Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Sanjay Kaitwad : अखेर निष्ठावंत शिवसैनिकाला मिळाला न्याय उबाठाच्या हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुखपदी संजय काईतवाड

Sanjay Kaitwad : अखेर निष्ठावंत शिवसैनिकाला मिळाला न्याय उबाठाच्या हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुखपदी संजय काईतवाड

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून हिमायतनगर तालुकाप्रमुख पदी संजय काईतवाड, शहर प्रमुखपदी प्रकाश रामदिनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यावर पक्ष संघटन वाढीची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागण्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी निवडीने शिवसेना पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधीकारी यांच्या निवडी सामना या मुखपत्रातून दिनांक २२ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कट्टर समर्थक, हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातील युवा कार्यकर्ता, बोरगडी येथील माजी सरपंच तथा नि...
BJP government’s : भाजप सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे – भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख

BJP government’s : भाजप सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे – भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| देशात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल झाले असून अनेक योजना आहेत याची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. असे प्रतिपादन भाजप नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांनी केले. शनिवारी हदगाव येथील संत रोहिदास सभागृहात भाजप तालुका व शहर मंडळाच्या " संवाद" बैठकीत ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माधवराव पाटील उच्चेकर यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देश सुरक्षित व प्रगतिशील बनला आहे. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की डॉक्टर, अभियंते, शिक्षक, व्यापारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते हे थेट जोडले जावेत अशी अपेक्षा व्यक्त त्यांनी केली. भाजपा अध्यक्ष देशमुख यांनी काँग्रेसच्या काळातील परिस्थितीची आठवण करून देताना सांगितले की, पूर्वी सामान्य माणसाला घरासाठी शासकीय कार्...
Yoga makes the body strong : योगामुळे शरीर सुदृढ, मन शांत आणि जीवन शिस्तबद्ध होते- डॉ. अजितजी गोपछडे

Yoga makes the body strong : योगामुळे शरीर सुदृढ, मन शांत आणि जीवन शिस्तबद्ध होते- डॉ. अजितजी गोपछडे

नांदेड, राजकीय
नांदेड| तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा, तसेच निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे 'योग' तन आणि मन तंदुरुस्त राखण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. उत्तम व संतुलित आरोग्य राखण्यास योग उपयुक्त आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदीजींच्या संकल्पनेतून आजचा दिवस "हा जागतिक योग दिन" म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या आरोग्यदायी दिनाच्या औचित्याने आज "शैक्षणिक प्रतिष्ठान सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड व भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉ. अजितजी गोपछडे, भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री श्री. संजयजी कौडगे, सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड चे सचिव तथा भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण चे जिल्हाध्यक्ष डॉ सं...
Mla.Prataparav Patil Chikhlikar : साधू महाराज कंधारकर यांच्या पायीदिंडीचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मित्र मंडळाकडून स्वागत

Mla.Prataparav Patil Chikhlikar : साधू महाराज कंधारकर यांच्या पायीदिंडीचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मित्र मंडळाकडून स्वागत

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्यातील पंढरपूरकडे जानारी सर्वात मोठी पायीदिंडी कंधार येथून निघते व आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भक्त आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरला पोहचते. यावर्षी 19 जून 2025 रोजी कंधार येथून दिंडी निघाली व आज दिनांक 21 जून रोजी माळेगांव यात्रा ता.येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आ.प्रतापराव पाटील चिखलीकर परिवार व मित्र मंडळ यांच्याकडून दिंडीतील माऊली भक्तांना मनोभावे फराळ, जेवण व यथोचित सत्कार सन्मान करून नांदेड सरहद्दी वरून पंढरपूरकडे रवाना करण्यात आले. या प्रसंगी बोलताना आ.चिखलीकर म्हणाले विठ्ठलाच्या आशिर्वादाने निवडून आलो माऊली भक्तांच्या सेवेसाठी कमी पडणार नाही. साधू महाराज कंधारकर यांच्या दिंडी सोहळ्याची कमान नांदेड, लातूर सरहद्दीवर निच्शित करणार आसे सांगितले. निवडणूक झाली या वेळेस लोकांनी जाती आधारित मतदान केले. माझा समाज एकवट माझ्यासोबत नसतानाही सर्व समाजातील सु...
Mla. Sreejaya Chavan : आ. श्रीजया चव्हाण यांचे पत्र आणि पोलीस अधीक्षकांचे ‘मिशन निर्भया’!

Mla. Sreejaya Chavan : आ. श्रीजया चव्हाण यांचे पत्र आणि पोलीस अधीक्षकांचे ‘मिशन निर्भया’!

नांदेड, राजकीय
नांदेड| सजग लोकप्रतिनिधी आणि तत्पर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागातून व्यापक समाजहितासाठी प्रभावी संकल्पना कशा आखल्या जाऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण नांदेड पोलिसांच्या ‘मिशन निर्भया’ उपक्रमातून समोर आले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेविषयी जनजागृती मोहीम राबवण्याच्या मागणीसंदर्भात आ. श्रीजया चव्हाण यांनी लिहिलेल्या पत्राला अनुसरून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने ‘मिशन निर्भया’ हा उपक्रम आखला असून, पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुक्रवारी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. ‘मिशन निर्भया’च्या उपक्रमाचे स्वागत आणि पोलिसांच्या जनजागृती व्याख्यानांना श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीतून सुरुवात करण्याची सूचना मांडण्यासाठी आ. श्रीजया चव्हाण आणि सोसायटीचे सचिव तसेच माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची त्यांच्या कार्याल...
Yoga Camp ; लोह्यात – प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या योग शिबिरास प्रचंड प्रतिसाद

Yoga Camp ; लोह्यात – प्राणिताताई देवरे चिखलीकर यांच्या योग शिबिरास प्रचंड प्रतिसाद

नांदेड, राजकीय
लोहा। आजच्या बदलत्या धावपळीच्या काळात स्वास्थ्य निरोगीमय असायला पाहिजे त्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार असायला पाहिजे. दररोज सकाळी योगा केल्याने शरीर सदृढ व उत्साही असते दिवसभर मनावरील ताणतणाव कमी होण्यास याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांनी व्यायामा सोबतच दररोज अभ्यास करावा एक योगा पृथ्वीसाठी व एक शरीरासाठी होतो. असे मार्गदर्शन भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले. लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राणिताताई देवरे चिखलीकर याच्या प्रमुख उपस्थितीत अकराव्या जागतिक योगदिनाच्या निमित्ताने आयोजित भव्य योग शिबिरास मार्गदर्शक करताना प्राणिताताई म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देश व जागतिक पातळीवर योगाला नेले आज लाखो लोकांना याच फायदा होत आहे. रामदेव बाबांनी योग घराघरात पोहचविला आहे .दररोज सकाळी मॉर्निग...
Gharkul scheme ; देगलूर तालुक्यांमध्ये घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची होणारी लुबाडणूक थांबवा…!

Gharkul scheme ; देगलूर तालुक्यांमध्ये घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची होणारी लुबाडणूक थांबवा…!

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून लुबाडणूक होत असुन ही लूट त्वरित थांबवावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार भरतसुर्यवंशी साहेब, गटविकास अधिकारी माळेगांवकर साहेब पोलिस निरीक्षक मुंडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी देगलूर तालुक्यामध्ये ११ हजार घरकुल लाभार्थ्यांचे बिले काढण्यासाठी घराची फोटो काढून झाल्यानंतर लाभार्थ्याकडे दहा पंधरा हजार रुपयाची मागणी करत आहेत सर्वसामान्य लाभार्थ्यांची होत असलेली लूट गंभीर बाब आहे व तसेच तालुक्यातील सिंचन विहिर,पाणंद रस्ते इत्यादी एमआरजीएस अंतर्गत होणाऱ्या कामाची संबंधित विभागाचे कर्मचारी पैशाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करून लूट करत आहेत. गटविकास अधिकारी साहेबांनी यामध्ये लवकरात लवकर दखल देऊन...
Guardian Minister Atul Save : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सात पंचायत समित्यांना शासकीय वाहनांचे वितरण

Guardian Minister Atul Save : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सात पंचायत समित्यांना शासकीय वाहनांचे वितरण

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचे वितरण आज करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे यांनी हिरवा झेंडा दाखवून सदर वाहने संबंधित तालुक्यांकडे रवाना केली. कार्यक्रमास खासदार अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमादार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रकाश चन्‍ना, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप ...
construct Dak Bhavan : नांदेड आणि बिलोली येथे डाक भवन उभारणीच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा

construct Dak Bhavan : नांदेड आणि बिलोली येथे डाक भवन उभारणीच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड आणि जिल्ह्यातील बिलोली येथे अत्याधुनिक असे डाक भवन उभारावे यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कडे फेब्रुवारी 2025 मध्ये संसद अधिवेशन काळात मागणी केली होती. त्याला अनुसरुन मंत्री महोदयांनी तात्काळ प्रस्ताव सादर करणे बाबत संबंधित विभागास सुचना केल्या होत्या. जिल्हास्तरावरून केंद्राकडे प्रस्ताव सादर करणेची प्रक्रिया सुरु असुन त्याला गती देऊन मंजुरी द्यावी आणि आर्थिक तरतूद करावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दिल्लीत काल ना .ज्योतिरादित्य सिंधिया यांची खा. गोपछडे यांनी भेट घेऊन डाक भवन उभारणीसाठी स्मरणपत्र दिले. यानुषंगाने खा.डॉ.गोपछडे यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील डाक सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण असून, सध्या अस्तित्वात असलेली नांदेड डाक विभागाची कार्यालये ब्रिटीश काली...
Ashokrao Chavan supporters : सुधा मच्छिमार सहकारी संस्थेवर खा. अशोकराव चव्हाण समर्थकांचा झेंडा

Ashokrao Chavan supporters : सुधा मच्छिमार सहकारी संस्थेवर खा. अशोकराव चव्हाण समर्थकांचा झेंडा

नांदेड, राजकीय
नांदेड| रेणापूर, ता. भोकर येथील सुधा मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेते खा. अशोकराव चव्हाण यांच्या समर्थकांनी बिनविरोध झेंडा फडकवला आहे. या विजयाने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील यांचे या संस्थेवरील मागील २५ वर्षांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. संस्थेच्या एकूण १३ संचालकांपैकी ११ जागेवर भारतीय जनता पक्षाचे नेते खा. अशोकराव चव्हाण यांचे समर्थक बिनविरोधी निवडून आले आहेत. सर्वसाधारण गटातून रामदास कापसे, टिकाजी कांबळे, उत्तम देशमुख, शंकर देवकर, गणपतराव माळवंदकर, शिवराज कापसे, दिगंबर ढगे, किशन सुरेशकर, भटक्या व विमुक्त जाती गटातून रामचंद्र बाभळे, इतर मागास प्रवर्ग गटातून वैजनाथ क्षीरसागर तर अनुसूचित जाती व जमाती गटातून संभाजी तेले यांची सुधा मच्छिमार सहकारी संस्थेवर बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या विजयी संचालकांनी आज नांदेड येथे माजी मुख्यमं...
error: Content is protected !!