Homeनांदेडबारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे...

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

नांदेड | नांदेड जिल्ह्यात दि. 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व 112 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ थेट निरीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची बारावीची परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात राहणार असून झूम वेबकास्टच्या माध्यमातून परीक्षेतील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

याशिवाय महसूल विभागाचे विभागप्रमुख, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भरारी पथके जिल्हाभर कार्यरत राहणार आहेत. शिक्षण विभागाची सहा विशेष पथके देखील परीक्षेवर लक्ष ठेवणार आहेत.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक हे स्वतः विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परीक्षार्थी विद्यार्थी तसेच परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशासनास सहकार्य करून कॉपीमुक्त व सुरळीत परीक्षा पार पाडण्यास मदत करावी, असे आवाहन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments