Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

District Chief Vivek Deshmukh : शिवकार्य अभियान घराघरात पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – जिल्हाप्रमुख विवेक देशमुख

District Chief Vivek Deshmukh : शिवकार्य अभियान घराघरात पोचविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – जिल्हाप्रमुख विवेक देशमुख

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसापासून ( शिवकार्य ) शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाला गती देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवनीनूसार ८०% समाजकारण व २०% राजकारण अश्या प्रमाणात काम करावे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून घराघरात शिवसेना सदस्य नोंदणीचे काम वेगाने पूर्ण करावे. असे अवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) विवेक देशमुख (Shiv Sainiks should start working to deliver Shivkarya Abhiyan to every household - District Chief Vivek Deshmukh) यांनी केले. ते हिमायतनगर येथे दिनांक ०९ रविवार आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिवकार्य अभियान तसेच शिवस...
CIDCO ; सिडको परिसरा लगत असलेल्या ऑईल मिल मधील ‌काळी राख तात्काळ थांबावा

CIDCO ; सिडको परिसरा लगत असलेल्या ऑईल मिल मधील ‌काळी राख तात्काळ थांबावा

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l नवीन नांदेड शहरा‌ लगत असलेल्या सिडको औद्योगिक वसाहतीतील कार्यरत असलेल्या अनेक ऑइल मिल मधून निघालेली काळी राख सिडको हडको परीसरात हवेच्या माध्यमातून पसरल्या मुळे परिसरातील नागरिकांनी अनेक आरोग्य विषयक समस्या तोंड द्यावे लागत आहे. संबंधीत प्रदुषण विभागाने तात्काळ कार्यवाही करून परिसरात येणारी काळी राख बंदोबस्त करावा‌ अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिडको हडको परीसरा लगत असलेल्या औधौगिक वसाहतीतील कार्यरत असलेल्या अनेक ऑईल मिल कारखाने असून दरवर्षी सिडको हडको परिसरातील अनेकांच्या निवासस्थानी छतावर, अंगणात, चारचाकी, दुचाकी वाहनांवर मोठ्या प्रमाणात काळी राख मोठ्या प्रमाणात साचत आहे तर सकाळी फिरणाऱ्या अनेक जेष्ठ नागरिक युवक यांच्ये नाकात , डोळ्यात,जात असल्याने आरोग्य धोक्यात आले. असून या काळया राखेची ...
Deputy Chief Minister Eknathrao Shinde ; उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ विद्यार्थी अन्नदान

Deputy Chief Minister Eknathrao Shinde ; उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथ विद्यार्थी अन्नदान

नांदेड, राजकीय
नविन नांदेड l महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे संस्थापक मूख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महिलांचे लाडके भाऊ म्हणून परिचीत असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने व त्यांच्या टिम च्या वतीने दि ९ फेब्रुवारी रोजी जवाहरनगर येथिल प्राथमिक अरोग्य केंद्र येथे शेकडो गरोदर महिला सह रूग्णांना केळी व सफरचंद वाटप तर प्राथमिक अरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले. व धनगरवाडी येथिल लहुजी साळवे निराधार निराश्रीत बालकाश्रम आनाथ निराधार विद्यार्थी यांना अन्नदान करून विद्यार्थी यांना शालेय साहित्य शैक्षणिक परिक्षाचे प्याड व पे...
Increase the amount of penalty in the Right to Information Act : माहिती अधिकार अधिनियमात दंडाची रक्कम वाढवा

Increase the amount of penalty in the Right to Information Act : माहिती अधिकार अधिनियमात दंडाची रक्कम वाढवा

नांदेड, राजकीय
नांदेड| माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गंत माहिती अधिकारी यांच्या दंडाच्या रक्कमेत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी तसेच प्रथम अपिलीय अधिकारी यांना सुद्धा दंडाच्या कक्षेत समाविष्ट करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक कार्याध्यक्ष सिद्धार्थ तलवारे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात सिद्धार्थ तलवारे यांनी म्हटले आहे की, दंडाची रक्कम नगण्य असल्यामुळे संबंधित माहिती अधिकार्‍यांची माहिती न देण्याची वृत्ती झाली आहे. सद्यःपरिस्थितीत राज्यस्तरावर प्रलंबित प्रकरणांची संख्या लाखोंच्या घरात आहे. माहिती अधिकार कायदा सन 2005 पासून लागू झाला आहे. 20 वर्षापूर्वी 25 हजार रुपये दंडाची तरतदू करण्यात आली होती. त्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे. 2005 मध्ये माहिती अधिकारी यांना सहाव्या वेतन आयोगानुसार 10 हजार ...
Nana Patole : शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार: नाना पटोले

Nana Patole : शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार: नाना पटोले

मुंबई, राजकीय
मुंबई| देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या १५८ कोटींचा खरेदीत ८७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. कृषी विभागातील घोटाळ्याचा पर्दाफाश करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकामागोमाग एक घोटाळा उघड करत आहेत. नाना पटोले यांनी आज नॅनो युरीया व नॅनो DAP खरेदीमधील घोटाळ्याचा पर्दाफाश केला आह...
CIDCO ; भाजपा सिडको मंडळाचा वतीने दिल्ली विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळाल्या बदल जल्लोष

CIDCO ; भाजपा सिडको मंडळाचा वतीने दिल्ली विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळाल्या बदल जल्लोष

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको भाजपा मंडळ यांच्या वतीने दिल्ली विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळाल्या बदल सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नांदेड भाजपा कार्यकारी अध्यक्ष अमर भाऊ राजुरकर,प्रविण साले व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. दिल्ली विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळाल्या नंतर सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन रावका यांच्या नेतृत्वाखाली सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 9 फेब्रुवारी रोजी सकाळी नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष अमर भाऊ राजुरकर प्रविण साले, व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव देविदास राठोड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य जनार्दन ठाकुर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळु खोमणे, अभिषेक सौदे विजय येवनकर, जिल्हा सरचिट...
Dcm Eknath Shinde : समृद्धी महामार्ग प्रमाणे शक्तिपीठ मार्गाचाही विरोध मावळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Dcm Eknath Shinde : समृद्धी महामार्ग प्रमाणे शक्तिपीठ मार्गाचाही विरोध मावळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड, राजकीय
नांदेडI महामार्ग हे विकासाचे 'गेमचेंजर 'म्हणून सिद्ध होतात. समृद्धी महामार्गाने हे सिद्ध केले आहे. सुरूवातीला समृद्धी महामार्गाला विरोध होता. समृद्धी सारखाच या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध देखील हळूहळू मावळेल, असा आशावाद उपमुख्यमंत्री तथा राज्याचे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये व्यक्त केला. एकनाथ शिंदे एक दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर आले होते. दिवसभरात त्यांचे विविध कार्यक्रम होते. दुपारी गुरुगोविंद सिंघजी नांदेड विमानतळावर आगमनानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नांदेड येथील पवित्र श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा येथे भेट देऊन दर्शन घेतले. दुपारी त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. सायंकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी #शक्तिपीठ महामार्गाचा विरोध ओसरेल असे स्पष्ट केले. ते म्हणाले समृद्धी किंवा शक्तिपीठ सारखे महामार्ग केवळ द...
Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंह जी विमानतळावर एक दिवसाच्या दौऱ्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास आगमन झाले. त्यांच्यासोबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. नांदेडच्या गुरु गोविंद सिंह जी विमानतळावर त्यांचे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील,आ. बालाजी कल्याणकर,आ.बाबुराव कदम कोहळीकर,आ.संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींची उपस्थिती होती. विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री.हुजूर साहिब सचखंड गुरूद्वाराकडे रवाना झ...
Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच आज नांदेड आगमन

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच आज नांदेड आगमन

नांदेड, राजकीय
नांदेड| महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरूवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून, निवडणूक काळात जनतेने दिलेल्या आशीर्वादाचे आभार मानणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. गुरूवार 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वा. मुंबई विमानतळ येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वाराकडे प्रयाण. दुपारी 12.35 वा. श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.50 वा. मोटारीने नवा मोंढा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. जाहीर आभार सभा. स्थळ- मार्केट कमिटी मैदान नवा मोंढा नांदेड. दुपारी 2.45 वा. मोटारीने विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. विविध पदाधिकारी, शिष्टमंडळ प्रतिनिधी व महत्वाच्या व...
Deputy Chief Minister Ajit Pawar : शासकीय कार्यालयामध्ये सौरऊर्जेच्या वापराकडे विशेष लक्ष द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार 

Deputy Chief Minister Ajit Pawar : शासकीय कार्यालयामध्ये सौरऊर्जेच्या वापराकडे विशेष लक्ष द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार 

नांदेड, राजकीय
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेने काम करावे. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जे संदर्भात प्रस्तावाचा समावेश करावा, अशी सूचना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज येथे केली. उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई येथून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना ( डीपीसी ) संदर्भातील राज्यस्तरीय बैठक दृकश्राव्य माध्यमाद्वारे घेण्यात आली. या बैठकीला मंत्रालयातून इतर मागास बहुजन कल्याण,पशुसंवर्धन,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे,आमदार प्रताप पाटील चिखलीकर,  यांची उपस्थिती होती. बैठकीला वित्त नियोजन राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, नवी दिल्लीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,अप्पर मुख्य सचिव राजगोपाल वर्मा,वि...
error: Content is protected !!