ष्मण शक्ती, अखंड हरिनाम सप्ताह विष्णुपुरी येथे कै.मामासाहेब मारतळेकर, श्री रामजी ठाकूर महा राज मुख्य पुजारी, डॉ.हरजिंदर सिंघ बाबाजी दसमेस गुरूव्दारा विष्णुपुरी,सोमभारती महाराज , दत्तमंदिर, वंसतराव‌ कुलकर्णी, नृसिहं मंदिर व्यवस्थापक‌ ,यांच्या कृपा आशिर्वादाने विष्णुपुरी येथे 22ते 29 नोव्हेबर आयोजित करण्यात आले‌. आहे.भागवत कथाकार हभप दिपक गुरू महाराज ठोणे पांगर...
Kakda Dindi : पळशीकर परिवारातर्फे काकडा दिंडीत सामील झालेल्या महिला – पुरुषांचा शाल, पुष्पहाराने जोरदार स्वागत-NNL

Kakda Dindi : पळशीकर परिवारातर्फे काकडा दिंडीत सामील झालेल्या महिला – पुरुषांचा शाल, पुष्पहाराने जोरदार स्वागत-NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरु झालेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या काकडा दिंडीचा दि.१६ शनिवारी शहरातील मुख्य रस्त्याने पालखी दिंडी काढून समारोप करण्यात आला. दरम्यान पालखी दिंडी येताच प्रसिद्ध व्यापारी पळशीकर बंधूं परिवाराच्या वतीने दिंडीत सामील झालेल्या शेकडो महिला पुरुष भाविक भजनी मंडळींचा शाल, पुष्पहाराने स्वागत सन्मान करण्यात आला. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कार्तीक मासात अखंडपणे चालत आलेला काकडा आरती दिंडी समाप्ती निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्याने टाळ मृदंगाच्या वाणीतून भव्य पालखी दिंडी व शोभा यात्रा काढण्यात आली होती. येथील श्री परमेश्वर मंदिरातर्फे काढण्यात आलेल्या काकडा आरती दिंडीत शेकडोच्या संख्येने महिला पुरुष वारकरी संप्रदायातील भजनी मंडळी सामील झाली होती. दिंडीची सुरुवात जेष्ठ संचालक वामनराव बनसोडे यांच्या उपस्थिती करण्यात आली. यावेळी ब...
Karthik Swami Darshan : वाढोण्याचा बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी पूर्ण -NNL

Karthik Swami Darshan : वाढोण्याचा बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी पूर्ण -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील मुर्त्यांची शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) शहरातील बालाजी मंदिरात विराजमान असलेल्या भगवान श्री कार्तिक स्वामी (षडानंद) दर्शन समापन दिनानिमित्त मंदिराच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी कार्तिक शु.१४ शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी कार्तिक पोर्णिमा कृतिका नक्षत्र दिनी कार्तिक स्वामी दर्शन घेत येणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा रात्री १० ते ०२ यावेळेत आला असल्याची माहिती वेद शास्त्रीय संपन्न पुरोहित कांतागुरु वाळके यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. हिमायतनगर शहर हे देवी - देवतांच्या मुर्त्यांचे शहर म्हणून सबंध महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त आहे. हजारो वर्षापूर्वीच्या अखंड पाषाणातील दुर्मिळ मुर्त्या खोदकाम तथा बांधकामाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. त्यातीलच एक मूर्ती म्हणजे (षडानंद...
Annakut Mahaprasad organized : बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगर‌ कौठा यांच्या वतीने अन्नकुट महाप्रसाद आयोजन -NNL

Annakut Mahaprasad organized : बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगर‌ कौठा यांच्या वतीने अन्नकुट महाप्रसाद आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगर कवठा नांदेड तर्फे दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी श्री बालाजी मंदिर विकास नगर कवठा येथे अन्न कुठ महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी पाच पासून ते नऊ वाजे पर्यंत या महाप्रसादाचे वाटप होणार आहे. श्री भगवान बालाजींना छप्पन प्रकारचा भोग लावणार आहोत तसेच यानिमित्ताने 2000 भाविकांना महाप्रसाद पुरेल असे नियोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचे देणगीदार नवल सेठ गुप्ता हे आहेत. विकास नगर वृंदावन कॉलनी गाडगे महाराज सोसायटी बसवेश्वर नगर नरसिंह गल्ली व जुना कवठा परिसरातील सर्व भाविकांना या महाप्रसादासाठी सहकुटुंब सह परिवारांना निमंत्रित करण्यात येत असून या महाप्रसाद तरी हा महाप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात आले आहे....
Shri Shiv Mahapuran Katha and Tulshi marriage program : लखमापूर येथे श्री शिव महापुराण कथा व तुलशी विवाह कार्यक्रमाचे आज पासून भव्य आयोजन -NNL

Shri Shiv Mahapuran Katha and Tulshi marriage program : लखमापूर येथे श्री शिव महापुराण कथा व तुलशी विवाह कार्यक्रमाचे आज पासून भव्य आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूरगडाच्या पायत्याशी असलेल्या मौजे लखमापूर गावामध्ये प्रथमचः परमपुज्य धर्माचार्य श्रीकृष्णाकुमार पांडेय (शास्त्री) श्रीक्षेत्र काशी (वाराणसी) यांच्या सुमधूर वाणीतून श्री शिव महापुराण कथा व तुलशी विवाह कार्यक्रमाचे दि.०६ ते १२ नौव्हेंबर २०२४ या सातदिवसाच्या कालावधी दरम्यान दु.१ ते ४ वा.पर्यंत येथील उमा महेश्वर आश्रम लखमापूर याठिकाणी भव्य आयोजन करण्यात आले असून दि.१३ नोव्हेंबर रोजी भव्य कलश यात्रा व श्रीकृष्ण विवाह शोभायात्रा काढण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी प.पु.महंत श्री प्रयागराज गीरी (बापू) महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या आयोजनाच्या माध्यमातून दि.०६ रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. पंकजपाल महाराज (सत्यपाल महाराजांचे शिष्य) यांचे किर्तन,दि.०७ रोजी रात्री ८ ते १०. ह.भ.प. रामेश्वर महाराज खोडे (व्यसनमुक्ती सम्राट) इसापुर (महाराष्ट्र शासन पुरस्क...
Kakada Aarti at Himayatnagar’s Kalinka Temple : हिमायतनगरच्या कालिंका मंदिरातील काकडा आरतीला महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

Kakada Aarti at Himayatnagar’s Kalinka Temple : हिमायतनगरच्या कालिंका मंदिरातील काकडा आरतीला महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| मनोकामना पूर्ण करणाऱ्या माता कालिंका मंदिरात कोजागिरी पोर्णिमेपासून सुरु करण्यात आलेल्या काकडा आरतीला पंचक्रोशीतील महिला मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. पिढ्यान पिड्या चालत आलेली परंपरा जोपासत काकडा आरतीबरोबर हरिपाठ, विविध कार्यक्रम साजरे केले जात असल्यामुळे श्री कालिंका मंदिर परिसरात सकाळच्या प्रहरी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू धर्मात देवी - देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केली जाणारी आरती म्हणजे काकडा आरती होय. महिनाभर चालणाऱ्या काकडा आरतीला परिसरातील महिला मंडळी सकाळच्या रामप्रहरी अभ्यंगस्नान करून घरासमोर सडा - सारवन, रांगोळी काढून नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिरात एकत्र होतात. देवीच्या मूर्तींला काकडयाने ज्योत ओवाळत काकडा आरती केली जाते. तत्पूर्वी कालिंका मातेचा अभिषेक पूजा आणि त्यानंतर धर्मीक गीते गाऊन काकडा आरतीला सुरुवात होत...
Gurudwara Sri Nanaksar Sahib : गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे सालाना बरसी उत्साहात साजरी -NNL

Gurudwara Sri Nanaksar Sahib : गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे सालाना बरसी उत्साहात साजरी -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| विष्णुपुरी येथील गुरुद्वारा श्री नानकसार साहिब येथे संतां ची सालाना बरसी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सचखंड गुरुद्वारा चे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ जी, लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरिंदरसिंघ जी कारसेवावाले व संत बाबा बलविंदरसिंघ जी कारसेवावाले यांची प्रमुख उपस्थिती होती. महान कारसेवक सचखंडवासी संत बाबा दलीपसिंघ जी ,सचखंडवासी संत बाबा जीवनसिंघजी, सचखंडवासी संत बाबा हरिसिंघ जी आणि सचखंडवासी संत बाबा शीशासिंघ जी कारसेवा वाले यांची सालाना बरसी श्रद्धेने साजरी करण्यात आली. या शुभप्रसंगी श्री अखंड पाठ,संत, थोर सद्गुणी व रागी सज्जन कीर्तन व प्रवचन झाले. वाजेगव ते शिकारघाट, शिकारघाट ते हिरा घाट आणि विद्यापीठ ते रतनगड पर्यंतचा रस्ता आणि शिकारघाट येथील गोदावरी नदी वरील पुल संत बाबा दलीपसिंघ जी...
Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| शहरातील गोरगरीब, मजूरदार वर्ग वास्तव्य करणाऱ्या परिसरातील म्हणजेच लकडोबा चौकात असलेल्या हनुमान मंदिरात या भागातील वारकरी सांप्रदायिक महिला मंडळाच्या पुढाकारातून यावर्षीपासून काकडा आरतीच्या प्रथेला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळच्या प्रहरी होणाऱ्या आरतीला शेकडोच्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होत असल्याने दिवाळीच्या पर्वामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या रामप्रहरी म्हणजे चार वाजता अभ्यंगस्नान करून घरासमोर सडा - सारवन आणि रांगोळी काढून महिला मंडळी परिसरातील लकडोबा चौकात असलेल्या गदाधारी हनुमान मंदिर सभागृहात एकत्र होतात. या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची पूजा करून पाच वाजता काकडा आरतीला सुरुवात केली जाते. विविध प्रकारचे धार्मिक गीते, आरती म्हणत शेवटी काकडा आरती केली जाते. त्यानंतर पसायदान घेत काकडा आरतीच्या समारोप केला जातो. तसेच महि...
Shri.Sant Agdambuwa Yatra at Kalambar : कलंबर ( बु. ) येथे श्री.संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा -NNL

Shri.Sant Agdambuwa Yatra at Kalambar : कलंबर ( बु. ) येथे श्री.संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा -NNL

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर ( बु) लोहा येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिमवत वैराग्य पिठाधीश्वर श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु भीमाशंकर महास्वामीजी , शिवाचार्यरत्न श्री. ष. ब्र. प्र. षडाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात दि . २८ ऑक्टोबर २०२४ पासून श्री संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी यात्रेनिमित्त जिजाऊ बल्ड सेंटर शिवाजी नगर नांदेड यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आणि दि.चार नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी पाच वाजता श्री संत अगडंमबुवा पालखीचे अग्नी प्रवेश होईल. कलंबर बु. ता. लोहा येथे अनेक वर्षांपासून श्री संत अगडंमबुवा यात्रा चालू आहे. पंचक्रोशीतील भाविक भक्त व गावातील बाईल लेक आवर्जून दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. पंचक्रोशीतील हजारो भाविक ...
error: Content is protected !!