उस्माननगर, माणिक भिसे l दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उस्माननगर (मोठी लाठी) ता. कंधार येथील दत्त मंदिरात श्री दत्तनाम सप्ताह श्री. १०८ कैवल्यवाशी श्री गंभीरबन महंत महाराज कोलंबी यांच्या कृपा आशीवादाने आयोजित केला आहे. व तपोनिधी श्री संत गुरुवर्य शंकरबन महाराज गुरु अमृतबन महाराज मठ संस्थान इसाद (उस्माननगर, मोठी लाठी) यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
अखंड दत्तनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ७ ते ८ बाळक्रिंडा ग्रंथांचे पारायण, सकाळी १० ते १२ महापुजा, दुपारी २ ते ४ पोथी, सायंकाळी ६. ते ९ महापुजा, रात्रीला नामवंत, विनोदाचार्य किर्तनकारांचे किर्तन होईल.
याप्रसंगी दि.८ डिसेंबर रोज रविवारी रात्री किर्तनकार आनंदबन महाराज तुपा, दि. ९ डिसेंबर रोज सोमवारी चंद्रकांत महाराज लाठकर, दि १० डिसेंबर रोज मंगळवारी वेदांताचार्य दिगंबर महाराज वसमतकर, दि.११ डिसेंबर रोज बुधवारी रूद्रगिर महाराज किवळेकर , दि. १२ डिसेंबर रोजी गुरूवार शामसुंदर गिरी महाराज आष्टी ,दि. १३ डिसेंबर रोजी शुक्रवार सच्चिदानंद बन महाराज सरेगाव, दि. १४ डिसेंबर रोजी रविवार श्री.महंत यदुबन महाराज कोलंबीकर यांचे आगमन व दुपारी ठिक १२ वाजता दत्त प्रगट सोहळा संपन्न होईल त्यानंतर दुपारी ३ वाजता सार्वजनिक महाप्रसादाचे व पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री ९ ते पहाटे ६ पर्यंत श्री.श्री. १०८ महंत यदुबन गुरू गंभीर बन महाराज यांच्या हस्ते ६४ श्रीफळांची आनंद दत्त महापुजा होईल. दि. १५ डिसेंबर रोजी रविवारी सकाळी ठीक ६ वा. काकडा आरती होईल काकडा आरती झाल्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यांने पालखी सोहळा निघेल व दुपारी १२ वाजता दहीहंडी व काला तपोनिधी श्री संत गुरुवर्य शंकरबन महाराज यांच्या हस्ते होणार आहे तरी उस्माननगर परिसरातील भक्तमंडळी यांनी अखंड दत्तनाम सप्ताह व दत्त प्रगट दिन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक वैराग्यमुर्ती श्री. संत अवधुतबन गुरूशंकरबन महाराज व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.