Saturday, May 16

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Bhoomipujan ; सहयोग, इंदिरा नगरात ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – NNL

Bhoomipujan ; सहयोग, इंदिरा नगरात ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नातून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विकास निधीतून सहयोग नगर, इंदिरा नगर मधील मंजूर झालेल्या विकास कामांचे दि. ११ ऑक्टोबर रोजी सहयोग नगर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. शहरातील सहयोग नगर, इंदिरा नगर मधील नागरिकांच्या मागणीनुसार साहेबराव गायकवाड यांनी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा करून गणपती मंदिर ते नागेंद्र अलशेट्टी यांच्या घरापर्यंत नालीवरील छत, सिनू यांच्या गिरणी समोरील रस्ता व नाली, भिमराव सोनाळे यांच्या घराशेजारील बोळी मधील अंतर्गत रस्ते, नाली इंदिरा नगर मधील सीसी रस्ता आदी कामांसाठी ५५ लक्ष रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व निधी मंजूर करून दिला. या निधी मधील कामांचे भूमिपूजन सहयोग नगर ...
Arun Chavan : गोरगरीब जानेतच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी मला नाईलाजस्तव राजकारणात उतरावं लागलं – अरुण चव्हाण -NNL

Arun Chavan : गोरगरीब जानेतच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी मला नाईलाजस्तव राजकारणात उतरावं लागलं – अरुण चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात आली असून सर्वच पक्ष आपापल्या परीनं निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. येथील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित गृहीत धरला जात असून विरोधी पक्ष असलेला म्हविकासआघाडी कडून अनेकांनी गुडघ्याला बासिंग बांधले आहे. परंतु येथील सोशीत, वंचित, गोरगरीब जनतेच्या मूलभूत प्रश्नाचे कोणासच काही घेणे देणे नसल्याचे आजवरच्या राजकारणावरून दिसून येत असल्यामुळे मला येथून निवडणूक लढवायची आहे. असे प्रतिपादन एका खासगी पत्रकार परिषदेत केले. मी गेली सतार अठरा वर्षांपासून घरा दाराचा त्याग करून फक्त आणि फक्त समाजसेवा करण्याच्या उद्देशातून मी आजवर भारतभर भ्रमण केल असून त्यावेळी मी गोरगरिबांच्या समस्या जवळून पाहिल्यात म्हणून मला माझ्या मतदार संघातील मूलभूत गरजा अजूनही बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहिल्याने अनेकजण कामासाठी मोठया शहरात, बाहेर राज्यात...
Chitrarath of Congress : भाजपा युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देणारा काँग्रेसचा चित्ररथ नांदेडमध्ये -NNL

Chitrarath of Congress : भाजपा युती सरकारच्या भ्रष्ट कारभाराची माहिती देणारा काँग्रेसचा चित्ररथ नांदेडमध्ये -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भाजपा-शिंदे महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार जनतेपुढे आणण्यासाठी काँग्रेसने चित्ररथ तयार केले असून हे चित्ररथ भ्रष्ट युती सरकारच्या कारभाराची पोलखोल करत आहेत. नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रचाररथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहनराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, लोकसभा समन्वयक श्याम दरक, मसूद खान अनिल मोरे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण, कार्याध्यक्ष राजेश पावडे, बालाजी चव्हाण, महेश देशमुख, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, माजी उपमहापौर अब्दुल गफार, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष अजिज कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, कुमार कुर्तडीकर, दिपूसिंग हूजूरीया, शर्मा, बापूसाहेब पाटील, रागेजी सुर...
Discussion and Expenditure : चर्चा आणि खर्चा…उत्तर मतदार संघात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांचा 5000 घड्याळ वाटपाचा उपक्रम – NNL

Discussion and Expenditure : चर्चा आणि खर्चा…उत्तर मतदार संघात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांचा 5000 घड्याळ वाटपाचा उपक्रम – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,गोविंद मुंडकर| विधानसभा निवडणूकीची आता केवळ घोषणा होणे शिल्लक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अंतिम टप्प्यात प्रचार यंत्रणेत गुंतलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघात प्रचार करणे आणि पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी संपर्क करणे, यात प्रत्येक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक असलेले उमेदवार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांनी विविध लक्षवेधी उपक्रम व आंदोलने राबवून प्रचार तंत्र अनेक अपेक्षा भिन्न असल्याचे स्पष्ट केले 5000 घड्याळ वाटपाचा उपक्रम खर्च उमेदवाराचा चर्चा प्रचाराची सुरू आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात चित्र रंगात आले आहे. राजेश पावडे यांच्या प्रचार यंत्रणेमुळे हर घर काँग्रेसचा पंजा पोहोचला आहे. विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक इच्...
Venkatesh Patil Talangkar : सरकार कुणाचंही असो वैकुंठधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करेन – व्यंकटेश पाटील तालंगकर -NNL

Venkatesh Patil Talangkar : सरकार कुणाचंही असो वैकुंठधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करेन – व्यंकटेश पाटील तालंगकर -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| सोशल मीडियावर मी नितीन मुधोळकर यांची पोस्ट पहिली कि येथील मंजूर झालेला निधी परत गेला. त्यावर संपर्क करून माहित घेतली आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हिमायतनगरच्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमीला पालकमंत्री गिरीशजी महाजन यांनी डीपीडीसी मधून प्रतिक्षालय बांधकामासाठी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कामाला सुरुवात होऊन येथे येणाऱ्यांना बसण्याची सोय होणार आहे. यावरही स्मशान भूमीत आणखी काही करायच असेल तर मला हाक द्या. सरकार कुणाचंही असो वैकुंठधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करिन असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटेश पाटील तालंगकर यांनी दिली. दिनांक ११ शुक्रवारी वैकुंठधाम स्मशान भूमीतील प्रतिक्षालय बांधकामाच भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटेश पाटील तालंगकर य...
Prataprao Patil Chikhlikar : लोहा -कंधारच्या जनतेनी नेहमीच खंबीर साथ दिली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Prataprao Patil Chikhlikar : लोहा -कंधारच्या जनतेनी नेहमीच खंबीर साथ दिली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा कंधार तालुक्यातील जनतेनी नेहमीच मला साथ दिली.अडीअडचणीच्या काळात आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात .आपण मोठे केलात .एकमेकाच्या सुखदुःखात धावून जातो हे निवडणुकी पुरते संबंध नाहीत ते हे आपुलकीचे नाते आहे. लोहा विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक लाढविणार आहे.मी कोणाच्या विरोधात नाही पण कोणी माझे विरोधात असतीलही असे सांगून सोशल मीडियात वाट्टेल ते बोलणे मर्यादा पार करणारे आहे. कोणाला बोलतो आहोत याची भान असले पाहिजे असा सज्जड इशारा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांनी उचली जीभ लावली टाळूला असे कमेंट करणाऱ्या नेटकाऱ्यांना दिला. लोहा शहरातील मोंढा येथील गणपती मंदिरात व्यापाऱ्यांशी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची हितगुज केले.त्याच्या अडीअडचणी जाऊन घेतल्या .यावेळी कृउबा संचालक माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, संचालक व माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,सचिन पाटील चिखलीकर व्यापारी असो...
Prakash Marawar : नांदेड विमानतळ पोलिस स्टेशन स्थलांतर करा – प्रकाश मारावार -NNL

Prakash Marawar : नांदेड विमानतळ पोलिस स्टेशन स्थलांतर करा – प्रकाश मारावार -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन अनेक समस्या ग्रस्ताने व्यापलेला असून मनप भूखंडावर तात्काळ नंतर करण्याची मागणी पोलीस उपमहानिरीक्षक माननीय शहाजी उमाप साहेब यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी मागणी केली. नांदेड शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन पौर्णिमा नगर येथील एका बोळीत असून पोलीस स्टेशनला जाण्यासाठी अरुंद रस्ता. पार्किंग सुविधा नाही. अपुरी इमारत. पावसाळ्यात छत गळती. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या सुविधा. अशा अनेक समस्या ग्रस्त असलेला पोलीस स्टेशन. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनचा रस्ताच माहीत होत नाही. विमानतळ पोलीस स्टेशन खाजगी मालकाच्या इमारतीमध्ये असल्या कारणामुळे शासनाच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या मनपा भूखंड क्रमांक 96 94 या जागेवर स्थलांतर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...
Suryakanta patil ; प्रदीप नाईक यांना तुम्ही आमदार करा मी जमानतदार होते….. सुर्यकांता पाटील माजी केंद्रीय मंत्री -NNL

Suryakanta patil ; प्रदीप नाईक यांना तुम्ही आमदार करा मी जमानतदार होते….. सुर्यकांता पाटील माजी केंद्रीय मंत्री -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे। किनवट येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता देशाचे उद्योगपती रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.या मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावर बोलत असताना तुम्ही प्रदीप नाईक यांना आमदार करा प्रदीप नाईक यांना मंत्री करायची जबाबदारी मी घेते. कारण महाराष्ट्रात येणार सरकार हे महाविकास आघाडीचेच असणार आहे. प्रदीप नाईक यांना मी जवळून ओळखते मी गेल्या दहा वर्षात भाजपात असल्याने कदाचित प्रदीप नाईक हे पडले असतील. मी पण भाजपात राहून गेली दहा वर्षभर वनवासच भोगला. मि निवडणूक लढवेल अथवा लढवणार नाही पण सक्रिय राजकारणातच राहणार आहे. मी कायमस्वरूपी तुमची जमानतदार म्हणून किनवट माहूर मतदारसंघाच्या पाठीशी उभे राहणार आहे असे मत सूर्यकांता पाटील यांनी या पक्ष सोहळ्याच्य...
Devendra Fadnavis’ tribute to Ratan Tata : मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला – देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली -NNL

Devendra Fadnavis’ tribute to Ratan Tata : मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला – देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्याहीपलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले. फार पूर्वी टाटा ट्रस्टने कर्करोग रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्रा...
Minister vijaykumar gavit ; मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते 120 आश्रम शाळा, वसतिगृहांचे ऑनलाइन भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न -NNL

Minister vijaykumar gavit ; मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते 120 आश्रम शाळा, वसतिगृहांचे ऑनलाइन भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत नव्याने बांधकाम केलेल्या सुमारे १२० इमारतींचे आज ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन व नविन इमारती बांधकामांचे भुमीपुजन आदिवासी विकास मंत्री ना. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा वसतिगृहांच्या इमारतींचे भूमिपूजन व उद्घाटन झाले आहे. त्यामध्ये किनवट तालुक्यातील पाटोदा, बोधडी, तलाईगुडा, सारखणी, या आदिवासी आश्रम शाळांचा समावेश आहे. या अर्थाने महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते पार पडलेला हा ऑनलाइन सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरला. नंदुरबार येथे आज दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता नंदुरबार शहरातील शासकीय आदिवासी वसतिगृह आवारात हा सोहळा पार पडला. ऑनलाइन उद्घाटन व भूमि...
error: Content is protected !!