बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
नांदेड | नांदेड जिल्ह्यात दि. 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व 112 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ थेट निरीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची बारावीची परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त, शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात राहणार असून झूम वेबकास्टच्या माध्यमातून परीक्षेतील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
याशिवाय महसूल विभागाचे विभागप्रमुख, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भरारी पथके जिल्हाभर कार्यरत राहणार आहेत. शिक्षण विभागाची सहा विशेष प...
