श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भिमरावजी केराम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक दि,२५ रोजी होणार असल्याचे पत्र तहसीलदार माहूर यांनी काढले आहे.


सदर बैठकीस गटविकास अधिकारी पंचायत समिती, माहूर अंतर्गत ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी, महिला बचतगट, तालुका आरोग्य अधिकारी व सर्व आशा वर्कर, महिला आरोग्य कर्मचारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत सर्व महिला, अंगणवाडी सेविका / सुपरवायझर,तसेच नगरपंचायत माहूर मुख्यधिकारी यांच्या अधिनिस्त महिला बचत गट व अंगणवाडी सेविका यांना आपल्या स्तरावरून सर्वानी बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवार दि,२५ऑक्टोबर रोजी दू,१२वा. बालाजी मंगलम,माहूर येथे बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे,

“काय आहे लाडकी बहीण योजना”
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना १५०० रूपये असा आर्थिक लाभ मिळत आहे.
