Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Timetable for online application : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर -NNL

Timetable for online application : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे. नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने मंगळवार 1 ऑक्टोंबर ते बुधवार 30 ऑक्टोबर 2024 हा कालावधी आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream)सर्व शाखाचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of C...
Ashoka Rao Chavan : माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केली नेरली येथील रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी -NNL

Ashoka Rao Chavan : माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केली नेरली येथील रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नेरली येथील नागरिकांनी पाण्याच्या टाकीतील दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना विषबाधा झाली होती. हे रुग्ण वेगवेगळ्या रूग्णालयात दाखल असून माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व योग्य ते उपचार करण्याच्या आरोग्य यंत्रणेला सूचना केल्या. दि.27 च्या मध्यरात्रीपासून नेरली येथील अनेक नागरिकांना उलट्या, संडासचा त्रास सुरू झाला होता. ज्यांनी टाकीपासून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाणी पिले त्यांनाच हा त्रास जाणवू लागला. गावातील सुमारे 500 पेक्षा जास्त नागरिकांना दूषीत पाण्याची बाधा झाल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलत रुग्णांना डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील कांही रुग्ण अतिगंभीर असल्यामुळे त्या...
Assistant Commissioner Shivanand Mingire :1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे -NNL

Assistant Commissioner Shivanand Mingire :1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| समाज कल्याण कार्यालय, विधीसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा कार्यक्रम नियोजन भवन येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व फेस्कॉमचे उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजनाविषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्धघाटक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव...
Congress party ; १ ॲाक्टोबर पासून काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती -NNL

Congress party ; १ ॲाक्टोबर पासून काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दि. १ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली असून हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेऊन आपला अहवाल देणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस पक्षाकडे एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प...
Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ६ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ६ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक  हॅवलॉक आयलँड बीच रिसॉर्टवर पहाटेच जाग आली ती निरनिराळ्या पक्षांच्या आवाजाने. रूमच्या बाहेर येऊन पाहिले तर आमच्या रिसॉर्टच्या कंपाउंड पर्यंत समुद्राचे पाणी आलेले होते.शांत वातावरणात समुद्राचे निरीक्षण करणे खूपच आल्हाददायक वाटत होते.अर्धा तास मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर रिसॉर्ट मध्ये असलेल्या स्विमिंग पूल वर मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला.काल रिसॉर्ट मध्ये आल्यानंतर जे गोड नारळ पाणी आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून दिले होते त्याची आठवण झाली. वेटरला सांगून दोन नारळ पाणी पिले. सकाळी साडेआठ वाजता सर्वजण आपापल्या बॅगा घेऊन पुढील प्रवासासाठी तयार झाले होते. अमेरिकन ब्रेकफास...
CEO Meenal Karanwal : 2 आक्‍टोंबर रोजी जिल्‍हयातील सर्व गावात स्‍वच्‍छ भारत दिवस साजरा करण्‍यात येणार – सीईओ मीनल करनवाल -NNL

CEO Meenal Karanwal : 2 आक्‍टोंबर रोजी जिल्‍हयातील सर्व गावात स्‍वच्‍छ भारत दिवस साजरा करण्‍यात येणार – सीईओ मीनल करनवाल -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात सर्व गावातून स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे. या दिवशी स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्‍ये स्वच्छतेची शपथ, श्रमदान, गावे हागणदारीमुक्‍त करणे तसेच स्वच्छता विषयक उपक्रमांचा समावेश आहे. दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर स्वच्छता ही सेवा 2024 पंधरवडा राबवला गेला असून, त्याची सांगता 2 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. गावांमध्ये स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्‍वच्‍छते संदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गावस्‍तरावर घेण्‍यात आलेल्‍या स्‍वच्‍छ माझे अंगण स्‍पर्धेतील पात्र कुटूंबांचा यावेळी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्‍या हस्‍ते सन्‍मान करण्‍यात येणार आहे. ...
Road stop movement : आदिवासी समाजाचा विविध मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन -NNL

Road stop movement : आदिवासी समाजाचा विविध मागण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत वेळोवेळी होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात व आदिवासी समाजांच्या मूलभूत गरजा अशा विविध मागण्या घेऊन आदिवासी समाजाने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरून किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. राज्याचे मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासी जमातीत आरक्षण देण्याचा जीआर काढू असे आश्वासित केल्याने राज्यातील आदिवासी समाज आक्रमक झाला असून आदिवासी समाजाची आक्रमकता सर्व राज्यभरात पाहायला मिळत आहे. किनवट तालुक्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व आदिवासी समाजातील नेत्यांनी व आदिवासी नागरिकांनी आज एकत्र येत किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. हा रास्ता रोको आंदोलन तब्बल एक ते दीड तास सुरू असल्याने नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावर व तेलंगणात ...
Prataprao Patil Chikhlikar : लोहा विधानसभा लढविण्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर याचे संकेत -NNL

Prataprao Patil Chikhlikar : लोहा विधानसभा लढविण्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर याचे संकेत -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा-कंधार हा मतदार संघ नेहमीच आमच्या मा सुख-दुःखात पाठीशी उभा राहिला आहे. या मतदारसंघात पाच वर्षापूर्वी आपल्या सगळ्या कडून जी चूक झाली ती आता होणार नाही. सर्वांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवावेत. विकास निधी कमी पडणार नाही .या पाच वर्षात मतदार संघ मागे आला. अनेक पक्ष ज्यांनी बदलले तेच आता टॉस करूत असे बोलत आहेत. काहीजणांचे चार वर्षीत दुकान येथे थाटले अशांच्या भूलथापांना बळी पडू नका. एकजुटी अशीच असली पाहिजे हेच सरकार पुन्हा येणार आहे लोहा विधानसभा जिंकू असा विश्वास व्यक्त करत विधानसभा लढविण्याचे संकेत माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शुशोभीकरण, दीड कोटी रुपयांचे बुध्द्ध‌विहार यासह बारा कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमीपुजन व लोकार्पण सोहळा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडला. छत्रपती शिवरायांच्या...
Ban on use of Dolby system : नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध -NNL

Ban on use of Dolby system : नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 3 ऑक्टोंबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्री पर्यतच्या श्री नवरात्र उत्सव कालावधीत जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुण्‍याही व्‍यक्‍तीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) नुसार डॉल्बी सिस्टीमचा वापर करणेस, चालविण्यास तसेच सदर मिरवणूक/उत्सवादरम्यान लेजर लाइटच्या वापरासही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात जिल्हयातील डॉल्बी चालक व मालक यांचेकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुणीही व्यक्ती हे डॉल्बी सिस्टीम वापरू / चालवू नये याकरीता सदर डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे. संबंधीतावर नोट...
error: Content is protected !!