Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भोकर, हिमायतनगर व धर्माबाद येथे मंगळवारी उद्योग मेळावा -NNL

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भोकर, हिमायतनगर व धर्माबाद येथे मंगळवारी उद्योग मेळावा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मंगळवार 1 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृह भोकर व पंचायत समिती सभागृह हिमायतनगर, पंचायत समिती सभागृह धर्माबाद येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 नांदेड जिल्हयास एकुण 1000 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या...
Raosaheb Danve : कार्यकर्त्यांनो,नेत्यांना भांडू द्या,तुम्ही एकसंघ राहा – रावसाहेब दानवे -NNL

Raosaheb Danve : कार्यकर्त्यांनो,नेत्यांना भांडू द्या,तुम्ही एकसंघ राहा – रावसाहेब दानवे -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| कोणतीही निवडणूक कार्यकर्त्यांच्या परिश्रमाशिवाय जिंकणे अशक्य आहे. कार्यकर्त्यांनो, पक्षातील नेत्यांना आपापसात भांडू द्या, तुम्ही मात्र एकसंघ राहून किनवट - माहूर विधानसभेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवा,असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी दि.२९ येथे केले. विशेषतः या कार्यक्रमाप्रसंगी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव के राम यांची अनुपस्थिती प्रामुख्याने दिसल्याने कार्यकर्त्यामध्ये चर्चेला उधाण आले होते. भाजपातील अंतर्गत गटबाजीचे दर्शन सुद्धा याप्रसंगी रावसाहेब दानवे यांना बघायला मिळाले . भाजप नेते डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या वडिलाच्या निधनाबद्दल दानवे यांनी रविवारी सूर्यवंशी यांची सांत्वनपर भेट घेतली.त्यानंतर गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद सभेला त्यांनी मार्गदर्शन केले.सभेस डॉ.अश...
Laxmanrao Bhavare : जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव -NNL

Laxmanrao Bhavare : जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव -NNL

करियर, नांदेड
नांदेड। सामाजिक,राजकीय कार्यात सदैव अग्रेसर व्यक्तिमत्व व मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे कामारीकर यांना मान नेतृत्वाचा सन्मान कर्तत्वाचा सोहळ्यात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. दै.वीर शिरोमणी, सा.नंदगिरीचा कानोसा व मायडी सेवाभावी संस्थेच्यावतिने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांचा गौरव नांदेडमधील गणराज पॅलेस येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, मनपाच्या माजी सभापती सौ.संगिता पाटील डक,रिपाई (आ.) महिला आघाडीच्या नेत्या वैशालीताई हिंगोले, ह.भ.प. एकनाथ महाराज कंधारकर, ह.भ.प.नामदेव महाराज बारुळकर,या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शे...
Com. Ujwala Padalwad : आमदारांच्या मतदार संघात आंदोलनकर्त्यां महिलांना 7 दिवस वाट पहावी लागते ही मोठी शोकांतिका – कॉ. उज्वला पडलवाड -NNL

Com. Ujwala Padalwad : आमदारांच्या मतदार संघात आंदोलनकर्त्यां महिलांना 7 दिवस वाट पहावी लागते ही मोठी शोकांतिका – कॉ. उज्वला पडलवाड -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार। गेल्या २४ तारखेपासून मजुरदार महिला - पुरुष नागरिकांनी हिमायतनगर येथील नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे. आंदोलन सुरू असताना शहरात दोन वेळा आमदार महोदय येऊन गेले मात्र त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी साधी भेट दिली नाही. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात आल्याने सातव्या दिवशी आमदारांनी भेट देऊन आंदोलन कर्त्याच्या मागण्या मीच पूर्ण करू शकतो असा दाखविण्याचा केविलवाला प्रयत्न केला आहे. मागील निवडणूक पूर्वी वस्तीतील नागरिकांना 43 नंबर मालकी प्रमाणपत्र मिळवून देतो म्हणून दिलेलं आश्वासन हवेतच विरल आहे. त्यामुळे न्याय हक्कासाठी मतदार संघातील महिलांना सात सात दिवस आंदोलन करावं लागतं ही एक मोठी शोकांतिका आहे. राजकीय नेते त्यांच काम करत राहतील... आपण आपलं आंदोलन सुरु ठेऊ... असा एल्गार कॉ उज्वला पडलवार यांनी पुकारत नगरपंचायत होश में आओ...... होश में तुमको आणा होगा.. आणा ह...
Ms akshara & ms antara selection ; शिवणी येथील कु .अक्षरा व कु.अंतरा संतोष जाधव या दोघी बहिणींची राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड -NNL

Ms akshara & ms antara selection ; शिवणी येथील कु .अक्षरा व कु.अंतरा संतोष जाधव या दोघी बहिणींची राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
शिवणी, भोजराज देशमुख। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ ते २६ सप्टेंबर २०२४ दरम्यान श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत किनवट तालुक्यातील शिवणी येथील अक्षरा संतोष जाधव व अंतरा संतोष जाधव या दोघी बहिणींनी उत्कृष्ट कामगिरी करीत पुढील महिन्यात १७ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आपली निवड कायम केली. या यशाबद्दल या दोन्ही भगिनींना विविध स्थरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या धनुर्विद्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . कु.अंतराने १४ वर्षाखालील वयोगटात इंडियन प्रकारात खेळताना सर्वोत्कृष्ट गुणाची कमाई केली. तर अक्षराने १७ वर्षे वयोगटात इंडियन प्रकारात खेळताना तृतीय क्रमांक मिळवीत राज्यस्...
‘Swaratim’ University : ‘स्वारातीम’ विद्यापीठात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुर्व पथसंचलन शिबीर यशस्वी संपन्न -NNL

‘Swaratim’ University : ‘स्वारातीम’ विद्यापीठात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुर्व पथसंचलन शिबीर यशस्वी संपन्न -NNL

नांदेड, करियर
नांदेड| राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई व राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलन पूर्व निवड चाचणी शिबिर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. २६ ते २८ सप्टेंबर या दरम्यान विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमेश देवकर, डॉ. सुशील शिंदे, ओ. एस. डी. रासेयो मुंबई विद्यापीठ, रवींद्र खडकीकर प्रशासन अधिकारी मंत्रालय, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा भोसले, इंजिनीअर नारायण चौधरी...
Dr. Gopchde : सर्वांनी एकत्रित काम केल्यास आगामी लोकसभेसह नऊ विधानसभांवर महायुतीचा झेंडा निश्चित-खा.डॉ.गोपछडे -NNL

Dr. Gopchde : सर्वांनी एकत्रित काम केल्यास आगामी लोकसभेसह नऊ विधानसभांवर महायुतीचा झेंडा निश्चित-खा.डॉ.गोपछडे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात तुमचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला, त्यामुळे तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात,भारतीय जनता पार्टी हा विचारांचा पक्ष आहे, हा पक्ष कोणाच्याही मालकीचा नाही, तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षात काम करीत असताना मतभेद असावेत परंतु मनभेद असता कामा नये. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सर्व मतभेद बाजुला ठेवून एकत्रित काम केल्यास आगामी लोकसभा आणि नऊ विधानसभांवर महायुतीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी देगलूर येथील आढावा बैठक व भव्य पक्ष प्रवेश मेळाव्यात व्यक्त केला. देगलूर येथे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक आणि भव्य पक्षप्रवेश मेळावा नुकताच पार...
global AI empire : मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती -NNL

global AI empire : मराठवाड्याच्या भूमिपुत्राने केली जागतिक एआय साम्राज्याची निर्मिती -NNL

लेख
महाराष्ट्र, २९ सप्टेंबर २०२४: सतत बदलत असलेल्या तंत्रज्ञान आणि व्यवसायाच्या क्षेत्रातील काही व्यक्तींमध्ये संपूर्ण उद्योगक्षेत्राला नवा मार्ग दाखवण्याची क्षमता असते. आनंद माहूरकर हे या दुर्मिळ श्रेणीतील एक दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जातात, ज्यांनी आपल्या ध्यासपूर्ण आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोनातून काही क्रांतीकारक बदल घडवून आणले आहेत. (Findability Sciences) फाइंडॅबिलीटी सायन्सेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक म्हणून माहूरकर यांनी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) उत्पादने आणि उपाययोजनांच्या क्षेत्रात 'एन्टरप्राईज एआय', आणि 'बिझनेस प्रोसेस को – पायलट' या उत्पादनांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर एक सामर्थ्यशाली कंपनी उभी केली आहे. हा प्रवास जिद्द, गहन अंतर्दृष्टी, सूक्ष्म दृष्टीकोन आणि भविष्य घडविण्याच्या कटिबद्धतेने प्रेरित होऊन झाला आहे.  साधरणते पलीकडील दृष्टी: माहूरकरांचा प्रवास डेटा आणि ए...
Satyajit Tipreswar : आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्यजीत टिप्रेसवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान -NNL

Satyajit Tipreswar : आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्यजीत टिप्रेसवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्यजीत टिप्रेसवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान करण्यात आला असून, दै.वीर शिरोमणी, सा. नंदगिरीचा कानोसा व मायडी बहुउदेशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने " मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा " राज्यस्तरीय पुरस्कार -2024 " कार्यक्रम आज दि. 29 सप्टेंबर रोजी हॉटेल गणराज पॅलेस, नमसकार चौक, नांदेड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कंधार लोहा मतदार संघाचे मा. आमदार ईश्वरराव भोसीकर साहेब, उदघाटक डॉ. सुनिल कदम साहेब, नांदेड जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( श्री शरदचंद्र पवार ) गट, स्वागतध्यक्ष मा. सचिन कासलीवाल, संस्थापक अध्यक्ष किसानजन आंदोलन, विशेष अतिथी मा. सौ. संगीताताई डक, मा. बालकल्याण सभापती मनापा नांदेड, प्रमुख अतिथी मा.सौ. वैशालीताई हिंगोले/ गुंजरगे, राज्य सचिव महिला आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), म...
Andaman island ; अंदमान च्या बेटावरून (भाग ५ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Andaman island ; अंदमान च्या बेटावरून (भाग ५ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक सकाळी नाश्त्याचे पार्सल सोबत घेऊन आम्ही ईस्टर्न गेट हॉटेल सोडले. एसी टेम्पो ट्रॅव्हल्स ने पंधरा मिनिटात जेटी वर पोहोचलो. आजचा आमचा प्रवास क्रुझने होणार होता. विमानतळाप्रमाणे या ठिकाणी सर्व तपासणी होते. मॅक्रो क्रूज मध्ये आमच्या सीट रिझर्व केलेल्या होत्या. क्रूझ चा अनुभव बहुतेक जण पहिल्यांदाच घेत होते. प्रशस्त अशा क्रुझ वर एसीमध्ये तीनशेच्या आसपास आरामदायी सीटवर बसण्याची व्यवस्था केलेली होती.अथांग समुद्रात प्रवास करताना अतिशय उत्साही वातावरण निर्माण झाले होते. सेल्फी,ग्रुप फोटोला उधाण आले होते. दीड तासाचा प्रवास करून आम्ही हॅवलॉक बेटावर पोहोचलो. गुलामगिरीची प्रतीके...
error: Content is protected !!