Wednesday, May 20

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister meets Prime Minister Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट ;  पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत

Chief Minister meets Prime Minister Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट ; पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत

मुंबई, देश विदेश, राजकीय
नवी दिल्ली| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या दृष्टीने महाराष्ट्र शासन करीत असलेले उपाय इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय सविस्तर चर्चा केली. गडचिरोली पोलाद सिटी गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य...
Health Camp Mahur : माहूर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात शिवसेनेचा राडा

Health Camp Mahur : माहूर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात शिवसेनेचा राडा

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मात्र, या शिबिराच्या उद्घाटनावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची वाट न बघता आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आल्याने शिवसेना संतप्त झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी कार्यक्रमात गोंधळ घालत उद्घाटन सोहळा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी, भाजप पदाधिकारी, आमदार केराम उपस्थित होते; मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावले गेले नाही. यामुळे तालुकाप्रमुख जितू चोले, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांच्यासह शिवसैनिक आक्रोशले. दरम्यान, दुपार...
Kha. Ashokrao Chavan ; वाढीव मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करणार!: खा. अशोकराव चव्हाण

Kha. Ashokrao Chavan ; वाढीव मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करणार!: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड l महाराष्ट्रात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून, शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला खा. रवींद्र चव्हाण, आ. राजेश पवार, भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. जिल्हाधिकारी व इतर प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीत नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व उपाययोजनांबाबत चर्चा झाली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ५५३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी नुकसानाची तीव्रता पाहता वाढीव मदतीची आवश्यकता असल्याचे खा. अशोकराव चव्हाण याप्रसंगी म्हणाले. तेलंगणाती...
Ashokrao Chavan ; खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर!

Ashokrao Chavan ; खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर!

नांदेड, राजकीय
नांदेड l माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी गुरुवारी मुदखेड तालुक्यातील मुगट, आमदुरा, खडकूत, देळूब बु. परिसरात पूरग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर आ. श्रीजया चव्हाण यांनी रोही पिंपळगाव व माळकौठा भागातही पाहणी केली. महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जायकवाडी व विष्णुपुरी धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोदावरी नदी व आसना नदी तुडूंब भरून वाहत असल्यामुळे मुदखेड - ब्राह्मणवाडा मार्गै नांदेडकडे जाणारा रस्ता दोन दिवसापासून बंद झाला आहे. मुदखेड तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करताना खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल...
MP Ajit Gopchhade : खासदार अजित गोपछडे यांची कार्यकत्यावर कडी नजर

MP Ajit Gopchhade : खासदार अजित गोपछडे यांची कार्यकत्यावर कडी नजर

नांदेड, राजकीय
देगलूर, गंगाधर मठवाले | शहापूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कनकटे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (हातावर घड्याळ बांधत) प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा ठिणगीसारखा परिणाम भाजपाच्या कार्यकत्यांवर होऊ नये, यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी शहापूर व परिसरातील कार्यकत्यांवर कडी नजर ठेवली असल्याचे चित्र दिसत आहे. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते गगारेडी कोटगिरे यांचा नांदेड येथे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात खासदारांनी शहापूर परिसरातील गावांना विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले. 🔹 शिवाजी कनकटे यांचा राजकीय प्रवास कनकटे यांनी अगोदर काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. परंतु, आता त्यांनी हातावर घड्याळ बांधत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे कट्टर विरोधक असलेले गगारेडी कोटगिरे यांच्यासोबत ते एकाच पक्षात आल्याने राजकीय...
MP Nagesh Patil : हिंगोली–नांदेड–यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ: खासदार नागेश पाटील मागणी करतात शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये मदत

MP Nagesh Patil : हिंगोली–नांदेड–यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ: खासदार नागेश पाटील मागणी करतात शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपये मदत

नांदेड, यवतमाळ, राजकीय, हिंगोली
हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके नष्ट; खासदार नागेश पाटील यांनी तातडीने आर्थिक मदत, पीकविमा दावे मंजूर करण्यास आणि बँक वसुली थांबवण्याची मागणी केली.   हिंगोली/नांदेड, अनिल मादसवार| हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे मोठ्या संकटात आले आहेत. हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरखेड आणि महागांव तालुक्यांतील हजारो हेक्टर शेती नुकसानग्रस्त झाली असून अनेक घरं व ओढ्यालगत भागांवर पुराचा फटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, माती वाहून गेली आहे आणि काही भागांत पिकांचे नुकसान अत्यंत गंभीर झाले आहे. पंचनामे वेळेत न होणे आणि नुकसानाचे वास्तविक मूल्यांकन योग्य प्रकारे न होणे यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देत, खासदार नागेश पाटील...
Ardhapur Taluka Congress : राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – अर्धापूर तालुका काँग्रेसची मागणी

Ardhapur Taluka Congress : राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – अर्धापूर तालुका काँग्रेसची मागणी

नांदेड, राजकीय
नांदेड| यावर्षीच्या खरिप हंगामात झालेल्या सतत अतिवृष्टीमुळे सतत पुराने थैमान घातले पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.सर्वत्र शेती व पिके जलमय झाले.जमिनी रखडल्याने पुढच्या कांहीं वर्षे पिक येणार नाही अशी परिस्थिती झाली आहे अतोनात नुकसान झाले आहे.अश्या संकटात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा.व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट नुकसान भरपाई द्यावी, सरसकट पिक विमा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,केळीचे नुकसान झाले त्यांनी सोयाबीन पेरणी केली तेही पेरणी गेली त्यांचे नावे नोंदवून घ्यावी तसेच शक्ती पीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने आज रोजी बुधवारी अर्धापूर तहसीलदार यांच्या मार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती उर्फ पपू पाटील कोंढेकर, अर्धापूर तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात...
Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरडी चर्चा झाली. सरकारने झोपेतून जागे व्हावे व संकटातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीने द्यावेत व शेतजमीन खरडून गेली त्यांना हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे ...
Vaifani Gram Panchayat  : सरपंच अविश्‍वास प्रस्‍तावाबाबत वायफणी ग्रामपंचायतची शुक्रवारी विशेष ग्रामसभा

Vaifani Gram Panchayat : सरपंच अविश्‍वास प्रस्‍तावाबाबत वायफणी ग्रामपंचायतची शुक्रवारी विशेष ग्रामसभा

नांदेड, राजकीय
माहूर/नांदेड| माहूर तालुक्यातील मौजे वायफणी या ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सौ. गोकर्णा सुरेश अंकुरवाड यांच्या विरुध्द दाखल झालेल्या तसेच 16 सप्टेंबर 2025 रोजी तीन- चतुर्थांश (%) मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार माहूर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत "विशेष ग्रामसभा" जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायफणी येथे घेण्यात येणार आहे. याबाबत वायफणी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना नोंद घ्यावी, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार माहूर यांनी केले आहे. या ग्रामसभेत विशेष ग्रामसभा घेण्याकरीता प्रचलीत नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक आहे.सभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करण्याकामी शिरगणना करण्याच्या पध्दतीने साध्या बहुमताने त्यास अनुसमर्थन देण्यात येईल. या कामी दिनांक 1 ऑक्टोबर ...
Dr Rekhatai chavhan visit : स्व. शेख चांदभाई यांच्या कुटुंबाचं काँग्रेसच्या डॉ. रेखाताई चव्हाण यांच्याकडून सांत्वन

Dr Rekhatai chavhan visit : स्व. शेख चांदभाई यांच्या कुटुंबाचं काँग्रेसच्या डॉ. रेखाताई चव्हाण यांच्याकडून सांत्वन

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| शहराचे ज्येष्ठ राजकीय नेते माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. शेख चांद शेख महेबुब यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. रेखाताई चव्हाण यांनी आज शेख रफिक सेठ यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केलं. दि. 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी हिमायतनगर शहरातील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शेख रफिक भाई यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व स्व. शेख चांदभाई यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाल्या. यावेळी त्या म्हणाल्या की, “स्व. शेख चांदभाई यांचे काँग्रेस पक्षाला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या क्षणी काँग्रेस परिवार संपूर्णपणे त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे.” या ...
error: Content is protected !!