बिलोली| हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्थानकास देणे योग्यच राहील. याशिवाय आमचा निग्रह असायला हवा की,बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करणे हाच आमचा ध्यास असल्याचे मत माजी सनदी अधिकारी श्री. मधुकर गिरगावकर यांनी व्यक्त केले. ते मराठवाडा मुक्ती जागर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डॉ. शिवप्रसाद हमद, लघुळ या गावचे माजी सरपंच बाबुराव घोसलोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमात सहभाग घेऊन शुभेच्छा देत गिरगावकर पुढे म्हणाले की,हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची अरजापूर येथ समाधी आहे या ठिकाणी विविध सोयी सुविधा करण्याची गरज आहे एकंदरीत शहिदांच्या कार्याची जाणीव ठेवण्याची गरज आहे त्यानुसार पुढील पाऊल पडले पाहिजे असेही मधुकरराव गिरगावकर यांनी स्पष्ट केले. माजी सरपंच बाबुराव घोसलोड म्हणाले की,शासकीय सेवेत असताना व सेवानिवृत्तीनंतरही श्री. मधुजी गिरगावकर यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही.
सातत्याने जीवन प्राधिकरण मध्ये अभियंता, सहाय्यक अभियंता, अधीक्षक अभियंता या पदावर राहून त्यांनी बिलोली – देगलूर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या गावाच्या पाणीपुरवठा व रस्त्याच्या समस्या सोडवल्या. लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देवून कामे करून घेतली. ज्या गावाला जायला रस्ते नव्हती ती रस्ते श्री. गिरगावकर मंजूर करून गावाशी गाव जोडल. महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर योजना समजावून सांगून त्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्ते उभे केले. आज हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आहे. .