Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
38 Defferent Surgeries ; ग्रामीण रुग्णालय भोकर येथे विविध 38 शस्त्रक्रिया संपन्न -NNL

38 Defferent Surgeries ; ग्रामीण रुग्णालय भोकर येथे विविध 38 शस्त्रक्रिया संपन्न -NNL

आरोग्य, नांदेड
भोकर। स्मृतीशेष प्रविण वाघमारे यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त डॉक्टर्स असोसिएशन भोकर व केमिस्ट असोसिएशन भोकर, डॉ साईनाथ वाघमारे यांच्या वतीने व नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या सूचनेनुसार व डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी अंडवृद्धी, हर्निया, अपेंडिक्स व शरीरावरील गाठी रुग्णाची तपासणी करण्यात आली. यामध्ये शस्त्रक्रिया योग्य रुग्णांची शस्त्रक्रिया दि.30 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 38 रुग्णांची विविध प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये 10 अंडवृद्धी, 2 हर्निया, 4 अपेंडिक्स, 3 फिबरडोमा, 2 टगं टाय, 1 फिसूला, 1 पाईल्स व 15 शरीरावरील गाठी रुग्णाची असे एकूण 38 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सर्जन डॉ. संतोष अंगरवार, डॉ भास्कर आवटी, भूलतज्ञ डॉ बाळासाहेब बिऱ...
Nerali grampnchayat officer susoended ; कर्तव्यात कसूर, नेरली ग्रामपंचायत अधिकारी निलंबित -NNL

Nerali grampnchayat officer susoended ; कर्तव्यात कसूर, नेरली ग्रामपंचायत अधिकारी निलंबित -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। शेकडो लोकांना दूषित पाण्यामुळे अतिसाराला बळी पडावे लागले. ग्राम पंचायत अधिकारी पाणीपुरवठ्यासारख्या जोखमीच्या विषयावर हलगर्जीपणा केला असा ठपका ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. नेरली दुर्घटनेत ग्रामपंचायत अधिकारी निलंबित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत नेरली येथे 27 नोव्हेंबर 2024 रोजी पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील दुषीत पाण्यामुळे गावात अतिसार साथ रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे अनेक लोकांना मळमळ,उलटी, जुलाब होवून अनेक रुग्णांना साथीचा आजार झाला.याबाबत अनेक रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले.आता परिस्थिती आटोक्यात असून आरोग्य विभागाचे पथक लक्ष ठेवून आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नेरली येथील ग्रामपंचायत अधिकारी आर.एस. हटकर यांना निलंबित केले आहे. याबाबतचे आदेश 28 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमि...
Woorld hand day ; जागतिक हदय दिनानिमित्त सिडको परिसरात जनजागृती रॅली -NNL

Woorld hand day ; जागतिक हदय दिनानिमित्त सिडको परिसरात जनजागृती रॅली -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। जागतिक हदय दिनानिमित्त हडको परिसरातील भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट व रोटरी क्लब नांदेड, गेल्नमार्क फार्मासिस्ट यांच्या वतीने काढण्यात आलेल्या जनजागृती रॅली मध्ये डॉक्टर, जेष्ठ नागरिक, पत्रकार, व भिवराज कलंत्री इन्स्टिट्यूट विधार्थी यांनी सहभागी होत हडको ते अण्णा भाऊ साठे पुतळा ही रॅली काढली. २० सप्टेंबर रोजी जागतिक हदय दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भिवराज कलंत्री इन्स्टिट्यूट हडको, रोटरी क्लब नांदेड , गेल्नमार्क फार्मासिस्ट यांच्या वतीने आयोजित या रॅली चे उदघाटन डॉ. शुभांगी पंतगे,डॉ.रेणुका अग्रवाल, डॉ. सुरेखा कलंत्री, डॉ. नरेंश रायेवार,डॉ.प्रमोद पाटील, डॉ. संतोष महाजन, डॉ. अशोक भिसे, डॉ. गजेंद्र देशपांडे, रोटरी क्लब सचिव डॉ. अंबुलंगेकर, प्राचार्य, संभाजी सुर्यवंशी, दलित मित्र नारायण कौलंबीकर,सामाजिक कार्यकर्ते, विनोद जाधव, हारि पाटील, भरत धुत, पत्रकार, जेष्...
Selection army ; सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी भारतीय थल सेनामध्ये निवड -NNL

Selection army ; सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी भारतीय थल सेनामध्ये निवड -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड। छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आलेल्या भारतीय थल सेना मध्ये सिडको येथील युवक सांघदीप साहेबराव जोंधळे यांच्यी निवड झाली असून या बदल मित्र परिवार व कुटुंबीयांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. टाकळगाव ता.लोहा येथील व सध्या सिडको परिसरातील राहणारे युवक संघदिप साहेबराव जोंधळे यांनी सैन्य भरती साठी कुठलीही अकॅडमी कडे न जाता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूरी येथील मैदानावर सराव करत व स्पर्धा परीक्षा माध्यमातून हे यश संपादन केले असून यावर्षी आगस्ट मध्ये झालेल्या मैदानी चाचणी परीक्षा नंतर २३ सप्टेंबर रोजी या भरती परिक्षा निकाल लागला. यात ते सैन्य भरती साठी पात्र ठरले. निकाल लागताच सर्वमीत्र परिवाराने सत्कार करून अभिनंदन केले आहे, तर ग्रामपंचायत टाकळगाव यांच्या वतीने सरपंच प्रतिनिधी भिमराव लामदाडे, उपसरपंच प्रतिनिधी संभाजी चिंतोरे व समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस...
Dilip Gawde : निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

Dilip Gawde : निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या -विभागीय आयुक्त दिलीप गावडे -NNL

छत्रपती संभाजीनगर, राजकीय
छत्रपती संभाजी नगर| आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. विधानसभा निवडणुकांचा कालावधी नजीक आहे, त्यामुळे मिळणारा कालावधी कमी आहे. निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात जिल्हा व विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनर तसेच नोडल अधिकारी यांच्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गावडे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त जगदिश मिनीयार, छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्यासह जालना, बीड, धाराशिव जिल्हयातील अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, निवडणूक आयोगाचे लक्ष या निवडणुकांव...
Dharmabad railway station : धर्माबाद रेल्वे स्थानकास पानसरे चे नाव द्यायला हवे, समाधी स्थळ येथे सोयी सुविधा असायला हव्या – गिरगावकर -NNL

Dharmabad railway station : धर्माबाद रेल्वे स्थानकास पानसरे चे नाव द्यायला हवे, समाधी स्थळ येथे सोयी सुविधा असायला हव्या – गिरगावकर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
बिलोली| हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्थानकास देणे योग्यच राहील. याशिवाय आमचा निग्रह असायला हवा की,बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करणे हाच आमचा ध्यास असल्याचे मत माजी सनदी अधिकारी श्री. मधुकर गिरगावकर यांनी व्यक्त केले. ते मराठवाडा मुक्ती जागर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डॉ. शिवप्रसाद हमद, लघुळ या गावचे माजी सरपंच बाबुराव घोसलोड यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमात सहभाग घेऊन शुभेच्छा देत गिरगावकर पुढे म्हणाले की,हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची अरजापूर येथ समाधी आहे या ठिकाणी विविध सोयी सुविधा करण्याची गरज आहे एकंदरीत शहिदांच्या कार्याची जाणीव ठेवण्याची गरज आहे त्यानुसार पुढील पाऊल पडले पाहिजे असेही मधुकरराव गिरगावकर यांनी स्पष्ट केले. माजी सरपंच बाबुराव घोसलोड म्हणाले की,शासकीय सेवेत...
PRO and flood victims marched : पीआरओ आणि पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला -NNL

PRO and flood victims marched : पीआरओ आणि पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली दि.३० सप्टेंबर रोजी डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पासून भव्य मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार घालून अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चाची सुरवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य अन्नधान्य सेवा केंद्रा मार्फत शेकडो करोड रुपयांची फसवणूक करून फरार असलेला आरोपी बाबासाहेब शंकर सुतारे याला अटक करा, पूरग्रस्तांचे अनुदान तात्काळ पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर वर्ग करा. संघटनेचे अर्ज न स्वीकारनाऱ्या मनपाच्या क्षेत्रीय अधिकारी व आवक जावक लिपिकांवर सेवेतून बदतर्फीची कारवाई करा. आरोपी सुतारे हा अनेक लोकप्रतिनिधी यांना घेऊन मेळावे घेऊनआमिष दाखवून फसवणूक करीत होता आणि त्यास ज्यांनी प्रोत्साहन दिले त्यांना सहआरोपी करा. बहुतांश पीआरओ हे दलित व मागासवर्गीय असल्यामुळे समाज कल्याण विभागाने हस्तक्षे...
Mp Ashokrao chavhan ;नांदेड विभागातील रेल्वेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा-खा अशोकराव चव्हाण -NNL

Mp Ashokrao chavhan ;नांदेड विभागातील रेल्वेचे प्रश्न तातडीने मार्गी लावा-खा अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे मार्ग ,वंदे भारत एक्सप्रेससह रेल्वेचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयात सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे खा.चव्हाण यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले यावेळी खा. नागेश पाटील आष्टीकर ,खा. फोजीया खान,खा. बंडू जाधव, खा. संजय देशमुख ,दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन ,डीआरएम निती सरकार व रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर खा. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधत बैठकीत उपस्थित केलेल्या मागण्यांची माहिती दिली आहे. यावेळी खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की,रेल्वे...
Shamal Kurundkar : फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्याची किंमत वाटत नाही.- शामल कुरुंदकर -NNL

Shamal Kurundkar : फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्याची किंमत वाटत नाही.- शामल कुरुंदकर -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड, गोविंद मुंडकर| आम्हाला फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्याची किंमत वाटत नाही. असे प्रतिपादन नरहर कुरुंदकर यांच्या कन्या शामल कुरुंदकर यांनी केले. ते सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजता राज्य मराठी पत्रकार परिषद आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उपक्रमात नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नाशिक येथील नंदन राहणे ,डॉ. शिवदास हमंद, गोविंद मुंडकर, दीपनाथ पत्की, राजकुमार बिर्ला, डॉ. अनिल शिरसाठ, प्रदीप जैन, नीरज अवस्थी यांची उपस्थिती होती. शामल पत्की पुढे म्हणाल्या की, , मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी अहोरात्र झटले असे ज्ञात आणि अज्ञात हुतात्म्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आणि गरजेचे आहे. उपेक्षित चळवळ...
Dr. Manohar Chaskar : मन स्वच्छ असेल तर परिसरही स्वच्छ करता येतो –कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Dr. Manohar Chaskar : मन स्वच्छ असेल तर परिसरही स्वच्छ करता येतो –कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, करियर
नांदेड| ‘स्वच्छता ही सेवा’ प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजली पाहिजे. प्रत्येक भारतीयांनी तसा सेवाभाव जोपासला पाहिजे. समाजातील प्रत्येकांनी पहिल्यांदा स्वत:च्या मनातील स्वच्छता करून नंतर परिसराची स्वच्छता करायला हवी. त्यामुळे मन स्वच्छ असेल तर परिसरही स्वच्छ करता येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वच्छता हा संस्कार बालपणापासून रुजवावेत. असे मत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित दि. २८ सप्टेंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता रॅली च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, मुंबई विद्यापीठातील डॉ. सुशील शिंदे, डॉ. रमेश देवकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. मोहम्मद शकील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग...
error: Content is protected !!