नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलामध्ये बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेन (बी.बी.ए.) या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरु करण्यात आलेली आहे.
सदरील अभ्यासक्रम हा व्यवसाय तसेच उद्योजकता व्यवस्थापनातील शिक्षण घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेया नांदेड विद्यापीठ परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या पात्रता प्रवेश (CET) परीक्षेतील गुणानुसार ऑनलाईन माध्यमातून राज्य शासनाच्या प्राधिकरणाच्या CAP-राऊड-२ पासून प्रवेश देणे सुरू झालेले आहेत. आता उर्वरित राऊंडमध्ये प्रवेश दिला जाणार असून विज्ञान शाखेतील जीवशास्त्र किंवा गणित विषय घेऊन शिकणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहेत.
नीट (NEET) व जेइई (JEE) सारख्या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्यायी अभ्यासक्रम उपलब्ध झालेला आहे. बीबीए हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार एकाधीक प्रवेश आणि निर्गमन सुविधा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी संकुलातील तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज इमारत, भव्य ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष व वायफाय इंटरनेट सुविधा विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोन वाढवण्याच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या संधीचा योग्य तो उपयोग सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन संकुलाचे संचालक तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी. एम. खंदारे यांनी केले आहे.