Saturday, May 16

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Sudhir Mungantiwar : पुढील वर्षापासून महिला गणेशोत्सव मंडळांना विशेष पुरस्कार देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार -NNL

Sudhir Mungantiwar : पुढील वर्षापासून महिला गणेशोत्सव मंडळांना विशेष पुरस्कार देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| महाराष्ट्रात गणेशोत्सवात महिला मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास पुढील वर्षीपासून विशेष पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे आज पारितोषिक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव सुमंत ...
Does BJP’s math fail somewhere? : भाजपाचे कुठेतरी गणित बिघडते का ? किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भाजपला चिंतन करण्याची गरज -NNL

Does BJP’s math fail somewhere? : भाजपाचे कुठेतरी गणित बिघडते का ? किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भाजपला चिंतन करण्याची गरज -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट विधानसभा मतदार क्षेत्रातील विधानसभेची निवडणूक अत्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईकांना त्यांच्या आजूबाजूच्या पदाधिकार्‍यांवर जनमत नाराज झाल्याचा परिणाम मतदानावर झाला. मतदारांनी हुलकावणी दिल्याने पराभवाचा झटका सोसावा लागला. म्हणतात ना, आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा भाजपा उमेदवाराचा नकारार्थी मतदारांचा कौल निर्णायक करुन अनपेक्षीत विजय झाला. भाजपाने ताकद पणाला लाऊनही केवळ तेरा हजाराचे मताधैक्य म्हणजे गौरवशाली बाब नाही. त्यावेळच्या बर्‍याचअंशी मतदारांनी आज मितीस भाजपाची साथ सोडल्यामुळे भाजपासाठी हा चिंतनाचा विषय ठरु शकतो. त्यातच किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव के राम यांनी कोट्यावधी रुपयाची कामे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये खेचून आणली. पण त्यांच्या कामाची कुठे उद्घाटन ...
Dr. Rekhatai Chavan met Chabharekar : काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी घेतली गंगाधरराव चाभरेकर यांची भेट -NNL

Dr. Rekhatai Chavan met Chabharekar : काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी घेतली गंगाधरराव चाभरेकर यांची भेट -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याला अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथीला मोठा वेग आला आहे. काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीकडून इच्छुक आणि उमेदवारी मिळण्याच्या आघाडीवर असलेल्या डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांची भेट घेऊन चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे खरोखरच डॉ.रेखाताईंना काँग्रेसची उमेदवारी मिळणार आहे का...?अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.  हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून डाॅ. रेखाताई चव्हाण काम करीत आहेत. गावभेटीवर त्यांचा जास्त भर असून, विकासापासून कोसो दूर असेलल्या गावात.. ठिक ठिकाणी जावून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्या जाणून घेत आ...
Deputy Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – NNL

Deputy Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – NNL

राजकीय, मुंबई
सोलापूर| राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, ...
Chief Minister’s Women’s Empowerment Campaign ; मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात गुरुवारी नांदेड येथे भव्य महिलांचा महामेळावा – NNL

Chief Minister’s Women’s Empowerment Campaign ; मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानात गुरुवारी नांदेड येथे भव्य महिलांचा महामेळावा – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड | महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसह अनेक पथदर्शी योजना आणल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीतून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. या योजनातील लाभार्थी महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी 10 ऑक्टोबरला नांदेड येथे भव्य महिला मेळावा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी 10 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड येथे महिला सशक्तिकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. नांदेड येथील नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर भव्य होणाऱ्या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, मा. बाळास...
Nana Patole ; हरियाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव: नाना पटोले – NNL

Nana Patole ; हरियाणातील निकाल हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव: नाना पटोले – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| हरियाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला व भाजपाचे उमेदवार निवडून आले. ज्या ईव्हीएमच्या बॅटरी ६०-७० टक्के चार्ज होत्या त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेद...
NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL

NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्यातील महायुती सरकारने अनेक उद्योगधंद्दे गुजरात राज्यामध्ये पळविले आहेत, अनेक धोरणे नागरिकांच्या विरोधात राबविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी ग्रामीणचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आणि राष्ट्रवादी युवक-शरदचंद्र पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे दि.8 ऑक्टोबर रोजी महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करून महाराष्ट्रातील उद्योग धंद्दे गुजरातमध्ये पळवून नेवू नका आदी स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील आयटीआय चौक येथे आंदोलन करण्यात आले. राज्यातील तिघाडी सरकार सर्व क्षेत्रामध्ये निष्क्रीय ठरले असून मोठ्या उद्योगपतीनाच अधिक श्रीमंत करण्याच...
Vanchit Bahujan Aghadi ; वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेकांच्या प्रवेश – NNL

Vanchit Bahujan Aghadi ; वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेकांच्या प्रवेश – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| वंचित बहुजन आघाडी मध्ये अंजलीताई आंबेडकर यांच्या सह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेकांनी प्रवेश केला यावेळी स्वागत करण्यात आले. ६ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील मध्यवर्ती वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालय नावघाट जुना नांदेड येथे अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती कॉन्ट्रॅक्टर राजु वाघमारे भिमवाडी,सिद्धार्थ ट्रान्सपोर्टचे मालक रमेश भुरे धनजकर, केवळ मंडप डेकोरेशन सिडकोचे मालक रमेश झगडे,व सामाजिक कार्यकर्ते गौतम डुमणे,यांच्या सह अनेकांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार फारुक अहेमद ,प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे,भंते पंय्याबोधी, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी,जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले,युवा प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे,महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, जिल्हा महासचिव शाम कांबळे ,...
Manohar Dhonde sir ; आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करा – प्रा. मनोहर धोंडे सर – NNL

Manohar Dhonde sir ; आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करा – प्रा. मनोहर धोंडे सर – NNL

राजकीय, नांदेड
उस्माननगर | आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील मतदार राजांनी निवडणुकीत परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन सेवा जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा ,प्रमुख, उमेदवार प्रा.मनोहर धोंडे सर यांनी केले. माळाकोळी येथील प्रचंड जनसमुदायाची सभा ही विजयी सभा वाटते असे प्रतिपादन सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर यांनी माळाकोळी येथील प्रचंड जाहीर सभेत केले. सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीने सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख तथा लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ६ ऑक्टोबर रोजी लोहा शहरातुन भव्य दिव्य अशी हजारोंच्या संख्येने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सदरील मोटारसायकल रॅली ही लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोहा बायपास रोड असा रोड शो करुन लोहा,पोलेवाडी, खेडकरवाडी व्हाया माळाकोळी अशी काढण्यात आली या ...
Dr. Supriya Naik ; डॉ. सुप्रिया नाईक यांनी घेतला दांडीयावर ठेका – NNL

Dr. Supriya Naik ; डॉ. सुप्रिया नाईक यांनी घेतला दांडीयावर ठेका – NNL

राजकीय, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध पक्षाचे पदाधिकारी नवरात्र महोत्सवामध्ये जोमाने कामाला लागलेली किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पहावयास मिळत आहे. त्यातच मतदारसंघांमध्ये जम बसलेले व शरदचंद्र पवार गटाचे प्रबळ दावेदार असलेले उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक हे प्रचार माध्यमातून कशे मागे राहतील सद्यस्थितीत प्रदीप नाईक हे या प्रचार यंत्रणेत आघाडीवर आहेत व त्यांच्या सुनबाई डॉक्टर सुप्रिया नाईक यांनी तर चक्क महिला मंडळाच्या दांडिया मध्ये जाऊन सहभाग नोंदवत उपस्थिती दर्शवली. तालुका भरातील दुर्गा मंडळाला आवर्जून भेटी देऊन खना नारळाने ओठी भरताना दिसून येत आहेत. किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ इस्लापूर, शिवनी, मारलागुंडा, दयाळ धानोरा , कंचली , गोंडेमहागाव, चिखली अंदबोरी,मलकापूर खेरडा, घोटी, दत्त नगर, सिरमेठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार किनवट मह...
error: Content is protected !!