नांदेड| हिमालयातील केदारपीठाचे जगद्गुरु श्रीश्रीश्री 1008 भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा 24 वा पट्टाभिषेक वर्धन्तोत्सव व श्रीमती मंजुळाबाई खतगावकर सभागृहाचा लोकार्पण सोहळा दि.17 रोजी येथील आनंदनगर परिसरात संपन्न होणार आहे.

आनंदनगर येथील श्री केदार जगद्गुरु यांच्या आश्रमात सकाळी 8 पासून सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी श्रीमती मंजुळाबाई खतगावकर सभागृहाचे निर्माते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह खा.डॉ.शिवाजी काळगे, खा.डॉ.अजित गोपछडे,आ.बालाजी कल्याणकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आ.अमरनाथ राजूरकर, रोहिदास चव्हाण, उद्योजक सुमीत मोरगे, युवानेते रविंद्र वसंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सकाळी 8 ते 12 यावेळेत श्री केदार जगद्गुरु यांची इष्टलिंग महापुजा, दु.1 ते 2 सभागृहाचे लोकार्पण व धर्मसभा आणि त्यानंतर दु.2 ते सायंकाळी 6 यावेळेत दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास इतर मान्यवरांसह तमलूरकर महाराज, बिचकुंदेकर महाराज, उदगीरकर महाराज, बेटमोगरेकर महाराज, पुर्णेकर महाराज व संत बाबा बलविंदरसिंघजी महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

तरी या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी आ.ईश्वरराव भोसीकर, ओमप्रकाश पोकर्णा,किशोर स्वामी, हरिहरराव भोसीकर, आनंद चव्हाण, एकनाथ मामडे, बालाजी पांडागळे, संतोष पांडागळे,राजू एकलारे, गोविंदराव माखणे , राजेंद्र हुरणे, डॉ.गोविंद नांदेडे, माधवराव पटणे, माधवराव एकलारे, संजय बेळगे, ॲड.बालासाहेब कपाळे, बबन बारसे, रजत अग्रवाल,शिवराज जवळेकर, सुनिल शेट्टे, डॉ.माधवराव कहाळेकर, विश्वांभर भोसीकर, दत्तात्रय पांडागळे, शिवाजीराव कपाळे, भगवान येमले, विजय होकर्णे, निवृत्ती माळी, कामाजी अमृतवार, हनमंत संगनोर यांनी केले आहे.
