Saturday, May 16

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Kavyadhara : सहस्र काव्यधारा संमेलनाचे आज सहस्रकुंड येथे आयोजन

Kavyadhara : सहस्र काव्यधारा संमेलनाचे आज सहस्रकुंड येथे आयोजन

नांदेड, करियर
नांदेड| मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सहस्रकुंड येथे सहस्र काव्यधारा या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कवी व्यंकटेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कवी संमेलनात नांदेड जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. मराठी साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड सातत्याने अनेक उपक्रम राबवत आहे. याच उपक्रमांतर्गत अनेक कवींना हक्काचे व्यासपीठ मिळावे. त्यांच्या कविता सादरीकरणाने मराठी काव्य क्षेत्राला नव्याने भरभराटी यावी यासाठीही मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने येत्या 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सहस्रकुंड येथे सहस्र काव्यधारा संमेलन पार पडणार आहे. या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ साहित्यि...
जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नांदेड, करियर
नांदेड l जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली 13 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत विद्यालयातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीस बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांदळे, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. नवीन इमारत, पायाभूत सुविधा व क्रीडासाधनांसाठी मान्यता जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी विद्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून पुढील प्रक्रियेअंतर्गत विद्यालयाला नवीन इमारत उपलब्ध होऊ शकेल. विद्यालयाचा एक्सप्रेस फिडर कनेक्शन विद्यालयापासून दूर असल्यामुळे ते तातडीने दुरुस्त करून पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सोलार वॉटर हिटर, खेळाच...

बदली पोर्टलवर नोंद असलेल्या युडीआयडी धारक दिव्यांग शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार बदलीसाठी प्राधान्य

नांदेड, करियर
नांदेड l प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 मधील तरतूद क्रमांक 1.8 मध्ये 1.8.1 ते 1.8.20 चे निकष पूर्ण करत असलेल्या शिक्षकांना बदलीमध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या प्राधान्यानुसार बदलीमध्ये सर्वात आगोदर युडीआयडीधारक दिव्यांग शिक्षक, जोडीदार, पाल्य गंभीर आजार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत व अशा एकूण 20 उपसंवर्गातील निकष पूर्ण करत असलेल्या आणि बदली पोर्टलवर नोंद केलेल्या शिक्षकांना निकषाच्या प्राधान्यातील उतरत्याक्रमाने सेवाजेष्ठतेनुसार शासन निर्णयात बदलीचे प्राधान्य देण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 चे निकष पूर्ण करत होते अशा शिक्षकांना बदलीमध्ये सूट घेण्याकरिता अथवा बदलीचा लाभ घेण्याकरीता प्रथमत: बदली पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असते. सन 2025 च्या बदलीमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मध्ये सहभाग घेण्याकरिता बदली पोर्टलवर न...
जनवादीच्या राज्य सचिवमंडळ सदस्यपदी कॉ.लता गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!

जनवादीच्या राज्य सचिवमंडळ सदस्यपदी कॉ.लता गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!

नांदेड, करियर
नांदेड l अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे. डहाणू जि.पालघर येथे पार पडलेल्या १३ व्या राज्य अधिवेशनात त्यांची निवड झाली असून नांदेड जिल्ह्यातील १३ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ३० हजार महिलांची जाहीर सभा घेण्यात आली. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जमसंच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ.पी.के.श्रीमती राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.मरीयम ढवळे, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.डॉ.अशोक ढवळे, डहाणूचे विद्येमान आमदार कॉ.विनोद निकोले आदी नेतृत्व होते. उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित ह्या होत्या. १ ते ३ नोव्हेंबर या तीन दिवशीय राज्य अधिवेशनात राज्य अध्यक्षा म्हणून कॉ.नसीमा शेख, राज्य सरचिटणीस म्हणून कॉ. प्राची हातीवलेकर तर कोषाध्यक्षपदी कॉ.रेखा देशपांडे यांची निवड एकमताने करण्यात आली. नां...
Shilatai Thakur ; सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.शिलाताई ठाकुर तर राज्यकमिटी पदी कॉ.वर्षाताई सांगडे यांची निवड

Shilatai Thakur ; सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.शिलाताई ठाकुर तर राज्यकमिटी पदी कॉ.वर्षाताई सांगडे यांची निवड

नांदेड, करियर
नांदेड l सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या चौथे राज्य अधिवेशन परळी ( वैजनाथ ) येथील प्रवचन मंडपात ८ व ९ नोव्हेंबर रोजी उत्साहात सपन्न झाले. परळी शहरात मोठी रॅली काढून जाहीर सभा घेण्यात आली. उपरोक्त अधिवेशनासाठी उदघाटक म्हणून फेडरेशनच्या राष्ट्रीय महासचिव कॉ.मधुमिता बंडोपाध्याय ह्या होत्या. निवडक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा कणा असलेल्या आशा व गटप्रवर्तक ताई मोठ्या संख्येने परळी शहरात दाखल झाल्या होत्या. सदरील अधिवेशन दोन दिवशीय झाले असून सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड, राज्य महासचिव कॉ.ऍड. एम.एच.शेख याची प्रमुख उपस्थिती आहे. मंचावर कॉ.आनंदी अवघडे, कॉ. पुष्पा पाटील,कॉ. शुभा शमीम, कॉ. आरमायटी इराणी कॉ. प्राची हतीवलेकर, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. डॉ.अशोक थोरात, कॉ.प्रभाकर नागरगोजे, कॉ.मंगल ठोंबरे आदींची उपस्थि...
Degalur School : “शिक्षण मंदिर की कचराकुंडी स्थळ?” — देगलूर जिल्हा परिषद हायस्कूलची विदारक अवस्था!

Degalur School : “शिक्षण मंदिर की कचराकुंडी स्थळ?” — देगलूर जिल्हा परिषद हायस्कूलची विदारक अवस्था!

करियर, नांदेड
नांदेड/देगलूर (गोविंद मुंडकर) राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा — तिन्ही स्तरांवर लोकप्रतिनिधी असलेला देगलूर मतदारसंघ... पण शिक्षणाच्या मंदिराची अवस्था पाहून कोणालाही लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली जिल्हा परिषद हायस्कूल, देगलूर, आज शिक्षणाचं केंद्र नसून अस्वच्छतेचं आणि दुर्गंधीचं केंद्र बनली आहे. शाळेच्या बाहेरील भिंतींवर लघवी, आजूबाजूला कचऱ्याचे ढीग, आणि वर्गांच्या परिसरात पसरलेली दुर्गंधी — अशा परिस्थितीत शेकडो विद्यार्थी रोज शिक्षण घेत आहेत. शाळेच्या भिंतींना सार्वजनिक शौचालयाचे स्वरूप प्राप्त झाले असून, दररोज १०० ते २०० नागरिक शिक्षणासाठी नव्हे तर लघवीसाठी या शाळेत येतात, ही अतिशय संतापजनक बाब आहे. ही शाळा त्या भागातील आहे जिथे राज्यसभेत अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे, लोकसभेत रवींद्र चव्हाण, आणि विधानसभेत जितेश अंतापुरकर हे प्रतिनिधित्व कर...
NBA ranking : शासकीय तंत्रनिकेतन नांदेडला एनबीए मानांकन : शिक्षण क्षेत्रात यशाची भर

NBA ranking : शासकीय तंत्रनिकेतन नांदेडला एनबीए मानांकन : शिक्षण क्षेत्रात यशाची भर

नांदेड, करियर
नांदेड| शासकीय तंत्रनिकेतन नांदेडच्या सिव्हिल, माहिती तंत्रज्ञान व विद्युत अभियांत्रीकी या विभागाला 31 डिसेंबर2028 पर्यंत तसेच यंत्र व उत्पादन अभियांत्रिकी या विभागाला दि. 30 जून 2027 पर्यंत National Board of Aceridinarion (NBA) कडून मानांकन प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) ही भारतातील एक स्वायत्त संस्था आहे जी अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि मान्यता राष्ट्रीय स्तरावर देते. सदर राष्ट्रीय मानांकण हे विभागाच्या दर्जेदार, शैक्षणिक आणि तांत्रिक सुविधासाठी मिळाले आहे. एनबीए मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि मुल्यांकन प्रणाली इ. बाबींची कसून तपासणी केली जाते. राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, चांगल्या नोकरीच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यात मदत होते. यामु...
School Condition : पीएम श्री शाळेचा दर्जा फक्त कागदावरच – शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलची दयनीय अवस्था

School Condition : पीएम श्री शाळेचा दर्जा फक्त कागदावरच – शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलची दयनीय अवस्था

नांदेड, करियर
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल ही तालुक्यातील एकमेव पीएम श्री योजनेत समाविष्ट शाळा आहे. या शाळेकडून दर्जेदार शिक्षण, स्वच्छता आणि पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र वास्तव चित्र पाहता या शाळेचा “पीएम श्री दर्जा फक्त कागदावरच” असल्याचे स्पष्ट होत आहे. शाळेत राबविण्यात येणारी शालेय पोषण आहार योजना अत्यंत अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरणात चालवली जात असल्याचे समोर आले आहे. स्वयंपाकघर, भोजन देण्याची जागा, तसेच भांडी धुण्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची असून स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले आहे. परिणामी गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट धोका निर्माण झाला आहे. शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार प्रशासक म्हणून कार्य करताना दिसत नाहीत, अशी पालकांची तक्रार आहे. विविध प्रश्न विचारल्यास ते उत्तर देण्यास टाळाटाळ करतात,...
Welding training : सिरंजनी व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी: मोफत वेल्डिंग प्रशिक्षण व रोजगाराची हमी!

Welding training : सिरंजनी व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी: मोफत वेल्डिंग प्रशिक्षण व रोजगाराची हमी!

नांदेड, करियर
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सिरंजनी व परिसरातील बेरोजगार युवकांसाठी रोजगाराचे नवे दार उघडत आहे. हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी यांच्या वतीने आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, लातूर यांच्या सौजन्याने मोफत वेल्डिंग कौशल्य प्रशिक्षण कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. सदर प्रशिक्षण कॅम्प दिनांक २ नोव्हेंबर २०२५ पासून सिरंजनी येथे सुरू होणार असून, या कॅम्पमध्ये ३० युवकांना अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून वेल्डिंग क्षेत्रातील संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ४५ दिवसांचा सघन प्रशिक्षण कार्यक्रम, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिंद्रा, टाटा, मारुती सुझुकी, टोयोटा यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी स्वयंरोजगारासाठी बँक कर्ज प्रकरणात संपूर्ण मार्गदर्शन, प्रशिक्षण काळात वेल्डिंगसाठी लागणारी सुरक्षा किट मोफत दिली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता व अटी लावण्यात आल्या असून, क...
Dr. Babasaheb Ambedkar Library ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन

Dr. Babasaheb Ambedkar Library ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन

करियर, नांदेड
कंधार, सचिन मोरे l कंधार नगरपरिषद अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन दिवाळी अंकांचे चार दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक 25 ते 28 ऑक्टोबर 2025 दरम्यान वाचकांसाठी खुले राहणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयाचे सहायक ग्रंथपाल मोहम्मद रफीक सत्तार यांच्या हस्ते झाली. यावेळी जेष्ठ पत्रकार सचिन मोरे, डॉ. शंकर धोंडीबा जोगदंड, माधव कांबळे, संजय कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी अंक पूजन व पुष्पार्पण करण्यात आले. या प्रदर्शनात बाल, महिला व प्रौढ वाचकांसाठी निवडक आणि वाचनीय दिवाळी अंक उपलब्ध करण्यात आले आहेत. यात आवाज, जत्रा, दीपावली शतायुषी, मौज, ज्योतिष तंत्र-मंत्र भन्नाट, हेर, एकच थरार, महाराष्ट्राची जत्रा, दहावी दिवाळी अंक, ग्रहांकित, अन्नपूर्णा आदी लोकप्रिय अंकांचा समावेश आहे. या प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक वाचकांनी घ...
error: Content is protected !!