बारड/नांदेड| बारड येथील उबाठा गटाचे अनेक शिवसैनिक व मुस्लीम समाजातील नागरिकांनी बुधवारी भाजपा मुदखेड प्रभारी बाळासाहेब देशमुख बारडकर याच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये राम बालाजी गायकवाड, आत्माराम मारोतराव सोळंके, गोपाळ मारोती गायकवाड, नंदू शहापुरे, सैय्यद गौस, दौलत भाई, बबलू पिंजारी, इस्माईल चांदसाब, हाजी अब्दुल रज्जाक, फतरू सहाब, जमील मोमीन, मजहर शेख ग्रा.पं. सदस्य, जावीद मोमीन, हाफिज पिंजारी, आजम शेख, मुख्तार मेहबुब शेख आदींचा समावेश आहे.
येथील श्री लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आयोजित भाजप बुथ समिती प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान झालेल्या पक्ष प्रवेशाच्यावेळी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष बालाजी खटिंग, गोविंदराव शिंदे नागेलीकर, लक्ष्मणराव जाधव, उद्धवराव पवार, सभापती आनंदराव गादीलवाड, निलेश देशमुख, दिगांबर टिपरसे, सरपंच प्रभाकर आठवले, संजय औलवार, पुरुषोत्तम चांडक, शिवाजीराव पवार, श्रीहरी बैनवाड आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते.