Mahatma Jyotirao Phule Farmers Grant ; महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी अनुदान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड| महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 योजनेअंतर्गत 33 हजार 602 शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी यापुर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 75 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) केले नाही.

त्यामुळे सदर शेतकरी अद्याप शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 892 तर एचडीएफसी बँकेचे 39 कर्जदार शेतकरी समाविष्ट आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 या योजनेचे ऑनलाईन पोर्टल ऑगस्ट अखेरपर्यंत चालु असुन आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. तरी आधार प्रमाणीकरण (ई केवायसी) न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button